• 30 March 2022

    भावविश्व

    परीक्षा

    5 119

    परीक्षा

      “परीक्षा” हा शब्दच फार गहन आहे. लहानपणी शाळेत परीक्षा सुरू झाल्यावर जी धाकधूक मनात असायची ती आजही आठवली की पोटात गोळा येतो. पण हळूहळू कळायला लागले की ह्या सगळ्यावर उपाय एकचं की आपल काम किंवा अभ्यास चोख असावा, त्याच्यात काही कमतरता ठेवायची नाही. हे कोणाला पटकन लक्षात येते कोणाला उशीरा...

       आज वळून पाहताना वाटते आता परीक्षा या शब्दाची जागा “अनुभव” या महत्वपूर्ण जीवनावश्यक शब्दाने घेतली आहे. ज्या गोष्टी शिकायला, कळायला कठीण वाटायच्या त्या सगळ्या  परीक्षेच्या यादीत टाकण्याची सवळ झाली. ते कठीण प्रश्न सोडवताना सहज एक-एक पायरी वर चढत आता प्रत्येक परीक्षेसाठी अनुभव हा शब्द मी वापरायला शिकले.

        लक्षात हे ही आले काय परीक्षा फक्त शाळेत असताना द्यायची, नाही मोठे झाल्यावर रोजचे येणारे काही विचित्र प्रसंग सुद्धा मोठ्या परीक्षे सारखे वाटतात. पण न घाबरता त्या प्रश्नांना समोर जायचा धाडस आणि आत्मविश्वास शाळेत होणाऱ्या परीक्षेमोळे सहज अंगवळणी होता.

       परीक्षा हे आयुष्यभर न संपणारे भाग आहे. शेवटी हे आता आपल्यावर अवलंबून आहे, परीक्षेच्या काळी भीतीने पाऊल टाकावे की अनुभव म्हणून नव काही शिकावे.

    सौ. मीनल आनंद विद्वांस

    -->

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
Veena Kantute - (01 April 2022) 5
खरं आहे. परिक्षा आयुष्य भर सुरू असते. कधी सोपा पेपर, कधी कठीण. आपली तयारी चोख करायची आणि नशिबाची साथ जेवढी मिळेल तेवढे यश हमखास! 😊

1 1

ऋचा दीपक कर्पे - (31 March 2022) 5
आयुष्यात आधी परिक्षा येते आणि मग आपण धडा शिकतो..... just opposite.....

1 1

Lata Vidwans - (31 March 2022) 5

1 1

Sarita Kothari - (31 March 2022) 5

1 1

MR.POLLEX . - (31 March 2022) 5

1 1