पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रस्तावना व मनोगत

वाचक मित्र-मैत्रिणींनो, नमस्कार. 

असंख्य वाचकांच्या प्रतिक्रियेमुळे माझ्या लेखणीला बळ मिळाले. तसेच शॉपीझेनचे देखील मनस्वी आभार. त्यांच्यामुळे तर माझे साहित्य आपल्या पर्यंत पोहोचत आहे. आपल्यासमोर मी एक माझी नवीन कादंबरी घेऊन येत आहे. मला आशा आहे, ही कादंबरी देखील आपणाला नक्कीच आवडेल.  


प्रस्तावना

आपल्या कादंबरीची नायिका आहे सुधा, जिच्या जीवनात अनेक चढ-उतार आले तरी ती त्या सर्व संकटांना धैर्याने तोंड देऊन सामना केला. तिने स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भरपणे जीवन जगण्याचा जो साहस दाखविला तसा साहस प्रत्येक महिलेने दाखविला पाहिजे. महिलांनी आता आत्मनिर्भर होऊन जगणे आवश्यक आहे. महिलांना पन्नास टक्के राखीव जागा मिळून ही म्हणावी तशी प्रतिष्ठा व मानसन्मान मिळतच नाही. कारण महिलांनी अजूनही स्वतःच्या प्रतिभेला ओळखले नाही. म्हणून प्रत्येक महिलांनी स्वतःच्या प्रतिभा ओळखून जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवे आणि आत्मनिर्भर होऊन जगायला हवं, असा छोटा संदेश या कादंबरीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. 

- नासा येवतीकर, 9423625769


मनोगत

मी नासा येवतीकर गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्याने लेखन करत आहे. लेखनाची सुरुवात पंधरा पैश्याच्या पोस्टकार्डाद्वारे झाली. ज्यावर मी आपले विचार लिहून पेपरला पाठवित असे आणि ते विचार दैनिकांतून प्रसिद्ध होत असत. माझे विचार वाचून अनेकजण मला पत्राने प्रोत्साहन देत असत. हळूहळू माध्यम क्षेत्रात आमूलाग्र बदल होत गेला. पोस्ट कार्ड मागे पडले आणि मोबाईलद्वारे साहित्य पोस्ट होऊ लागले. काही काळानंतर मी स्तंभलेखन करू लागलो. कविता करण्याचा देखील छंद लागला होता. सोबत लघुकथा देखील लिहू लागलो. नियमित वाचन आणि लेखन चालूच होते. यातूनच मग दीर्घ कथा लिहिण्याचा विचार केला आणि या कादंबरीचा जन्म झाला. अजून एक विषय माझ्या डोक्यात आहे, त्यावर पुढील दीर्घ कथा लवकरच लिहिणार आहे. ही कथा वाचून आपल्या अमूल्य अश्या प्रतिक्रिया जरूर कळवावे. ही विनंती

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू