पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विश्वशांतीच्या पथावर ........

विश्वशांतीच्या पथावर विश्वयात्री चालले

सत्य शिव अन सुंदराचे वीर सैनिक चालले ll

 

मार्गिच्या काट्याकुट्यांना पुष्पशैया मानुनी

भडकत्या दावानलांना कंठी अपुल्या धारुनी

बांधल्या बेड्या पुरातन ताडताड त्या तोडुनि

दिव्यतेचे भव्यतेचे स्वप्न घेउन चालले ll

विश्वशांतीच्या....

 

विश्वशांती ध्येय अमुचे धर्म मानव बंधुता

भेद अवघे भेदुनीया आणु येथे एकता

पंथपंथा सारुनीया दूर बघुया एकदा

मानवाच्या मुक्ततेचे वाजवूया चौघडे ll

विश्वशांतीच्या....

 

दहशतीच्या कालियाला आज पुन्हा ठेचण्या

नीतिमुल्ये संस्कृतीचे बीज पुन्हा पेरण्या

भ्रष्ट स्वार्थी दुर्जनांना सर्वथा संहारण्या

सत्य शिव अन सुंदराचे वीर सैनिक चालले ll

विश्वशांतीच्या पथावर वीर सैनिक चालले...

 

पंथवेड्या शृंखलातुन मानवाची मुक्तता

भूक गरिबी संपवूनी आणू येथे संपदा

सुजल सुफला मायभूला स्थापिण्याला गुरुपदा

हाती घेउन शीर अपुले भारतीपुत चालले

सत्य शिव अन सुंदराचे वीर सैनिक चालले...

 

               कवी -- अनिल शेंडे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू