पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

20-21 नोव्हेंबर

20-21 नोव्हेंबर 

ठरल्याप्रमाणे आम्ही 12.30 वाजता रेल्वे स्टेशनवर हजर झालो. दीडची ट्रेन होती, पण 44 जणांचे सामान चढवायचे, सीट बघायच्या उगाच काही गोंधळ नको म्हणून आम्हाला लवकरच बोलावले होते. त्याप्रमाणे सर्व जण वेळेत हजर झाले. आणि प्रवासाला सुरुवात झाली. पुण्यापर्यंत रेल्वे जरा स्लो होती, पण गर्दीही कमी होती त्यामुळे प्रवास रिलॅक्स झाला. जास्त कोणाची ओळख नव्हती. पण आम्ही चौघं होतो त्यामुळे मस्त टाईमपास होत होता. (मी, प्रतीक, पराग आणि माझी वहिनी) असे आम्ही मस्त गप्पा मारत, एंजॉय करत प्रवास करत होतो. बर्‍याच दिवसांनी रिलॅक्स असा वेळ मिळाला होता. त्यामुळे तो शांतपणा पण हवाहवासा वाटत होता. मध्येच स्वरूप आणि वैभव येऊन सगळ्यांची चौकशी करून जात होते. एकंदर ट्रीपची सुरुवात छान झाली होती. दुसर्‍या दिवशी अहमदाबादला उतरलो. तिथं आमच्यासाठी 8 दिवस ठरवलेली ट्रॅव्हलर गाडी हजर होती. त्यात सामान चढवलं गेलं. सामानासाठी कुली केले होते. कुठेही आम्हाला सामान वागवावं लागलं नाही हा या ट्रीपचा प्लस पॉईंट होता.

अर्ध्या तासाने नाश्ता वगैरे करून आम्ही परत जुनागढच्या प्रवासाला लागलो. बसमध्ये सगळ्यांची ओळख हळूहळू होत होती. संध्याकाळी पाच वाजता गिरनारला पोहोचलो. हॉटेल क्लीकमध्ये. मग हॉटेलच्या रूम ताब्यात मिळणे, फ्रेश होणे झाले आता सगळ्यांच्या समोर एकच प्रश्‍न होता. गिरनारच्या मंदिरात कसं जायचं? रात्री चालायला सुरुवात करायची? रात्री किती वाजता बाहेर पडायचं? का सकाळी रोपवे ने जायचं? 

प्रत्येक जण काहीतरी सांगत होतं, काहीजणांनी तर जंगली श्‍वापदं दिसतात असं पण सांगितलं होतं. (सुदैवाने आमच्या ट्रीपमध्ये तसं कोणालाही काही दिसलं नाही.) थंडी, वारा पण प्रचंड होतं हे कळत होतं. वर टॉयलेटची काही सोय नाही हेही कळलं होतं आणि ते खरंही होतं. 

प्रतीक, रवि दादा, घोटणे फॅमिलीतील मोहिनी आणि तिची आई (वय वर्षं65), गावकर काका-काकू यांनी चालत जायचा निर्णय घेतला. मला काय करावं कळत नव्हतं. खरंतर चालत जायची खूप इच्छा होती, पण शेवटी तो बेत रद्द केला आणि रोपवेने जायचा निर्णय घेतला.

गिरनारसाठी चालत जाणारी मंडळी रात्री अकरा वाजता निघाली आणि आम्ही झोपेच्या अधीन झालो. 

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू