पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मनुष्य एक प्राणी


मनुष्य एक प्राणी( Animal)

चलचित्रातून मिळणारी शिकवण ह्या आमच्या उपक्रमा अंतर्गत घेऊन आलो आहोत एक नवी शिकवण...

नुकताच  प्रदर्शित झालेला आणि भरपूर गल्ला जमवलेला (अर्थातच तिकीट दर उच्च असल्यामुळं ,) समंजस अश्या प्रौढ लोकांसाठी बनवलेला Animal असे इंग्लिश नाव असलेला, एक हिंदी शीनेमा.

ह्या मध्ये फार प्रमाणात हिंसा दाखवली आहे असे काही जणांचे मत आहे, पण नावातच प्राणी आहे. मनुष्य हा प्राणीच आहे आणि आधी तो पशू होता बऱ्याच काळाने तो मनुष्य बनला. पण त्याच्या आतील पशू काही संपला नाही आणि तो कसा वेळे प्रसंगी पशू बनतो हे आपण समाजात पाहतो आहेच. असो

पण एक कौटुंबिक शिकवण हा शिणेमा देतो असे काही तरी आम्हास जाणवले आणि ते सकल जनांस कळावे हाच एक हेतू  पुढील प्रमाणे

१. पालकांनी आपल्या बिझी कामातून वेळ काढून आपल्या मुलानं बरोबर घालवावा, त्यांचे काय चालू आहे ते पहावे, नाही तर आपली मुले काय दिवे लावतात ते नंतर कळते. योग्य वेळी त्यांच्या बरोबर खेळ खेळावे, नाहीतर ते मोठे झाल्यावर पप्पा एक खेळ खेळू असे बोलून तुम्हास नवीन काहीतरी शिकवतील.

२.आपली भावकी म्हणजे जवळचे नातेवाईक ह्या सर्वांशी संबंध ठेवले पाहिजेत. जुन्या पिढीने काही चूका जरी केल्या असल्या तरी नवीन पिढीने ते विसरून मातीशी निगडित राहावे, कारण कठीण समय येता कोण येतो कामी?  तर अपने ही अपने होते है. असा तार्तिक विचार मांडला आहे.

३ भावकी मध्ये भांडणे होतात, त्यामुळे प्रसंगी मारामारी करायची वेळ आली तर काठी,कुऱ्हाड, अन बंदूक सुद्धा वापरता आली पाहिजे. पोलिस काही प्रत्येक वेळी आपल्या कामी येतील असे नाही. स्व रक्षण करण्यासाठी आपले द्यान कामी आणून नवीन गन मशीन बनवतात आली पाहिजे आणि ती सुद्धा देशी.

४. प्रेमा मध्ये हृदय दिले जाते, पण जर खरेखुरे "दिलं " दिले तर कश्या प्रकारे प्रेम करावे हे आपल्या जबाबदारी वर करून पहावे.

५.भावाचा मित्र किंवा बहिणीची मैत्रीन ह्याच्या बद्दल काही उगाच सॉफ्ट कॉर्नर असतील तर ते वेळीच क्लिअर करावे , नंतर कुटुंबाला नाहक त्रास होईल असे काही करू नये

अजून काही शिकवण आपणास कळली असेल तर शिकून घ्यावी तसा ह्या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे असे म्हणतात.

पुन्हा भेटू एका नवीन शिकवणी सह

हेमंत कदम
२१/१२/२०२३




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू