• 22 December 2021

    भावविश्व

    अदृष्ट कुपोषण

    5 81

    मोठ्या पार्टीत निशीताला तिच्या आईने विचारले, “काय खाणारे बाळा? तुझ्या आवडते सगळे पदार्थ आहे इथे पिज्जा, मैगी...”

    थोडी अशक्त, चश्मा लावलेली, पण गोड दिसणारी निशीता तेव्हाच जोरात ओरडली, “आई पिज्जा...!”

    गुलाबजाम, रबडी, दूध-जलेबी, पनीरचे पदार्थ, वरणभात त्याशिवाय वेगवेगळे स्टॉल वर स्वादिष्ट व पौष्टिक पदार्थ होते, पण ते छोटे लाडके बाळ ब्रेड आणि मैगीत आनंदी होते. मुख्य म्हणजे आई वडीलही आनंदाने तिच्या कडे पहात होते.

    नक्कीच या पिढीतील खाद्यसंस्कृती खूप समृद्ध आहे. त्यांना जगभरातील वेगवेगळे खाद्यपदार्थ माहीत आहे आणि ते सहज त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. पिज्जाही पौष्टिक आहे पण पिज्जाबेसचे पीठ छान आंबवून त्यांच्यावर ताजे बनवलेले सॉस, त्यावर छान ताज्या भाज्या टाकून ते रीतसर बेक असावे.

    शरीरासाठी अहितकारक पावडर टाकून बनवलेले ब्रेड, त्याचबरोबरीने पैक्ड सॉस नक्कीच शरीरासाठी हितकारक नाही.

    नंतर मी पाहिले एका मोठ्या पार्टीचे उरलेले जेवण जवळच असलेल्या एका मंदिरात दिले जात होते. तिथेही लहान मुले होती आणि जे मिळेल ते आनंदाने खात होते.

    दुपारी भूख लागली की साद्यावरणात् गरम मसाला, तेल, मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि पोळी, गुळतूपपोळीचा लाडू, सत्तू, सगळं घरघुती पण खूप पौष्टिक आहार होते, हल्ली दुकानात सजलेल्या वेफर्स, बिस्किट, तेलकट भेसळयुक्त फरसाणाचे काळ आहे. हे सगळे पदार्थ किती जुने असतात ह्याची काही कल्पना नाही.

    नवी पिढी नक्कीच हूशार आहे, समृद्धीचा, उत्तम ज्ञानाचा वारसा घेऊन आली आहे. हाताच्या बोटावर संपूर्ण जगातील माहिती ठेवणारी ही पिढी, आयुष्याच्या मुख्य आधार म्हणजे सकस आहाराच्या बाबतीत समंजस असावी ही इच्छा आजच्या सदरमधे व्यक्त झाली.

    आपण सगळे सदर वाचता नंतर प्रतिक्रिया व्यक्त करता त्यासाठी आपले सगळ्याचें खूप-खूप आभार.

    सौ. मीनल आनंद विद्वांस

    -->

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
manoj patil - (03 January 2022) 5

0 0

श्री. संदिप पंडित - (01 January 2022) 5
खूपच छान लेखन

0 0

ऋचा दीपक कर्पे - (22 December 2021) 5
अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे, मुलांना योग्य, पौष्टिक, सकस आहार देणे फार गरजेचे आहे.

1 1

MR.POLLEX . - (22 December 2021) 5

1 1

Sarita Kothari - (22 December 2021) 5

1 1