• 22 June 2022

    भावविश्व

    सर्वात चांगला मित्र

    5 68

     *सर्वात चांगला मित्र*

      डोळे उघडले तेव्हा आई जवळ होतीणि वडील लांबच होते. ते घरी येईपर्यंत मी झोपून जात असे, पण सुट्टीच्या दिवशी बाबा आणि मी सकाळपासून खेळायचो!  त्यांचा सहवास खूप आनंददायी होता, मी जे काही सांगायचो ते लक्ष देऊन ऐकायचे.  कधी-कधी आई ही आमच्या खेळात सामील व्हायची, एके दिवशी आईने मला विचारले, "बंटी तुझा संगळात् चांगला मित्र कोण आहे?"

     मी म्हणालो, "बाबा!"

     "दिवसभर माझ्यासोबत राहतो आणि तू वडिलांचे पोवाडे म्हणतो!"  आई म्हणाली!

     मी माझ्या वडिलांच्या डोळ्यात चमक पाहिली, ते म्हणाले, "आईला सांग की आम्ही तिघेही चांगले मित्र आहोत."

     पण आई म्हणाली, "असू दे, हा तुमचाच पोपट आहे!"

     मी मोठा होऊ लागलो, आई जवळच होती पण बाबा फक्त सुट्टीच्या दिवशी माझ्या बरोबर होते!

     आम्ही एक सुंदर घरात रहायला गेलो!  तिथे माझी वेगळी खोली होती!  मला घराभोवती नवीन मित्र मिळाले!  मला खूप आनंद झाला!  मी चुकीच्या संगतीत काहीतरी चूक केली, पहिल्यांदा माझ्या वडिलांनी मला खूप जोरात रागवले!  मला बाबांची भिती वाटत होती किंवा माझी चूक मान्य करण्याची भावना होती, हे कळलेच नाही,  पण नंतर त्या  मित्रांसोबत जायची माझी हिम्मतच झाली नाही.

     अभ्यास, नोकरी, लग्न सगळे झाले, आई अजूनही जवळ होती आणि बाबा फक्त माझ्या सुट्टीच्या दिवशी!

    नंतर ती ही वेळ आली जेव्हा मी बाबा झालो!  एक छोटा बंटी माझ्या मांडीवर होता!  प्रेमाच्या सागरात मी भिजलो होतो.  मी आता विचार करत होतो की त्याचे भविष्य कसे घडवायचे... आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण सर्व मुलांना कळते की त्यांचे वडील नक्कीच त्यांचे सर्वात चांगले मित्र असतात.

     सौ.  मीनल आनंद विद्वांस

    -->

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
संजय रोंघे - (24 June 2022) 5

1 2

Lata Vidwans - (23 June 2022) 4

1 0