पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अविस्मरणीय प्रवास

*मैत्रीणींंच्या बरोबर एक अविस्मरणीय प्रवास *

बऱ्याच दिवसापासून आम्ही मैत्रिणी खूप चर्चा करण्यात गर्क होतो आपण मैत्रिणी कुठे तरी प्रवासाला जाउया. आमच्यातुन नलिनी ताईनी खुप आग्रह केला की मी माझ्या मोठ्या मुलाकडे हैदराबाद ला उद्या जात आहे. श्रावण येतच आहे, तेव्हा तुम्ही पण या तिथे आपण सर्व मिळून हैदराबाद फिरू आणि मल्लिका अर्जुनला पण दर्शना साठी जाऊ . , ताई हैदराबादला पोहचली आणि फोनवर सारखेच विचारत होती रिझर्वेशन झाले का? शेवटी सगळ्यांनी आप,आपल्या घरी विचारले आणि माझ्या मुलानी आम्हा 6जणी (जयश्री ताई, शोभा ताई, मी ,(जया) विद्या, शैला, मंगल ) यांचे नवीन सुरू झालेल्या *हमसफर" ट्रेन चे जाण्यासाठी आणि परतीचे एयर टिकीट इंडिगोचे करून दिले आता आम्ही सर्व 60 म्हणून सर्वांच्या घरी रोज नवनवीन सुचना ऽ "काळजीपूर्वक हे ठेव, ते आणुन ठेवले आहे ती आपल्या जवळच असु देत" वगरै किती तरी..

काळजी घेतली जात होती कारण की आम्ही त्यांच्या दृष्टीनी अगदी एकटेच जात होतो न आणि आम्हा सर्वांना तर जणु काही पंखच आले होते अस वाटायला लागलं होतं की काय आणि कशी तैयारी करायची, रोज सकाळी वाकला भेटायचो तिथे स्वतंत्र ठरवलं जायचे, बरोबर खाण्यास कोरडे काय ठेवायचे, दोन वेळाचे जेवण ठेवायचे ,प्यायचे पाणी , कारणं 36तासाचा आमचा प्रवास होणार होता ताईच्या घरी पहिल्या अंदाज जायचे तर काही गिफ्ट आणि इंदोरी नमकीन घेवुन जायचे , मग ते आणायला कोणी दोघी किंवा चला आपण सर्वांनीच जाऊया, हे सगळं करताना खूप हुरूप येतं होतं मजा पण वाटत होती. शेवटी 2018ची 18, ऑगस्टची सकाळ आली आणि आम्ही 6 मैत्रिणी सकाळी 6वाजता आपल्या ड्रीम प्रोजेक्ट वर निघालो स्टेशनवर सगळ्यांना नीरोप देण्यासाठी घरची मंडळीपण स्टेशनवर बरोबर होती, गाडी चालायला सुरुवात झाली आणि घरच्यांंच्या,शुभेच्छा घेवुन आम्ही सर्वांनी आपसात गजानन महाराजांचा जयकार करुन आपल्या जागेवर येवुन बसलो आणि आमचा प्रवास सुरु झाला.

आता आम्ही 36 तास या ट्रेनच्या बोगीत एकत्र रहाणार तसं आम्ही रोजच सकाळी कमीतकमी 15 ते 20 मिनीटे एकत्र असतोच पण तेव्हा एक तर सकाळची वेळ आणि प्रत्येकाच्या घरी काहीच्या काही आवश्यक जबाबदाऱ्या होत्या म्हणून इथे आता वेळेचा अजिबात काहीच बंधन नव्हता, किती वेळ गप्पा मारत बसलो कळलंच नाही कधी अंताक्षरी तर कधी गाणी कधी भेंड्या कधी पत्ते खेळण्यात वेळ केव्हा गेला कळलेच नाही.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू