• 05 January 2022

    भावविश्व

    अतरंगी रे

    5 85

    तरंगी रे

    अत्ताच नवीन रिलीज झालेले चित्रपट

     “अतरंगी रे” पाहिले. भावनिक खेळातील सखोल गुंतलेले चित्रपट सुरूवातीला एक सादे बॉलिवूड चित्रपट वाटते पण शेवटपर्यंत नक्की हे दुसऱ्या जगात घेऊन जाते. आईवडीलाच्या आकस्मिक धक्कादायक मृत्युनंतर एका मुलींच्या मनावर होणारे परिणाम, नंतर ती तिच्या सभोवतालच्या  माणसांबरोबर आपला भावनिक एकटेपणा लपवून, सगळ्यांशी वरचढ वागते. त्यांच्या प्रेम, मार कश्यालाही न जुमानता, ती त्यां माणसांबरोबर जगण्याचा प्रयत्न करते जे हयातीत नाही! ती आपल्या वडिलांना जीवंत ठेवते आपल्या मनात, ती त्याच्याशी बोलते, त्यांच्या बरोबर खेळते, खिदळते! तिच्या मनात खोलवर जाणीव असते की हे सगळं खोट आहे... तरीही ज्या लोकांनी तिच्या आईवडिलांचा अपघात घडवला, त्यांच्या बरोबर राहून ती त्या लोकांची भीती वडिलांच्या मानसिक उपस्थितीने भरून काढायचा प्रयत्न करते.

     लहान मुलांच्या मनात त्यांचे वडील कायमचे नायक असतात. तसे ते असायलाच पाहिजे कारण जसे एक आई असणे सोपे नसते, तसेच वडील असणे पण सोपे नसते! त्यांना त्यांच्या आयुष्यातील खूप मोठा काळ आपल्या घरच्यांसाठी सोयी आणि पैसा कमवण्यासाठी खर्च करावा लागतो. जग रहाटी प्रमाणे वडील ह्यांनी नेहमी आपल्या मुलांबरोबर कठोर वागले पाहिजे, मुलांना वडिलांची भीती वाटायला पाहिजे! तो व्यक्ती ज्यानी आपल पूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी मोजले... तो शेवटी कालबाह्य होऊन आपल आयुष्य ऐकटेपणाने जगतो! कारण भीतीपोटी मुलांबरोबर लहानपणी असणारे प्रेमळ नाते, मुलांच्या उज्वल भविष्यासाठी कठोरपणाने वागण्याने संपुष्टात येते किंवा मरणप्राय स्थितीपर्यंत पोचते.

    असो! आपण भावविश्वात नेहमीच अश्या कोणत्यातरी नात्यात किंवा मैत्रीत गुंतलेलो असतो! मात्र ती मानसिक गुंतवणूक कमी किंवा जास्त प्रमाणात असुनही, आपले ते विलक्षण वाटणारे मानसिक आधार आपल्यासाठी फार महत्त्वाचे असते.

    हे चित्रपट किती प्रसिद्ध झाले माहीत नाही! पण ह्या चित्रपटाने एका वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावले हे नक्की.

    काल रात्री न भूतो न भविष्यति अश्या आमच्या सगळ्याच्या श्रद्धास्थान सिंधू ताई सपकाळ ह्यांचे  दु:खद निधन झाले. कोणत्याही प्रकारचे आधार नसूनही त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले.

    त्यांना विनम्र श्रद्धांजली.

    नक्की आपल्याच मानसिक मृगजळाला आपण किती आहारी जायचे हे आपले आपणच ठरवायला पाहिजे.

    खर शॉपिजेन बरोबरचा माझा प्रवास फार उत्तम आहे. सर्वात आधी माझं हिंदी पुस्तक

    “सविता ताई गोडबोले एक कथक नृत्यांगना की जीवनी” प्रकाशित झाले.

    नंतर मराठी कवितांचे ई-पुस्तक “मी कविता करते” प्रकाशित झाले, नंतर हिंदी लघुकथा पुस्तक “उत्तरायण” “श्रावणधारा-१” “कसे असावे वर्ष २०२२ प्रतिनिधीक काव्य संग्रह” मधे माझे स्वलिखीत साहित्य प्रकाशित झाले.

    दर बुधवारी प्रकाशित “भावविश्व” ला आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद आणि प्रेम दिले, त्यासाठी आपले आणि मराठी शॉपिजेन प्रमुख ऋचा जी कर्पे ह्यांना खूप-खूप धन्यवाद.

    काही कारणास्तव मी काही दिवस आपल्या समक्ष सदर प्रस्तुत करू शकणार नाहीत...थोड्या काळानंतराने नक्की परत भेटूया भावविश्वात.

    सधन्यवाद...आपली

    सौ. मीनल आनंद विद्वांस

    -->

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
Smita Bhalme - (05 January 2022) 5

2 1

Lata Vidwans - (05 January 2022) 5

1 1

MR.POLLEX . - (05 January 2022) 5

1 1