रचना के विवरण हेतु पुनः पीछे जाएँ रिपोर्ट टिप्पणी/समीक्षा

कविता

भावनांना शब्द मिळता
बनते एक सुंदर कविता

स्वप्न जेव्हा शब्दरूप घेई 
एक कविता जन्माला येई

प्रणयाचा शृंगार सजता 
बनते एक प्रेमळ कविता

आईच्या मुखातून निघता
अंगाई बनते एक कविता 

मित्रांच्या मैंफिलित जेव्हा सजते
कविता अंताक्षरीतील गाणे होते 

प्रेमळ प्रार्थना भक्ताची ऐकता
देवास पण भावते कविता 
सौ. अनला बापट
२१/३/२५

टिप्पणी/समीक्षा


आपकी रेटिंग

blank-star-rating

लेफ़्ट मेन्यु