पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

१. व्यक्ती आणि वल्ली

आयुष्याच्या वळणावर भेटलेली प्रत्येकच व्यक्ती आपल्याला आठवते असे नाही. पण काही वल्ली असे असतात जे अगदी मनात घर करून बसतात. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले पु.ल.देशपांडे यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटलेल्या अश्याच २० व्यक्ती वल्लींची व्यक्तिचित्रे त्यांनी रंग उधळून उभारली आहेत. हे व्यक्ती कधीच कोणाला भेटले नसून प्रत्येक वाचकाला आपलेसे वाटतात. भाई आपल्या लेखणीने ही व्यक्तिचित्रे उभी करताना वाचकांना हसवतानाच अनेक गोष्टींची जाणीव देखील करून देतात. कोणत्याही वयोगटाला सकस वाटेल असं हे साहित्य 'वन्स इन अ बिलियन इयर्स' असे म्हणणे देखील अतिशयोक्ती ठरणार नाही असे आहे.

नारायण डोळ्यापुढे लग्न उभं करतो, हरितात्या थेट इतिहासाच्या गल्लीबोळांत आपल्याला नेऊन सोडतात. नामू परिटासारखा सदा कपड्याच्या दुनियेत असणारा नागवा माणूस विसरू शकत नाही. सखाराम गटणे सारखा निर्मळ, थोडासा बावळट पण लाघवी असा वल्ली प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. नंदा प्रधान आणि भैय्या नागपूरकर यांसारखे समाजाच्या चौकटीच्या पलीकडले वल्लीही मिळतीलच. 'बाबा रे' म्हणत फिरणाऱ्या नाथा प्रधान आयुष्यातील रोमिओ मित्रांची आठवण देतो. चितळे मास्तरांच्या झिजलेल्या टाचा डोळ्यांच्या काचा साफ... करतात! परोपकारी गंपू दुसऱ्यासाठी जगण्याची गम्मत उलगडवतो तर पेस्तनकाका १००% जीवन प्रवास उलगडतात. अंतू बर्वा आणि मित्रमंडळी ह्यांचे खोचक पण तितकेच वास्तववादी शेरे आणि आपसूकच एकटेपणात मनात सुरुंग करणारी एक विदीर्ण पोकळी तुम्हांला अस्वस्थ करत राहील.

असे हे प्रेमळ आणि गमतीदार पुस्तक आणि त्यातील वल्ली असलेल्या व्यक्ती आपल्या शाब्दिक सहवासात वाचकांना हास्याचे स्फोट देत मनातील बुरशी अलगद काढून आयुष्यावर प्रेम करायला नक्कीच शिकवतात!

 

पु.ल.देशपांडे यांना शतशः नमन!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू