पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मन झाले विरागी(वीतराग)

 

#  * मनझाले विरागी . *     दीर्घ कथा भाग 1#

 

शिवाजी पार्क,--बस कंडक्टर चा आवाज येताच ,बसमधले इतर प्रवासी पटापट उतरले.  पण. नयना पेपर तोंडासमोर धरुन बसून राहिली. स्टॉप वर तिने अविनाश ला दुरूनच पाहिले होते, हा? आज इथे बस साठी?

तेवढ्यात बस सुरू झाली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला, व पुढच्या स्टॉप चे तिकीट घेतले.

 

अविनाश -- तिचा पहिला नवरा, त्यांचा सामना करण्याची तिची हिंमत  नव्हती .आपला पराभव झाला झाला, हे त्याच्या नजरेतून पाहणे तिला लज्जास्पद वाटत होते.

 पुढच्या स्टॉप वर उतरून तिने टॅक्सी केली व ऑफिस गाठले.

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर इतर सहकर्मी घाईघाईने निघाल्या.

 काय " नयना ओव्हर टाइम की काय"? तिची खास मैत्रिण मीनल ने विचारले.

"आता कुणाबरोबर?" एकीने हसत टोमणा मारला तो नयना ला जिव्हारी  लागला, तरीही वरकरणी न दाखवता नयना टेबल आवरू लागली.

 

              घरी आल्यावर कॉफी व बिस्कीट घेऊन टीव्हीवरचे चैनल बदलून बदलून मन रमवायचा बराच प्रयत्न केला.

           रात्री झोप लवकर येत नव्हती, सकाळी स्टॉप वर अविनाश ना पहिले, तसेच दिसत होते वरून शांत, मनातले न दिसू देणारे.

कां आपले धैर्य नव्हते त्यांचा सामना करण्याचे,?? मग तेव्हा कुठून आली होती हिम्मत एवढा मोठा निर्णय घेताना?

अविनाश तिला परत परत हेच समजावत होते, 'विचार कर अजून थोडा.'

पण-- तिला घाई झाली होती. फार दिवस दोलायमान मनस्थितीचा नयनाला त्रास होत होता, नयना ची आई, भाऊ सर्वच तिच्यावर नाराज होते. एवढेच काय तिची मुलगी संपदा, या सगळ्या पायी तिच्याशी बोलेनासी झाली.

नयना चा निर्णय झाला होता वयाच्या चाळिशीला तिने अविनाश ला डिवोर्स देऊन दुसरे लग्न केले.

स्वतःचा जॉब असल्याने आर्थिक अडचण नव्हती, पण-- जर नोकरी नसतीतर?--तर  नीरज ही भेटले नसतेच आणि ही पुढची फरफट---विचार करता करता डोळे जड व्हायला लागले.

             

             सकाळी जाग खूप उशिरा आली, उठायचीच  इच्छा नव्हती. तरीही बाथरूम कडे वळली. डोके गरगरते आहे असे वाटत होते, आताशा मधून मधून असे का होते? चहा प्यावा का? पण देणार कोण? पूर्वी सकाळचा चहा अवि करत, ती चहा समोर आला की उठायची.

 काल ते दिसल्याने जुन्या आठवणी जाग्या होत होत्या. त्यातून बाहेर पडायला हवे, हिम्मत करून तिने आवरायला सुरुवात केली.

     

       आज सुर्वे मॅडम सुट्टीवर आहे त्यांचेही काम काम पाहावे लागणार तेव्हा यायला उशीर होणार. दोन पोळ्या जास्तच करून ठेवाव्या आल्यानंतर  त्राण राहील का नाही कोणास ठाऊक?

.

पुढचे चार दिवस कामाचे प्रेशर वाढले, सुर्वे मॅडमनी सुट्टी आणखी वाढवली. घरी येताना बस मध्ये मीनल शी बोलताना जीव घाबरायला लागला, चक्कर आल्यासारखे वाटत होते," नयना तू चल बरं आजच डॉक्टर कडे" मीनल ने तिला डॉक्टर कडे नेले. वाटत होते त्यापेक्षाही बी.पी वाढलेले होते.

पूर्ण आराम नियमित औषधे अशा सूचनांचा मारा घेत नयना घरी आली. मीनल ने आज तिच्यासोबत थांबायचा निर्णय घेतला. पुढचे दोन दिवस ती औषधांच्या गुंगीतच होती मीनल ने नयना च्या आईला ही कळवले पण येणार नाही माहीतच होते. 

नयनाचीतब्येत थोडी स्थिरावल्यावर मिनल घरी गेली.

 

हे काय बरे झाले ? --किती स्वप्न पाहिली आणि काय मिळाले? झोपेच्या गोळ्यांची डोळ्यावर गुंगी असायची पण मनात विचार चक्र उलट्या दिशेने फिरत होते.

 

नीरजप्रथम भेटले तेऑफिसमध्ये, तिच्याच सेक्शन चे हेड म्हणून.

नेमके त्याच दिवशी नयना ला यायला उशीर झाला .घाबरतच  ती केबिनमध्ये गेली. हे येणारे बॉस जरा strict आहेत असे कानावर होते.

"काय मॅडम किती उशीर? आणि स्टेटमेंट ची फाईल कुठे?"

सॉरी सर ,म्हणत तिने फाईल समोर ठेवली. Boss खूपच  Youngआणि Smart आहे हे तिच्या लक्षात आले.

"हं--काम परफेक्ट आहे" म्हणत, हसत त्यांनी वर पाहिले, नयना ने ही स्माईल केले ,मनाचा ताण गेला.

          लेडीज स्टाफ मध्ये आताशा बॉस , हा चर्चेचा विषय असे, ते मॅरीड की अन मॅरीड, त्यांचे वय, ते किती हँडसम,बरीच वर्ष विदेशात होते, वगैरे वगैरे. त्याच सुमारास सरां साठी  वेलकम पार्टीही झाली. नेहमीप्रमाणे नयना चे गाणे झाले. त्याची सर्वांनी विशेषतः सर नीरज प्रधान यांनी तारीफ केली. त्यामुळे नयना खूपच भारावली होती त्याच मूडमध्ये तीगुणगुणतच घरी आली.

 

         घरी नेहमीप्रमाणे अविनाश कॉलेजमधून येऊन स्टडी मध्ये बसले होते .आणि लेक संपदा आपल्या मैत्रिणीकडे, घरातले असे वातावरण पाहून नयनाचा मूड ऑफ झाला. किती उत्साहात ती घरी आली पण तिचं कौतुक ऐकायला घरी कोणालाच वेळ नव्हता.

 

या प्रसंगानंतर तिचे मन तुलना करू लागले, नीरज प्रधान किती उत्साही वाटत .अविनाश मात्र नेहमी पुस्तक लायब्ररी यातच गढलेले असायचे, मग तिची चिडचिड व्हायची.

 मागे बरेच वेळा आईजवळ ती बोलली, पण आईचे नेहमीप्रमाणे अविनाशचेच कौतुक ",तुझी किती काळजी घेतात असा नवरा मिळाला भाग्य लागतं वगैरे". तिला नेमके काय हवे हे समजून घ्यायला कोणीच  तयार नव्हते .

 

तिला हवा होता तिच्यासोबत कधीतरी रोमॅण्टिक डिनरला जाणारा, कधीतरी बागेत बसून गप्पा मारणारा, तिच्यासोबत फिरणारा उत्साही साथीदार .यावरून तिचे अविनाश शी बऱ्याच दा वाद होत. तिला गाण्याची आवड होती तेव्हा तिच्या कलासक्त मनाची घुसमट होत असे. मग कधीतरी अविनाश तिच्यासोबत जात ही, पण मग त्यात तिला अपेक्षित असे थ्रिल नसे त्यामुळे मग इतके करूनही ती उदासच असे

 .तिला खुश करायचा अविनाश प्रयत्न करीत. तिला सकाळी चहा करून देत.

 वेळ मिळत नाही पाहून घर आवरून ठेवत .त्यांचे हे प्रयत्न पाहून तिला ओशाळल्या गत व्हायचे .मग मग तिने अपेक्षा करणे सोडले रुटीन जीवन आपल्या गतीने चाललेच होते.

 

        त्याच  सुमारास ऑफिसमधल्या सोहनींच्या मुलाच्या लग्नाचे रिसेप्शन होते. ऑफिसचा सगळा स्टाफ होता,  लेडीज स्टाफ मध्ये नीरजप्रधान सर डिव्होर्सी आहेत व एकटेच आहेत अशी खुसुर पुसुर चालली होती.

काही कुवाऱ्या कन्या त्यांच्या मागे पुढे करत होत्या.

पार्टी संपून घरी येताना  प्रधान सरांनी नयनाला" तुम्हाला घरी सोडू कां" असे विचारले. मीनल आली नव्हती तेव्हा मग, हो नाही करता करता नयना तयार झाली.

 नीरज चे सफाईदार गाडी चालवणे, त्यांच्या सूट ला येणार धूंद सुगंध सारे काही खूपचExciting होते.

       पुढचे दोन-तीन दिवस नयना नणंदेकडे लग्न होते म्हणून रजेवर होती. रजा संपवून ऑफिसमध्ये येताच मीनल ने" सर तुझी विचारपूस करत होते "म्हणत चिमटा काढला. मनातल्या मनात नयना खूप सुखावली.

           हळूहळू नयनाच्या वागण्यात बदल होत होते, आताशा अविनाश सोबत ती Bed-Share करताना काही ना काही कारण सांगून त्यांना टाळत असे, तिच्यात  होणारे बदल हळूहळू अविनाश च्या लक्षात येत होते. पण असे काही असेल याची त्यांना कुठे कल्पना होती.

 

     ऑफिसमध्येही टी -टाईमला बरेच वेळा ती  व नीरज बरोबर असत. तिच्या सहकर्मीच्यां हे लक्षात येत होते. मीनल ने तर, ,,"हे सीकेपी लोक गोड बोलण्यात एक्सपर्ट असतात," असा इशाराही दिला पण--, नयना तर वेगळ्या दुनियेत वावरत होती.

 

एक दिवस एका गाण्याच्या प्रोग्राम ची दोन तिकीट घेऊन  नीरजने तिला चलतेस का असे विचारले. तिला गाण्यात खूप इंटरेस्ट होता त्यामुळे ती सहज तयार झाली.

 त्या दोघांना तिथे बरोबर पाहणाऱ्या मध्ये तिची दूरची नणंद ही होती. तिने घरी येऊन अविनाश समोरच विचारले नयनाची मुश्किल झाली.

 हळूहळू अविनाश लक्षात येत होते.पण  हे कसं थांबवावे कळत नव्हते.

क्रमशः

------------------------------------------

---------------------------------------



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू