पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अध्याय 2

भाग -२

*****************************************

....."ओ थांबा. सॅनिटाईजर घ्या. बघू टेम्प्रेचर", दवाखान्यात शिरल्या शिरल्या पहिला पाहुणचार झाला.


एका सुबक ठेंगणीने आई आणि छबुची खातीरदारी केली. छबु च्या मनात इतकी भीती की आईला म्हणाली,"आई...अगं टेम्प्रेचर वाढणार नाही ना? मला भीती वाटते गं"


यावर आई," छबु काय वेडेपणा चाललाय? त्यांना त्यांचं काम करुदे".


चला प्राथमिक फेरी पार पडली.

मुख्य डॉक्टरनी तपासायला आत बोलावलं.

"पेशंट कोण आहे?", डॉ. दातेंनी विचारलं.


"मी. छबु. माझ्या दोन्ही बाजूच्या दाढा खुप दुखतायत", छबु ने पूर्ण वाक्यात उत्तर दिलं.


"तुम्ही मागेच बसा", असं हाताच्या इशाऱ्याने दातेंनी छबु च्या आईला सांगितलं.


" या .. असं इथे आडव्या व्हा. काही घाबरू नका", समजुतीच्या स्वरात डॉ.दाते म्हणाल्या.


छबु च्या मनात प्रश्नांचा नुसता काहूर माजलेला. भीतीने अगदी तिचे हात सुद्धा थरथरत होते. आणि त्या आरामखुर्ची सारख्या दिसणाऱ्या खुर्चीवर स्वतःला झोकून देताना बाजूचा ग्लास खाली पडला.


"ओह...सॉरी सॉरी, चुकून झालं",छबु गोंधळली.


इकडे आपल्या मुलीचं धांदरट दृश्य पाहून आईने कपाळावर हात मारून घेतला.डॉ. दातेंच्या सहकारी असलेल्या मुलीने तो ग्लास उचलून ठेवला.


"इट्स ओके. नो प्रॉब्लेम. बी स्टेबल," डॉ.दातेंनी म्हटलं.


"चला आ करा...थोडा मोठा करा", आता तपासणी सुरू झाली.


नाकावरचा चष्मा वर घेत डॉ.दाते थेट छबु च्या आईकडे वळल्या. शाळेतला निकाल जाहीर होताना धाकधूक होते तशी धाकधूक छबुची झालेली. त्या काही तरी छबु च्या आई शी बोलत होत्या. इतक्यात पुन्हा परत आल्या आणि तपासणी सुरू केली.


"इथे दुखतंय का?, तिथे दुखतंय का? ", असे डॉ. दातेंचे प्रश्न सुरू झाले.


वटवट करणारी छबु आता अगदी हु-हा-हु-हा एवढीच उत्तरं देत होती. कसले कसले चमचे तिच्या दातांवर जणू आघात करत आहेत, असं तिला वाटत होतं. टक टक, खण खण हे शाळेत शिकलेले शब्द आता ती अनुभवत होती. डोळे मिटून डॉ. मॅडम च्या सूचना ती ऐकत होती आणि कृती करत होती.


अखेर "आता या इकडे बसा", असा आवाज आला आणि छबु ने डोळे उघडले तर समोर दोन दोन डॉक्टर आणि एक सहकारी.


थोडं फार दुखल्याने छबुने फार काही तोंड न उघडता सांगितलेलं ऐकायचं काम केलं. ती आई च्या बाजूला जाऊन बसली.


डॉ.दाते बाई  आणि त्यांचे मिस्टर डॉ. दाते दोघे सुद्धा डेंटिस्ट होते. दाते बाई बोलायला लागल्या,केस पेपर वाचून त्या म्हणाल्या,"तर छबु ताई...."


"अय्या..यांनी तर एकदम आपलं असल्याप्रमाणेच हाक मारली. चांगले दिसतायत हे दोघं",असं म्हणून आपल्या मनाची समजूत केली.


"तर छबु ताई...तुमच्या दोन्ही दाढा या पोकळ झालेल्या आहेत. तुम्हाला खाता तरी कसं येतं? शक्यच नाहीये खाता येणं",डॉ. दाते म्हणाल्या.


"मग आता काय करावं लागेल मॅडम?", छबु च्या आईने विचारले.


" आता दोनच पर्याय, एक तर दाढ काढा किंवा रूट कॅनल करावं लागेल", डॉ.म्हणाले


" बापरे! दाढ काढून कसं चालेल? माझं अक्ख आयुष्य आहे अजून. छे! हे काही तरीच झालं बुवा", छबुचा मनात संवाद चालु होता.


छबु ने आईकडे आणि आईने छबु कडे पाहिलं. आईला काय ते कळलेलं होतं.


आईने डॉ. ना म्हटलं," रूट कॅनल च करूया, दाढ काढणं म्हणजे आता थोडं लवकर पण वाटतंय".


आईच्या बोलण्यावर छबु ने होकारार्थी मॅन डोलावली.


"हो. हरकत नाही. कारण कसं आहे, बऱ्याच प्रमाणात दाढ डॅमेज झाली आहे. नुसतं फिलिंग करून भागणार नाही", डॉ. म्हणाले.


"किती वेळात पूर्ण होईल हे?", छबु ने आता तोंड उघडलं.


" कसं असतं ते पेशंट च्या रिस्पॉन्स वर पण थोडं अवलंबून असतं, पण सामान्यपणे चार ते पाच सिटिंग मध्ये होऊन जाईल", दातेंनी सांगितलं.


"साधारण काय खर्च येईल या सगळ्यासाठी",आईने विचारलं.


"हो. मी अंदाजे खर्च देते लिहून.तुम्ही सांगा कधी ते तसं आपण सुरू करू", दाते बाई म्हणाल्या.


चला दवाखान्यातल्या सीन संपला.


मास्क आणि हेल्मेट लावून शूर शिपायापणे छबु गाडीवर बसली. आईला सांगितल्याप्रमाणे आता छबु गाडी चालवणार होती.


पण आईला सगळं माहीत असतं या नियमाप्रमाणे आईने एकदा शेवटी छबुला म्हटले, "ओ बाई, मी चालवू का गाडी? जमणारे का तुला? नाही रूट कॅनल चा विषया नंतर आपली मानसिक तयारी आहे असं दिसतं नाहीये. मी चालवू का गाडी? तू बस मागे आरामात. दे किल्ली".


छबु ने काहीही न बोलता नुसती होकारार्थी मान डोलवून आईकडे किल्ली दिली. आईच्या मागे बसून छबु घरी निघाली. नाटकाचा दुसरा अंक तर घरी होणार होता. छबु ला जरा टेन्शनच आलेलं.


"आता घरी सगळे काय म्हणतील, एवढया लवकर रूट कॅनल करायची वेळ आली आहे म्हणून? बिट्टू कसा चिडवेल?  आणि मला स्वतःला किती त्रास होणारे? बापरे!",नुसते प्रश्न आणि प्रश्नच!


अखेर गेट चा आवाज आला. बिट्टू जोरात ओरडला,"ताई आली ताई आली...."


क्रमशः

*****************************************

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू