पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गिरनार- गुजराथ ट्रिप

गिरनार गुजरात ट्रीप

पार्श्‍वभूमी 

2019 पासून कोरोनामुळे सर्वजण घरात बसून हैराण झाले होते. आता हळूहळू टूरीझम चालू झालं आहे, कुठंतरी जाऊन यायला हवं असं सर्वांनाच वाटत होतं. मी बरेच दिवस म्हणत होते, मला गिरनारला जायचंय. दत्तगुरुंचं दर्शन घेणं हे कारण तर होतंच, पण तरीही आणखीन एक विशेष आकर्षण म्हणजे म्हणजे दहा हजार पायर्‍या चढण्याचं साहस... ते आपल्याला जमेल का? किंवा जमवायचंच असा विचार मनात कुठेतरी सतत पिंगा घालत होता.

एक दिवशी आचनक एका व्यावसायिक ग्रूपवर गिरनार दर्शन अशी वैभवची पोस्ट आली आणि मी वरवर बघून मिस्टरांना आणि माझ्या मुलाला प्रतीकला ती पोस्ट फॉरवर्ड केली. नंतर मी विसरून पण गेले पण या दोघांनी ठरवलंच की, ‘‘आपण या ट्रीपला जायचंच.’’ मग काय चौकशी, फोनाफोनी सुरू झाली आणि कळलं की, वैभव माझा भाचाच लागतो. स्वरूप आणि वैभव दोघंही घरी आले त्या दोघांशी बोलल्यावर मग तर काय? फायनलच झालं ट्रीपचं. 

ट्रीपच्या आधी भटकंतीच्या ऑफिसमध्ये छोटंसं गेटटुगेदर ठेवण्यात आलं आणि तिथूनच ट्रीपला सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. सर्वांच्या ओळखी झाल्या. स्नॅक्स, चहापाणी झालं. भटकंतीच्या सॅकचं वाटप झालं आणि तिथूनच धमाल मस्तीला सुरुवात झाली. 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू