पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भोंडला

भोंडला


खुप सुंदर कल्पना होती, आहे अणि चालु रहावी. पुर्वी मुलींना शिक्षण मिळणे जरा अवघडच होते. त्यामुळे बर्‍याचदा आयांना वाचता लिहिता येत नव्हते, किव्वा काहींना थोडे फार येतही होते. पण काही आवश्यक गोष्टी आई आपल्या मुलींना तोंडी शिकवत असे. 

भोंडल्याच्या प्रत्येक गाण्यात ती तिला एक चार्ट डोळ्या समोर आणते.

ऐलमा  पैलमा – कुठल्याही कार्याची सुरुवात गणेश वंदना करून करायची.

Counting साठी – एक लिंबु झेलू बाई दोन लिंबु, 

श्रीकांता कमाल कांता – न बिघडता पदार्थ कसे बनवले पाहिजे 

आक्कण माती चिकण माती-पुर्वी मातीची लादी असल्याने ती कशी व्यवस्थित ठेवायची, चुल कशी सरावायची, जाते कसे नीट रोवून कश्या करंज्या बनवायच्या.

कारल्याचा वेल-पुर्ण पिकाची प्रोसेस. 

सासुरवाशीण- प्रतेक नाते आणी दागिने यांची ननावे.

प्रत्येक गाणे काही तरी शिकवत असते.

खिरापत म्हणजे  तर  प्रत्येक पदार्थाची नावे, चव, आणी प्रत्येक सुगरणीचि  खास अशी पद्धत.  पदार्थ बनवताना प्रत्यक्षात बघणे, काय काय सामुग्री लागते - झाले की आजचे YouTube चॅनेल. 

खरच त्यामुळे मुलांना बर्‍याच पदार्थाची चव काळत असे अणि ते खायची पण सवय होत असे.


सगळीच मुलं एकसारखी नसतात, पण प्रत्येक मुलीला काहीतरी करायला आवडते. भोंडला म्हणजे एक स्टेज असते. कारण त्यात प्रत्येकानेच सहभागी व्हायचे असते. एकमेकांच्या सहाय्याने नाच, गाणी, खेळ, असे खुप काहि शिकता येते. ह्या स्टेज मुळेच मुलींच्या अंगी असलेले कला गुण कळून येतात. बरेच खेळ सामूहिक असल्याने प्रत्येकाला सहभागी होता येते. Satage daring येते.

किती महत्त्वाचे शिक्षण अणी लाख मोलाचा आनंद हा भोंडला देऊन जातो ना...


आणी आजही त्याचे खुप महत्व आहे. आज मुलींना जरी बरेच काही चार्ट वरुन शिकता येत असेल, YouTube असेल, किव्वा मोबाईल वर पण बरेच काही मिळते. पण आजच्या आईला मुलीच्या शाळेतील मैत्रिणी कोण आहेत, कुठे राहतात, कश्या आहे हे सर्व जाणुन घ्यायला घरोघरी किव्वा काही मुलींकडे होणारा भोंडला हे पण एक माध्यम होऊ शकते, जिथे आई पण जाऊ शकते. त्या निमित्ताने मैत्रिणींची माहिती सहज मिळते, आयांच्या ओळखी होतात. आज हा डेटा असणे खुप महत्त्वाचे आहे. कारण शाळा लांब असतात, आई नोकरी करत असते, पण तिचं अर्धं लक्ष घरी असते. कधी मुलीचा फोन लागला नाही तर ती बेचैन होते. अश्या वेळी मुलीच्या मैत्रिणी तिला मदत करु शकतात.

खरच भोंडल्याचे महत्व अबाधित आहे.

तर मैत्रिणींनो, प्लीज तुम्ही पण भोंडला नक्की करा...

कसे वाटले ते share करा.


Vrushali Mula-9833306701


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू