पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

राधे- एक सामाजिक चलचित्र

राधे- एक सामाजिक चलचित्र

सध्याच्या ह्या कोविडच्या अशांत काळात, आपले मन फारच अस्थिर झाले आहे बाहेरील परिस्थिती मुळे, मनात नकोसे विचार फार येतात , ह्या वर उत्तम पर्याय राधे ( राधा नव्हे) हा सिनेमा आहे. मनोरंजना बरोबरीने सामाजिक बांधिलकी जपत संदेश पण दिला आहे.

सिनेमाचा व्हिलन हा परप्रांतीय असून भूमीपुत्र च्या रोजगार वर टाच आणत आहे.  त्यामुळे परप्रांतीय व स्थानिक असा संघर्ष आहे.
हिंदू मुस्लिम समाजातील दोन डॉन ह्यांना एकत्र करून बाहेरील शक्तीं विरुध्द लढ्याचे शिकवण दिली आहे.

चालणे ,पळणे, सायकल चालवणे ,अन आपल्या शर्ट रहित शरीराचं दर्शन देऊन, तरुणांना व्यायामाचे महत्त्व पटवून दिले आहे.  आणि तरूणींना हेरॉईन ने beauty with brain  चा संदेश दिला आहे.

लहानपणी शाळेत असताना आपण करंगळी दाखवून वर्गातून बाहेर जात होतो, इथेसुध्दा मोठ्या लोकांनी करंगळी दाखवून आपले लहानपण कसे जपावे हे सांगितले आहे. त्याच बरोबर संबंधित health इशू कसे टाळावे हे पण शिक्षण मिळते.

मोटारसायकल  चालवताना हेल्मेट घालणे कसे जरूर आहे, अन वेळ पडली तर स्वरक्षण साठी ते काढून कसे मारावे याचे उदाहरण दिले आहे.

वेगवेगळ्या प्रकारे शिट्टी कशी वाजवावी ह्याचे प्राथमिक ज्ञान दिले आहे, लोकडाऊन च्या रिकाम्या वेळात तुम्ही शिकू शकता.

दारू, सिगारेट, पब, हे सगळे ठीक आहे पण कोकेन ची नशा वाईट आहे हा थोर सामाजिक संदेश दिला आहे.

आता जास्त विचार न करता आपल्या जबाबदारी वर हा सिनेमा आपण पाहू शकता.

हेमंत

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू