पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

देश हा भारत माझा

काश्मीर ते कन्याकुमारी

भारतभुची करता वारी ।

रंग वेगळे ढंग वेगळे

अभिमानाने फुलते स्वारी ।



हिमालयाचे उंच कपारे

तिन्ही बाजूस समुद्र किनारे ।

कुठे गारवा साद देतो

कुठे झोंबती मग उष्ण वारे  ।


वाटेवरती मधेच डोंगर

जंगलातूनही दिसे शहर ।

हिरवी हिरवी झाडे इथली

करतो मोहित फुलांचा बहर ।


पूर्वापारची प्राचीन धरा

ताजमहालही हो बघा जरा ।

मंदिर मस्जिद फिरता फिरता

दिसे प्रेमाची अलग तऱ्हा ।


व्यन्जन इथले कोण कुठले

भाजी भाकर भात पिठले ।

इडली असो वा दोसा असो

चाखून सारे पोटही सुटले ।


गरीब कोणी कोणी अमीर

भेटतील इथेच खरे जिगर ।

नाती गोती जपतील सारे

माणुसकी तर मिळे अपार ।


भारत माझा देश नव्हे हा

संस्कृतीचा विशाल सागर ।

तृप्त होतो बघून सारेच

देशभक्तीचा पेटवू जागर ।


संजय रोंघे

नागपूर

मोबाईल - 8380074730






पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू