गणेशोत्सव चारोळी
गणेशोत्सव चारोळी
१) आस लागली बाप्पा तुझ्या येण्याची
तुला डोळे भरून पाहण्याची
गणराया तुझ्या आगमनाची
वाट पहाते त्या सोनेरी दिवसाची
२) बाप्पा येईल माझ्या घरी
शोभा येईल माझ्या दारी
संकट घे तू निवारूनी
आशीर्वाद राहू दे तू माझ्यावरी
३) स्वागतासाठी सजली अवघी धरती
मन प्रसन्न होते पाहून तुझी कीर्ति
ढोल पताका सज्ज होऊनि
आतुरता आहे तुझ्या आगमनाची
४) आवाज घुमतो चारी दिशात
सुरू झाली गणेशोत्सव ची तयारी
येता गणेश घरोघरी जणू
चकमकली ही सोन्याची नगरी
५) गजर होतो साऱ्या दिशात
सुरू आहे तयारी जोमात
येता गणेश आपल्या घरी
तोरण पताका लावू घरात
६) शिवशंभू पार्वतीचे बाळराजे
बाप्पाचे गोडस गजरूप सजले
लाडू मोदकाचा प्रसाद करून
तुझ्या स्वागतासाठी सज्ज झाले
७) हरिसी विघ्न सर्वांचे
असा तू गणांचा राजा
स्वीकार कर चरणी
साष्टांग दंडवत माझा
८) सिद्धीविनायक गणनायक
गाते तुझे गुणगान
शुभकार्याच्या पूजेत बाप्पा
तुझाच पहिला मान
९) बाप्पा तुझ्या पूजेला
दुर्वा फुल जास्वंद
तुझ्यासाठी मोदक बनविताना
मन होते प्रसन्न
१०) मोदकाचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजविला
मुशकावर स्वारी करत
माझा गणपती बाप्पा आला
११) चरणी तुझ्या वाहीनं
जास्वंद आणि दुर्वाची जुडी
उंदीर मामाचे लाडके स्वामी
वाढावी आनंद मोदकाची गोडी
१२) भरलाय मनी तुझ्या
नव्या रूपाचा ध्यास
पूर्ण कर बाप्पा तू
सर्व भक्तांची आस
सुरेखा नंदरधने ✍️
नाशिक
मो नं 9970761728