पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

 "मन झाले विरागी "   भाग दोन

हळूहळू अविनाश लक्षात येत होते. ऑफिसला जाताना नयनाचे छान तयार होणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे .

 

ऑफिसमध्ये तर स्टाफ मध्ये ती नसताना त्यांच्या रिलेशन बाबत बरेच बोलले जात असत.

 

          एक दिवस  नीरज ने सरळ-सरळ तिचा हात हातात घेत तिला विचारले आर यु इंटरेस्टेड? किती दिवस अश्या गोष्टी लपवणार

 

किती दिवस अशा गोष्टी लपवणार?  

 

           एक दिवस तिने अविनाश जवळ विषय काढला" मला नीरज ची सोबत हवी आहे .तुमचा माझा स्वभाव वेगळा आहे मी नाही ऍडजेस्ट करू शकत".

 

 अविनाश खरेतर हादरले," तू त्याच्याबरोबर खरंच सुखी होशील? आहे तुला गॅरेंटी"? पण मग पुढे स्वतः म्हणाले "माझ्या सोबत तरी तू कुठे खुश आहेस तरीपण परत विचार कर घाईघाईत निर्णय घेऊ नको."पण नयना ला घाई होती. नीरज सारख्या साथीदाराचे स्वप्न तिला साद घालत होते.

 

प्रेमात कुठे विचार करत?

 

नयना च्या इच्छे पुढे अविनाश ने मान झुकवली. डिवोर्स लगेच मिळाला. सगळे बंध तोडून ती मिसेज प्रधान झाली.

 

आठ दिवस उटी ला फिरून नयना आणि  नीरज दोघे परत कामावर रुजू झाले. हे आठ दिवस किती लवकर गेले कळलेच नाही. नयना नीरज च्या प्रेमात चिंबचिंब भिजून पूर्ण उमललेल्या फुलागत मोहक सुंदर दिसत होती.

 

ऑफिस मध्ये पोहोचल्या वर मीनल हळूच जवळ येऊन कुजबुजली  वा काय दिसते स ग" दृष्ट काढायला हवी तुझी"

 

एक महिना  सरता सरता नीरज ने त्याची ट्रान्सफर जुन्या ब्रांच मध्ये झाल्याची बातमी दिली. प्रमोशन असल्याने नयना ने ते सहज स्वीकारले, या नव्या घरापासून तिचे ऑफिस खूपच जवळ होते त्यामुळे तिला नीरज साठी बराच वेळ काढता येई, त्याच्या आवडी निवडी, बरोबर फिरणे, संध्याकाळी किंवा रात्री  लॉंग ड्राईव्ह सर्व स्वप्नात असल्यासारखे अनुभवत होती ती. 

 

 नीरजहळूहळू बिझी होत गेले असे सहा महिने भुर्रकन गेले. तरीही दोघे खूप आनंदात होते .

 

पण-- या सर्व सुखाला अचानक कुणाचीतरी नजर लागली. भरतीनंतर ची ओहटी सुरू झाली.

 

नयनाला मेनोपॉज चा त्रास सुरू झाला. लेडी डॉक्टर ला दाखवून काही औषधे घेऊन झाली. काही महिने त्यामुळे ठीकठाक गेले पण परत तक्रार सुरू झाली ऑफिसमधून ही तिने सुट्टी घेतली असे मधून मधून व्हायला लागले.

 

एक दिवस ऑफिस मध्ये बॉस ने विचारले "काल तुम्ही पार्टीला नव्हता मिस्टर प्रधान  एकटेच होते ?

 

  नयना ने तब्येतीचे कारण पुढे केले ,पण खरेतर तिला या पार्टी च काहीच माहीत नव्हते. तिने  नीरज जवळ विचारणा केली. त्यांनी "तुला बरे नसल्याने नाही विचारले" असे म्हणून वेळ मारून नेली. 

 

नयना मनातून दुखावली, नीरज आपल्यापासून दुरावतो या कल्पनेने ती सावध झाली नीरज च्या मर्जीनुसार वागून त्यांच्या आवडीप्रमाणे त्याला खुश ठेवायचा प्रयत्न करू लागली.    

 

         लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले ते  दोघं सुट्टी घेऊन फिरायला महाबळेश्वरला गेले, नयना खूपच उत्साहात होती. पण परत येताच तिच्या उत्साहावर पाणी पडले नीरज ला कंपनी दोनमहिन्यासाठी जर्मनीला पाठवत होती.

 

नीरज साठी हे सर्व नवीन नव्हते मागे बर्‍याच कंपन्यांच्या कामासाठी त्यांनी विदेश दौरे केले होते .

 

नयनाला सुट्टी घेणे शक्य नव्हते व सध्या तिची तब्येत ही ठीक नव्हती, त्यामुळे हे दोन महिने तिला एकटे पण सहन करणे भाग होते.

 

ती व  नीरज रोज व्हिडीओ कॉलिंग करून बोलून घेत होते पण कधीकधी दोघांच्या वेळा जमत नसत दोन महिने असेच गेले, नयना निरज ची आतुरतेने वाट पाहत होती.

 

 नीरजच्या येण्याची तारीख जवळ आली.

 

 नयनाने त्यांच्या स्वागताची तयारी केली.

 

              " नीरज आले, ते श्रावणातल्या मेघा सारखे, थोडे बरसले नी निघून गेले परत दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावर. नयनाला काहीही कल्पना न देता.

 

कुठेतरी काहीतरी चुकतय असे नयनाला आतून जाणवत होते

 

." मुठ्ठि जितकी घट्ट करावी वाळू तितकीच जास्त हातातून निसटून चाललीये व हातात काहीच उरत नाहीये".

 

 ज्या नीरज सोबत घरटे बांधून तिने संसार करायची स्वप्न पाहिले तो तर प्रवासी पक्षी निघाला, तिला एकटे टाकून तिचा हंस उडून गेला ,परत कधी येईल किंवा नाही व आल्यावरही त्याला स्वतःमध्ये किती काळ गुंतवून ठेवू शकते? ह्याचा काहिच अंदाज येत नव्हता.

 

निरज च्या मनाचा  ही  थांग लागत नव्हता. व   शरीराचे ऋतुचक्र ही आपल्या हातात नाहीं हे आतून नयना ला जाणवू लागले.

             ज्या कारणास्तव तिने अविनाश ला दुखावले तेच सत्य आता तिच्यासमोर उभे होते, पण या वेळेस गुन्हेगाराच्या पिंजर्‍यात ती उभी होती.

 

         नीरजला तिने  विचारले, तेव्हा मग ते स्पष्ट बोलले, ते तिच्यासाठी स्वतःचं करिअर , Spoil नाही करू शकत एकाच जागी फार दिवस राहण्याचा त्यांचा स्वभावही नाही, सत्य समोर आले तेव्हा मग नयनाने स्वतः आपणच त्यांना मोकळे करावे असा निर्णय घेतला.

 

 आता आपल्याला एकट्याने आयुष्य काढायचे या कल्पनेने तिच्या मनाचा तोल सुटत होता.

 

नीरज ने घर नयना च्या नावाने केले होते, आर्थिक काळजी नव्हती पण, आपण हरलो या भावनेने ति खचली.

 

. ऑफिस मध्ये  हळूहळू बातमी पसरली. मीनल ने तिला एकट्यात विचारले तेव्हा मात्र नयनाच्या मनाचा बांध फुटला. मीनल च्या गळ्यात पडून तिने मन मोकळे केले.

 

        " सुख मला अशी हुलकावणी का देते, ज्या सुखा साठी मी  अविनाश ना सोडले, ते सुख मला नीरज ने दिले पण ते क्षणभंगुर ठरले. माझी ओंजळ परत रिकामीच राहिली. मी इकडची ना तिकडची राहिले"

 

"अगं पण  नीरज ला कां तू सोडते?

 

"नीरज  मना नी  माझ्यापासून दूर गेलेत हे मला जाणवते आहे,.   त्यांनाबांधून ठेवण्या इतका मजबूत रेशीम धागा माझ्याजवळ नाही ,तेव्हा त्यांना मोकळे करणे हाच पर्याय माझ्यापाशी आहे.

 

   "पण मग आता "?

 

अविनाश कडे परतण्याचा मार्ग मी स्वतः बंद केला. पुढचे अजून काहीच ठरवले नाही.

 

पुढचे काही दिवस नयनाने सुट्टी घेतली. नीरज चे हे मोठे घर सोडून दोन खोल्यांचे छोटे घर भाड्याने घेऊन मोजके  सामान घेते या घरात शिफ्ट झाली.

 

 ते घर , त्या सुखद आठवणीं पासून दूर जाण्याचा हा एक असफल प्रयत्न होता

 

        नयनाला सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली. आज तब्येत थोडी बरी वाटत होती. हिम्मत करून तिने  स्वतः उठून चहा केला, व बाकीचे आवरले.

 

.           आज ऑफिसला जायला हवे कामात दुर्लक्ष करुन चालणार नाही. बॉस सुट्टी संपून परत येण्याच्या आधी पेंडिंग कामे हातावेगळी केलेली बरी.

 

         पुढचे काही दिवस मग नयनाने स्वतःला कामात झोकून दिले, घरी आले की खूप थकलेली असायची

 

. मीनल एक दिवस बोलली ही, " अगं आत्ता कुठे तब्येत सुधारते आहे इतके स्ट्रैस बरे नव्हे", पण जुन्या आठवणीतून बाहेर पडायला हा एकच मार्ग तिला दिसत होता.

 

           ऑफिस मध्ये पोहोचते तो मीनल वाटच पाहत होती.नैना ,काल तू येशील असे वाटले होते,

 

"अग पण काय झाले ते तर कळू दे."

 

"म्हणजे तुला काहीच माहित नाही अगं संपदा, तुझी लेक, तिचा साखरपुडा होता काल .तुझा तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नाही का"?

 

 

नयनाला आतून भरून आले. तिच्या मुलीने अजूनही माफ केले नाही, स्वतःचे सुख शोधताना बरेच काही हरवून बसल्याचे जाणवले. डोळ्यांचे डोह भरून येतात असे वाटताच ती वॉशरूम कडे गेली, उगाचच स्टाफ मध्ये चर्चेला विषय नको.

 

       लंच मध्ये प्यून ने इन्व्हिटेशन कार्ड देत बातमी दिली," उद्या रविवारी, बॉस पार्टी देतात आहे नातू झाल्याची."

 

     नयनाला आताशा पार्टीत जाणे नको वाटत असे ,ती नाही म्हणेल हे ठाऊक होते .

 

 मीनल ने तिला, "मी तुला पिकअप करायला येईन, शार्प बाराला तयार रहा काही कारण सांगू नको" असे म्हणून पार्टीत नेलेच.

 

            पार्टी खूपच भारी होती आर्केस्ट्रा, गाणी, ड्रिंक, जल्लोष,   नीरज बरोबर अशा पार्टीज ना ती नेहमी जात असे तेव्हा त्या छान वाटायच्या पण आता सगळाच चार्म गेला.

 

सक्सेना साहेबांना गाण्याची खुपच आवड ,त्यांनी नेहमीप्रमाणे नयनाला 'आपकी सुरीली आवाज मे, कोई गझल सुनाइये ना' म्हणून आग्रह केला.

 

 नयनाला  नीरज ची राहून राहून आठवण येत होती मन ही उदास होते तेव्हा,  तिच्या ओठी,

 

"किसी नजर को तेरा इंतजार आज भी है" ही गज़ल होती. गाता गाता ती भावनाकुल होत गेली, इतके दिवस मनात लपवलेले दुःख गाण्याच्या रूपात व्यक्त होत होते. अंतरा सुरु होता

- होता तिचे अवघे शरीर कापायला लागले. डोळ्यासमोर गडद अंधार पसरला नि ती खाली पडली....

 

-------------------------------------------क्रमश:

 

 

 

 

    

 

 

 

 

 

_________________________

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू