पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भाग २

*भाग दोन*

 

 

          रानावनात भटकणारी बोरी करवंदीच्या जाळ्यांमध्ये न घाबरता घुसणारी माझी जिजी मांड नदीत आपल्या लाडक्या गाई बरोबर तासन् तास पाण्यात डुंबत राहायची यामध्ये ती पूर्णपणे गुंतून गेली होती. शिक्षणाचा लवलेशही नाही कधी ती शाळेत गेलीच नाही अशी माझी जिजी अवघ्या तेराव्या वर्षीसुद्धा थोडी थोराड दिसू लागली होती. आडव्या हाडाची अंगकाठी आणि दणकट असलेली माझी जिजी अचानक मोठी झाल्याचं आबांच्या व त्यांचे वडील बंधु  तात्यांच्या लक्षात आलं आणि मग सुरुवात झाली ती शोध पथकाला तिचं लग्न ठरलं ते गर्भश्रीमंत वराशी पण कमळाला मात्र ते पटत नव्हते असे असले तरी कमळा काहीच करु शकली नाही.


     गोविंदराव पाटील हे नाव पंचक्रोशीत गाजलेले होतं .ज्याच्या एकट्याच्या नावावर जवळजवळ ऐंशी ते नव्वद एकर जमीन होती ज्या जमिनीत उसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जायचे त्यामुळे ज्याच्या त्याच्या तोंडी नाव नेहमी ऐकायला मिळत असे.


           तेरा वर्षाची जिजी लग्न होऊन घराबाहेर पडली पण उंबऱ्यावरचं माप ओलांडताना मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती, कारण स्वागतासाठी तिच्याच वयाच्या तीन मुली तिच्या समोर उभ्या त्यांची ओळख करून देताना 'तुझ्याच मुली' या दोनच शब्दात त्यांची ओळख करून दिलेली यावेळी मात्र तिच्या लक्षात आले, ते म्हणजे ज्याच्याशी आपले लग्न झाले तो आपला नवरा म्हणजे फक्त आणि फक्त त्रेपन्न वर्षाचा अगोदरच हट्टी असलेली जिजी ज्यावेळी तिला ही गोष्ट समजली त्यावेळी मात्र ती पूर्णपणे कोसळली होती.


          जिजीचा संसार सुरू झाला तालेवार घरात एवढ्याशा जिजीला येता जाता लोक 'नव्या पाटलीणबाई' म्हणू मान देऊ लागले.सर्व घराची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. दिवस जाऊ लागले वयाबरोबर ती पोक्त होऊ लागली तिचा एवढा वेगळा दरारा निर्माण झाला. संसाराचा गाडा ओढता ओढता जिजी वयात आली . दोन मुले आणि दोन मुली जन्माला घातल्या आणि अवघ्या वयाच्या सव्वीसाव्या वर्षी तिच्या वाट्याला वैधव्य आले .माहेरपणाला आलेल्या जिजीला निरोप मिळाला ,'मामा गेल्याचा' ऐकून अंगात वादळ शिरल्यासारखी माजगाव ते वडोली दहा किलोमीटर अंतर ती धावत सुटली. छोटी भावंडे तिच्या मागे धावत होती हे सर्व पहाणाऱ्याचे काळीज चिरत होते.एकूण सात मुलांची जबाबदारी तिच्यावर टाकून मामांनी जगाचा निरोप घेतला. तिने आपल्या सातही मुलांवर जीवापाड प्रेम केले . मोठा वाडा त्या वाड्याच्या तीन फुटाच्या भिंती वाड्याच्या आत असलेले मोठ मोठे हांडे सर्व काही तिच्या श्रीमंतीच्या खुणा दाखवत होते पण या श्रीमंतीत तिच्या वाट्याला आलेला एकाकीपणा जणू कुणाच्याच लक्षात आला नव्हता.

 

 

क्रमशः

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू