पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भाग ४

भाग चौथा*

       बारकावा कसा करावा? हे जिजीकडून शिकावं घरातल्या नोकरचाकरांच्या जेवणासह सर्व तीच एकटी बघत असे रोज सकाळी दोन पायली धान्य जात्यावर दळताना तिने गायलेल्या ओव्या कानावर पडल्या की चारी मुलं डोळे चोळत तिच्या जवळ यायची आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून लोळायला सुरुवात करायची. खरे पाहिले तर मुलांच्या शिक्षणासाठी ती कधीच मागे पडली नाही. मुलींनी शिक्षण घेऊ नये यासाठी तिच्या दिरांनी म्हणजे दौलत पाटील यांनी नेहमी विरोध केला पण त्याला थोडाही न जुमानता तिने आपल्या मुलींना शिकवले. प्रसंगी आपल्या पडत्या काळात थोडे दागिने सुद्धा तिने विकले ' दागिने हे गरजेला उपयोगी पडतात 'असे तिचे मत होते.

 

       इतकी श्रीमंती असतानाही ती कधी सोन्याने मढलेली नसायची. कानात मोत्याच्या कुड्या, गळ्यात एक बोरमाळ, हातात रुणझुणत्या बांगड्या एवढेच दागिने ती कायम वापरायची. तिने कधी कुणाचा तिरस्कार केला नाही आणि कर्तव्याला तर ती कधीच कमी पडली नाही .अपेक्षेप्रमाणे तिला कधीच मिळालं नाही . बालविवाहाचा शाप तिच्या मोठ्या मुलाला सुद्धा मिळाला होता त्याचे लग्न लावले होते. जिजीच्या विरोधाला न जुमानता हे लग्न झाले होते. जिजीचे दीर दौलत पाटील यांनी मोठी मुलगी कुसुम साठी स्थळ आणले तेव्हा मात्र जिजी पेटून उठली . "कितीही तालेवार असला तरी माझ्या लेकीला मी बिजवराला देणार नाही "असे तिने ठणकावून सांगितले.'मी माझ्या लेकीला एखाद्या शेतमजुराला किंवा कामगाराला देईन पण हे लग्न मी होऊ देणार नाही''असा तिने ठाम निश्चय केला होता आणि खरोखरच तिने ते लग्न ठरवून दिले नाही. त्यासाठी तिच्यावर खूप दबाव आणला पण ती कोणासमोर वाकली नाही आपल्या कुसुम साठी तिने एका साधारण शिक्षकांची निवड केली. स्वकर्तुत्वावर ज्यांनी आपलं एक छानसं टुमदार घरकुल तयार केलं .

 

         कोणताही आधार नसताना खंबीरपणे उभे राहून तिने गड्या सारखं कष्ट आयुष्यभर केले पण आता तिला मात्र हे जबाबदारीचं ओझं नकोसं झालं होतं . अगोदर तिचा आवाज खूप चांगला होता नंतर मग अभंग आणि. गवळणी यांची आवड तिला निर्माण झाली.

 

           पाऊले चालती पंढरीची वाट

 

           सुखी संसाराची सोडुनिया गाठ

 

खरोखर आता जिजीला भजन आणि कीर्तनामध्ये रस यायला सुरुवात झाली होती . तिला आता आताशा भक्ती मार्गामध्ये आनंद मिळायला सुरुवात झाली होती .जणू काही तिला जगण्याचा एक नवीन मार्ग मिळाला होता . खरोखरच जिजीने आता संसारातून डोकं हळूहळू बाजूला काढलं .दोन्ही मुलांवर घराची जबाबदारी देऊन तिनं वारकरी संप्रदायाला जवळ केलं. डोक्यावर तुळशी घेऊन अभंग, गवळणी गात स्वतःच्या समाधानासाठी जिजी पंढरपूरला डोक्यावर तुळस घेऊन चालत जाऊ लागली.

 

 

 

 

क्रमशः

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू