पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ही पाल तुरुतुरु


( ही पाल तुरुतुरु, चढी भिंतीवरती हळु )

मराठीतील एक प्रसिध्द गाणे
ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु डाव्या डोळ्यावर बट सरली 
या चालीवर खालील रचना

मूळ गाणे ; शांता शेळके 
------------------------------ ---
ही पाल तुरुतुरु, चढी भिंतीवरती हळु
वरच्या खिडकीतुन आत सरली !
की उंचावरच्या कप्प्यात, अडगळीच्या जागेत पालीण सळसळली !!

कोळ्यांशी मैत्री जमव ना !
जाळिशी फिल्डिंग लाव ना !
शेपुट वळ वळ कर ना!
डासांवरती झडप घाल ना !
मनी खालुन जाता वरं वळुन पाहाता,
पाल संकटात सापडली !!

उगाच झाडू हाणून !
फवारा हिटचा मारुन !
शेपुट चाचपुन काठीन !
तोंड जरा दाबुन चपलेन !
हा त्रास जिवघेणा , सारा माणसांचा बहाणा,
आता माझी इथली ह्द्द संपली !!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू