पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कलादर्शनप्रवाह

जागतिक कलादिवस 


१) नमस्कार मंडळी…


आज जागतिक कला दिवस…जेव्हा हे असं एखाद्या विशिष्ट दिवसांचं प्रस्थ नव्हतं तेव्हापासून म्हणजे अगदी बालपणापासूनच विविध कलांशी गट्टी जमली ती आता दुसऱ्या बालपणात प्रवेश केल्यानंतरही टिकून आहे. आणि मग ‘हा छंद जिवाला लावी पिसे’ या उक्तीप्रमाणे माझे हे छंद…जे अक्षरशः टाकाऊतून टिकाऊ ठरले…म्हणजे माझ्या जीवनाचा चैतन्यरस आहे असं म्हणायला हरकत नाही. जागतिक कला दिवसाच्या निमित्ताने फक्त आजच माझ्या सर्व कलांचे दर्शन घडवण्याऐवजी एका वेळेस एकच कला…कलादर्शनप्रवाह…सुरू करावा म्हणतेय…


आजची ही फ्रेम म्हणजे…


फक्त जाडसर कागदाच्या बारीक लांब पट्ट्या आणि सुई किंवा रिफील यांच्या सहाय्याने म्हणजे पेपर क्विलिंगने बनवलेली… 


आजची ही फ्रेम म्हणजे…


गुलमोहराच्या झाडाची लाल हिरवी-नक्षी 

त्यावर बसलेले आहेत दोन सुंदर पक्षी 


भारती महाजन-रायबागकर 

चेन्नई 

१५-४-२४

_______________________


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू