पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विविधरंगी- अतरंगी रे

विविधरंगी - अतरंगी रे

हे काही चित्रपट विश्लेषण नाही, तर मनात आलेल्या भावना आहेत. ज्यांनी कुणी हा चित्रपट पाहिला नसेल तर पुढे वाचू नये. ( माहीत आहे तुम्ही ते वाचणारच) . जसे सुखदुःख वाटून घ्यावे त्या प्रमाणात शिकवण देवाण घेवाण हवी म्हनुन हा खटाटोप.

चित्रपट चालू होतो, अन वाटले की जब वुई मीट प्रमाणे जातो की काय, लगेच तो रूही फिल्म प्रमाणे पकडाई शादी होतो. काही वेळात 2 स्टेट , मग OMG काही वेळा,मुन्ना भाई चा फील येत, सदमा सारखा एन्ड होतो  असे उगाच वाटत असताना ,  सिमरन जा जी ले अपनी जिंदगी असे म्हणत DDLJ  सारखा रेल्वे स्टेशनवर संपतो. हो संपला बर का एवढच आहे. आता तुम्ही म्हणाल गाणी आणि संगीत तर
महान संगीतकाराने पण आपले जुनेच काही गाजलेल्या गाण्याच्या धून एकत्र करून वाजवल्या असे वाटते.

पण काही उपयुक्त माहिती हा  चित्रपट पाहून मिळते ती जनहित मध्ये उगाच द्यावी असे वाटले ते असे

दिल्ली सारख्या मोठया शहरात जर तुम्ही कॉलेजमध्ये मध्ये शिकत असाल अन जर तुम्ही सिनियर असाल तर तुम्ही तुमच्या बायकोबरोबर अगदी निवांत राहू शकता. खोटे वाटत असेल तर बातम्या पहा काही तरुण नेते मंडळी अजून सुद्धा विद्यापीठात ठाण मांडून बसले आहेत

बिहारमध्ये जबरदस्तीने लग्नलावून दिले जाते आणि त्याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जातो. लग्न अन प्रसिद्ध एक साथ ,काही लग्नाळू लोक ह्या चा फायदा घेऊ शकतात आपल्या जबाबदारी वर.

जर तुम्ही जादूगार असाल तर आपल्या गोष्टी नीट  चेक करा नाही तर दुसऱ्या ला गायब करण्याच्या नादात स्वतः गायब व्हाल.

मानसिक रोगावर वैद्यकीय उपचार अन खरे प्रेम हाच एक उपाय आहे असा सामाजिक संदेश मिळतो.

हेमंत कदम

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू