पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अध्याय 1

 

माझ्या निवडक लघुकथा

मधुदीप

 

 

माझ्या निवडक लघुकथा

लघुकथा हा कथा कुटुंबाचाच एक महत्वाचा घटक आहे, यथा कादम्बरी, कथा किंवा नाटक. कुटुंबात ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तिच गुण-धर्म वेगवेगळे असतात, त्याच प्रकारे लघुकथेतील गुण-धर्म सुद्धा बाकी विधांपेक्षा वेगळे आहेत. लघुतत्वात विराटतत्व सादर करणे, हेच लघुकथाकाराचे प्रामुख्याने कौशल आहे. आपल्या समोर संपूर्ण सृष्टि आहे, या सृष्टिमध्ये पृथ्वी आहे, पृथ्वीवरील मनुष्य, मनुष्याचे संपूर्ण जीवन आणि त्या जीवनातील एक क्षण. हा प्रवास विस्तारातून अणुकडील असून त्याच अणुचे अचूक, उत्तमोत्तम वर्णन करणे, हे लघुकथेसाठी इष्ट आहे. त्याच लघुकथाकाराला खरे मानले जाणार, जो त्या एका क्षणाला उत्कृष्ट प्रकारे धरुन त्यातील संपूर्ण संवेदनांना वाचकापर्यन्त पोचवण्यात यशस्वी ठरत असेल. सृष्टिचे महत्व अफाट असले, तरीही आपण अणूच्या महत्वलाही कुठूनच कमी म्हणू शकत नाही। एक मनुष्याच्या जीवनात कितीतरी महत्वाचे क्षण असतात, आणि ते कादम्बरी किंवा कथा लिहित असलेल्या लेखकाच्या दृष्टिआड होतात, आणि यामागचे कारण अर्थातच, त्यावेळेस लेखक समग्र जीवनावर आपले लक्ष्यवेधन करत लिहित असतो. पण लघुकथाकार त्या अचूक क्षणांनाच टिपतो, जे महत्वाचे असूनही एक कादम्बरीकाराला टिपता येत नसतात. त्या क्षणांची कथा, हीच लघुकथा असते आणि हेच गुण-धर्म या विधेला वैशिष्ट्य देत असून हाच अलंकार त्यांना बाकी विधांपासून वेगळे अस्तित्वही देतो.

- मधुदीप

 

मधुदीप एक प्रयोगधर्मी लघुकथाकार आहेत. यांच्या मते कोणत्याही विधेच्या प्रगतिसाठी त्यासंबंधी निरंतर प्रयोग करण्याची नितांत गरज असते. आपले संपादन/संयोजन यात लघुकथा या विधेमधील विस्तृत मालिका ’पड़ाव और पड़ताल’ याच 30 पेक्षाही जास्त खण्ड प्रकाशित झाले आहेत. या संग्रहात आपल्या निवडक 66 लघुकथा सादर केलेल्या आहेत.


 

माझ्या निवडक लघुकथा

लघुकथाकार: मधुदीप

 

मराठी भाषांतर: अंतरा करवड़े
 

समर्पण

त्या सर्वांना

जे लघुकथा प्रवासात माझे सहयात्री आहेत!


 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू