पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

केव्हांतरी पहाटे

आज सकाळी कोठून तरी हे शब्द कानावर पडले.... आणि डोळे उघडले... 


उठा उठा हो सकळीक । वाचे स्मरावा गजमुख ।

ऋध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ॥ ध्रु. ॥


लहानपणी आजोळी ही भूपाळी ऐकून झोप उघडायची. पहाटेचा गार वारा, अंगणातल्या खाटेवर येणारे ते कोवळे ऊन.. मोगरा, चाफा, शेवंतीचा दरवळणारा सुवास... 

चिमण्यांचा चिवचिवाट... फुलपाखरांचे भिरभिरणे..... 

हातात आयता चहा मिळाल्यानंतर आळस झटकून त्याची घडी करून ती घडवंची वर ठेवून घरात शिरताच...आजीच्या लाकडी देव घरातून येणारा धूप-दीप, गंध-फुले आणि उदबत्तीचा सुगंध..... 

कशी ती रम्य पहाट  असायची ...धार्मिक..सात्विक, सुंदर...!! 

स्वयंपाक घरातून येणाऱ्या हिंग-जिरेच्या फोडणीत, गप्पा रंगलेल्या... 

सात्विक चवदार स्वयंपाकासोबत स्वयंपाक घरात हसणारी ती गोड पाहाट.. 

मुलांची किलबिल.. चौकात चुल्हीवर ठेवलेल्या मोठ्या पातेल्यात उकळणाऱ्या गरम पाण्याच्या वाफेसारखी जादुई पहाट..! 

कुठे हरवली ती पहाट??? 

केव्हां तरी पहाटे मला आठवते ती पहाट....!! 

कारण आता असते...

मोबाईलचा कर्कश अलार्म.. त्याचे वायब्रेट होणारे मेसेज, दूध वाल्याचा हॉर्न.. कचरा गाडीचं सायरन...त्या कचऱ्याचा वास..

 टी.व्ही.वरल्या धडामधुडूम बातम्या... सांगणारी पहाट...!

"लवकर ऊठ रे, शाळेसाठी उशीर होईल" मुलांना दटावणारी पहाट..! 

"मावशी किती हा उशीर" भांडे वाल्या मावशींवर चिडणारी, आणि मग भांड्यांची आपटा आपट ऐकणारी ती रुक्ष पहाट... !! 

लोकलच्या गर्दीत घामाच्या धारांसोबत वाहणारी त्रासलेली पहाट.... !! 

घडी-घड़ी घड्याळ बघून घाम पुसणारी, बैचेन ती  पहाट... !! 

गाड्यांचे कर्कश हॉर्न, पेट्रोल डीजलच्या उग्र वासाने घाबरलेली पहाट.. वैतागली पहाट! 

धुरात-धुळीत मळलेली आणि कोमेजलेली पहाट....!! 


मला पुन्हा हवी आहे तीच ताजीतवानी, सुगंधी, सुरेल, मनमोहक, आनंदी, हसणारी, नाचणारी, गाणारी, फुलपाखरांसोबत भिरभिरणारी... फुलांच्या पाकळ्यासंगे दिमाखात डोलणारी... चिमणीच्या घरट्यात चिवचिवणारी पहाट... 


*केव्हां तरी पहाटे* मला मिळेल...मला सापडेल ती पहाट....... 


©ऋचा दीपक कर्पे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू