पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पठाण चाचा के फंडे

पठाणचाचा के फंडे

मागे राधे ची शिकवण झाली,नंतर लाला चे संदेश झाले, आणि आता आला रे आला पठाण चाचा आला अन् ते पण बरेच वर्षांनी, आपण काही वाद निर्माण करत नाही आपण तर प्रेमाचा अनुभव  देतो असा चाचा नेहमी सांगतो. 

अन् ह्या वेळेला तो  H R चे फंडे घेऊन आला आहे.  एखाद्या कंपनी मध्ये एचआर चे  काय फंडे असावे ह्याचे नेमके शिकवण ह्या शिणेमा मध्ये दिले आहे.
ज्यांनी वेळात वेळ काढून हा सिनेमा पाहिला असेल ( त्यात आम्ही सुध्दा) , किंवा ज्यांनी पाहिलं नसेल त्यांना  सुध्दा हे फंडे कळावे  अन् एचआर हा special विषय ज्यांचा असेल त्यांना सुध्दा मदत होईल ,हाच एक सकल हेतू मनी धरून हा लेख प्रपंच.

फंडा क्रमांक १.  सर्व कंपनी मध्ये काम सोडून गेलेल्या लोकांची एक फाईल असणे आवश्यक आहे.  कुणी नाराज होऊन गेला असेल तरी त्याचे मन अजून जुन्या मध्ये आहे अश्या लोकांना  गरज पडेल तर बोलवता येईल.

क २. अश्या लोकांना परत बोलावून एकाधी नवी division सुरू करता येते. आणि रिटायर होताना कुणाला बॉस ही बनता येईल.

क ३. आपल्या कुटुंबाला प्रथम महत्त्व  द्यावे  नंतर ऑफिसकाम   हे  employee ने लक्षात ठेवावे. कारण कठीण समय येता कोण येता कामी आपल्या कुटुंबा शिवाय.आणि कंपनी कधी हात दाखवेल ते सांगता येत नाही.

क.४ कंपनीने सुध्दा लोकांना प्रोसाहित करणे गरजेचे आहे. खास करून तरुण लोकांना , नाही तर ते प्रतिस्पर्धी कंपनीच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहून स्वतः आणि कंपनीला सुध्दा गोत्यात आणू शकतात.

क ५ आपल्या सहकऱ्यांशी आपले संबंध जर चांगले असतील तर कठीण समयी ते छप्पर फाडून सुध्धा तुम्हाला मदत करतील.

अजून काही बारीसारीक फंडे आहेत ते आपल्या जबादारीवर पहावे  पण ही पंच सूत्री महत्वाची

हेमंत

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू