• 05 May 2022

    भावविश्व

    चैत्र गौर

    5 106

    का...ग! लक्षात आहे की नाही? आज गौर बसवायची आहे.” सकाळी-सकाळी आईचा फोन आला.

    “अग आई आता मी शाळेत जाऊ की घरी राहून हे सगळं करत बसु! नव शहर, नवी जागा, इथे मी कोणालाही ओळखत नाही! कोणाला हळदीकुंकू ला बोलवणार? तसेच खूप कंटाळा आला आहे ह्या नवीन शहरात! कोणी कोणाकडे जात नाही! आणि सगळांचे दार नेहमी बंद.” मी थोडे रागाने बोलले.

    “तू रोज पुजा करतेच ना! पाच मिनिटात एका चांदीच्या वाटीत छान तांदूळ भर, त्याच्यावर स्वस्तिक काढ आणि देवळातली गौर बसव..बाकीचे आपण नंतर बोलू.” मी  ऐकत नाही! असे पाहून आईने चक्क आदेश दिले.

    नवीन लग्न झाले आहे आमचे, सुरुवातीचे दिवस कसे निघाले कळलेच नाही! ऋषी रात्री उशिरा येतो, मी शाळेतून चार वाजता, कधी-कधी कोणाशी बोलावेसे वाटते पण कोणीच ओळखीचे नाही

    शेवटी मी तिच्या सांगितल्या प्रमाणे गौर बसवली. घाईघाईने शाळा गाठली!

    काय मंजुषा! आज गौर बसवली वाटतं.” जाताच देशपांडे मैडमनी विचारले.

    हो! तुम्हाला कसे कळले?”

    आज हळदी कुंकू लावले आहे! छान दिसते बरं.”

    मी हसले... रोज देवाच्या पूजेनंतर मी तयार होत असे, आज चेहरा पुसायचा राहिला  वाटतं...असो.

    आज ये संध्याकाळी हळदीकुंकू ला!” जवळच बसलेली प्रतिक्षा म्हणाली.

    हो नक्की येते.”

    मला रस्ते माहीत नव्हते! मग ऋषी आणि मी तिच्या घरी गेलो. ऋषी आणि प्रतिक्षाच्या नवर्याचे ही छान जमले खूप मज्जा आला.

     चैत्र गौरीचे सण म्हणजे निखळ आनंद ठरले, ऋषीच्या आईंनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी गौर बसवल्याबद्दल खूप कौतुक केले... दर तीन चार दिवसांनी कोणाकडे हळदीकुंकू चे आमंत्रण.. नव्या ओळखी...नंतर सासूबाईंनी भरपूर कंरज्या पाठवल्या, आईकडून डाळीची कृति घेऊन ऐकेदिवशी आमच्या घरी हळदीकुंकू केले. सगळ्यांना बोलवून मस्त चैत्र गौरी चे सण साजरे केले.

    “आई आज मस्त हळदीकुंकू झाले! खूप बरं वाटलं.”

    अरे व्वा! छान! पण तुझ्या लक्षात आले का? ‘नवीन शहरात करमत नाही’ असे बोलणारी आमची मुलगी आता अगदी आनंदाने बोलती आहे, “छान वाटतं आहे.”

    मग आम्ही दोघीही आनंदाने हसलो असो. नंतर अक्षय तृतीया ला, मी समाधानाने मदनबाणाचा  गजरा (आमच्या शहरात मोगरा ला मदनबाण म्हणतात बरं) गौरी ला वाहिला आणि दरवर्षी असेच आनंद आमच्या घरी येऊ देत अशी प्रार्थना केली.

    सौ. मीनल आनंद विद्वांस

    -->

    का...ग! लक्षात आहे की नाही? आज गौर बसवायची आहे.” सकाळी-सकाळी आईचा फोन आला.

    “अग आई आता मी शाळेत जाऊ की घरी राहून हे सगळं करत बसु! नव शहर, नवी जागा, इथे मी कोणालाही ओळखत नाही! कोणाला हळदीकुंकू ला बोलवणार? तसेच खूप कंटाळा आला आहे ह्या नवीन शहरात! कोणी कोणाकडे जात नाही! आणि सगळांचे दार नेहमी बंद.” मी थोडे रागाने बोलले.

    “तू रोज पुजा करतेच ना! पाच मिनिटात एका चांदीच्या वाटीत छान तांदूळ भर, त्याच्यावर स्वस्तिक काढ आणि देवळातली गौर बसव..बाकीचे आपण नंतर बोलू.” मी ऐकत नाही! असे पाहून आईने चक्क आदेश दिले.

    नवीन लग्न झाले आहे आमचे, सुरुवातीचे दिवस कसे निघाले कळलेच नाही! ऋषी रात्री उशिरा येतो, मी शाळेतून चार वाजता, कधी-कधी कोणाशी बोलावेसे वाटते पण कोणीच ओळखीचे नाही.

    शेवटी मी तिच्या सांगितल्या प्रमाणे गौर बसवली. घाईघाईने शाळा गाठली!

    काय मंजुषा! आज गौर बसवली वाटतं.” जाताच देशपांडे मैडमनी विचारले.

    हो! तुम्हाला कसे कळले?”

    आज हळदी कुंकू लावले आहे! छान दिसते बरं.”

    मी हसले... रोज देवाच्या पूजेनंतर मी तयार होत असे, आज चेहरा पुसायचा राहिला वाटतं...असो.

    आज ये संध्याकाळी हळदीकुंकू ला!” जवळच बसलेली प्रतिक्षा म्हणाली.

    हो नक्की येते.”

    मला रस्ते माहीत नव्हते! मग ऋषी आणि मी तिच्या घरी गेलो. ऋषी आणि प्रतिक्षाच्या नवर्याचे ही छान जमले खूप मज्जा आला.

    चैत्र गौरीचे सण म्हणजे निखळ आनंद ठरले, ऋषीच्या आईंनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी गौर बसवल्याबद्दल खूप कौतुक केले... दर तीन चार दिवसांनी कोणाकडे हळदीकुंकू चे आमंत्रण.. नव्या ओळखी...नंतर सासूबाईंनी भरपूर कंरज्या पाठवल्या, आईकडून डाळीची कृति घेऊन ऐकेदिवशी आमच्या घरी हळदीकुंकू केले. सगळ्यांना बोलवून मस्त चैत्र गौरी चे सण साजरे केले.

    “आई आज मस्त हळदीकुंकू झाले! खूप बरं वाटलं.”

    अरे व्वा! छान! पण तुझ्या लक्षात आले का? ‘नवीन शहरात करमत नाही’ असे बोलणारी आमची मुलगी आता अगदी आनंदाने बोलती आहे, “छान वाटतं आहे.”

    मग आम्ही दोघीही आनंदाने हसलो असो. नंतर अक्षय तृतीया ला, मी समाधानाने मदनबाणाचा गजरा (आमच्या शहरात मोगरा ला मदनबाण म्हणतात बरं) गौरी ला वाहिला आणि दरवर्षी असेच आनंद आमच्या घरी येऊ देत अशी प्रार्थना केली.

    सौ. मीनल आनंद विद्वांस

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
Manjiri Ansingkar - (08 May 2022) 5

1 1

स्नेहमंजरी भागवत - (07 May 2022) 5
छान आणि अनुकरणीय कथा आहे

1 1

संजय रोंघे - (06 May 2022) 5
खूप छान

1 1

उज्वला कर्पे - (05 May 2022) 5
छान कथा.

1 1

Seema Puranik - (05 May 2022) 5
👌खूपच साधी आणि सुंदर कथा

1 1

Veena Kantute - (05 May 2022) 5

1 1

Sarita Kothari - (05 May 2022) 5

1 1

View More