पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बोहरीण

मंजुळाचे सकाळचे घर काम संपले आणि ती आता दुपारी पाठ सरळ करावी म्हणून आडवी पडणार तोच डोरबेल वाजली.

तिने थोडे कंटाळ्यानेच दार उघडले. समोर मीरा उभी होती.

मीरा बोहारणीचे काम करायची आणि आता जवळ जवळ वर्षभराने ती आली होती.

"ताई आत येऊ का?" मीराला पाहून विचारात अडकलेल्या मंजुळाला मीराने विचारले.

"ये ना, इतके दिवस कुठे होतीस? कसे काय निभावले ह्या कठीण काळात? खूप प्रॉब्लेम झाले असतील ना तुला?" एका दमात तिने मीराला प्रश्न केले.

"नाही हो ताई,तेच तर सांगायला आले आहे." म्हणत मीराने तिच्या हातात दोन हजाराची नोट ठेवली.

"हे पैसे कसले, आणि मला का देत आहेस?" मंजुळाने विचारले.

"अहो ताई, तुम्हाला आठवते का? तुम्ही मला गेल्या मार्चमधे आता लोकडोऊन  होणार आहे तर सामान भरून घे, म्हणून दोन हजार दिले होते ते परत करायला उशीरच झाला थोडा पण घेऊन आले आज" मीराच्या डोळ्यात थोडा क्षोभ दिसत होता.

मंजुळा हळूच तिला  म्हणाली,"अगं ते तू मला परत करशील ह्या आशेने नव्हते दिले. "

"माहित आहे मला ताई ,पण आता तशी परिस्थिती नाही राहिली आमची,म्हणून आणून दिले तुम्हाला. कुणा आणखीनला पण मदत करू शकता तुम्ही ह्या पैश्यांनी जशी मला केलीत" नंतर तिने पुन्हा पदरावरची एक गाठ सोडून एक हजार रुपये अजून ठेवले मंजुळेच्या हातावर.

"आता हे कशाचे" मंजुळाला कळत  नव्हते ,"व्याज देते आहेस का?"

"नाही ताई, तुम्ही केलेली मदत तर अमूल्य आहे त्याला व्याजाचे पैसे देऊन किंमत नाही करायची मला त्याची. हे पैसे माझ्या मुलीने बिझनेस  केला त्यातून तुमचा हिस्सा म्हणून पाठवले आहे."

"अगं कळेल असे बोल ना बाई काहीतरी" , मंजुळानि विनंती केली तिला.

"सांगते ताई पण मला पाणी देता का जरा ?"मीराने पाणी मागताच मंजुळाला लाजच वाटली स्वतःची, ती आल्यापासून पैश्यांच्या हिशेबात ती एवढी हरवली की  पाणी द्यायचे पण विसरली. मंजुळाने पाण्याबरोबरच सरबत पण आणले करून.

"हं आता सांग" ऐकायला बसली ती आणि मीरा सांगू लागली," ताई आम्ही जातीने ब्राह्मण पण काही कारणांमुळे माझ्या सासऱ्यांना गरिबीचे तोंड पहावे लागले, आणि तशीच काही अवस्था माझ्या माहेरी पण, म्हणून आमच्या दोघांच्या घरच्यानी ठरवून आमचे लग्न लावून दिले. सासरच्या मोठ्या वाड्यातील आता फक्त एक खोली उरली होती, आमच्या कडे.  बाकी सगळा वाडा विकला गेला होता. त्या खोलीत आम्ही दोघे ,सासू सासरे आणि एक दीर जाऊ सगळे एकत्र राहतो त्यातच मला एक मुलगी झाली आणि दिराला पण एक मुलगी झाली. खाणारी पोटं वाढली तशी आम्हाला म्हणजे सुनांना पण काम करावे लागेल हे समजले.  पण काय काम करावे ते कळेना कारण कुणाची उष्टी भांडी घासायला मला आवडत नव्हते ,म्हणून मी बोहारिणीचा व्यवसाय पत्करला. होती थोडी उन्हातान्हाची मेहनत पण कुणाच्या आशेवर नव्हतो जगत. पण भाग्यच साथ देत नसले की  घडते तसे ह्या लोकडाऊनचे दिवस आले आणि मला कुठे जाता येईना की सामान आणता येईना. घरी आठ दहा गाठोडी भरून कपडे पडले होते पण बाजार लागत नसल्याने कुणी घेत नव्हते आणि आम्हा गरिबांना ताई त्या वेळेस काय करावे सुचत नव्हते पण म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना तसे मुलींच्या शाळेतून ऑन लाईन वर्गांकरता मोबाइल घ्या म्हणून सांगितले गेले, आम्ही कसे बसे हफ्त्यांवर दोन्ही मुलींमध्ये एक मोबाईल घेतला आणि त्यांचा अभ्यास सुरु ठेवला. दोघीही आत्ता दहावीला आहेत त्यामुळे भागच पडले आम्हाला मोबाईल घेणे.

पण ताई त्या मोबाइलनेच आमचे जीवन बदलून टाकले बघा. एक दिवस मोबाइलवर माझ्या मुलीने एक अप्लिकवर्क  का असे काहीतरी आहे त्याचा विडिओ बघितला आणि आम्हा जावांना दाखवला , आपण गोदडी कशी करतो तुकडे तुकडे एकत्र शिवून तशातलेच काहीतरी काम होते बघा आम्ही आमच्या कडील गाठोड्यातले सगळे कपडे काढून त्याचे असे वेगवेगळे आकार बनवले हत्ती, मोर सिंह ,गणपती वगैरे आणि नंतर  त्या आकारांना चारी कडून एकसारखे कापड लावून  साधारण चार  फूट उंच आणि पांच  फूट रुंद असे  वेगवेगळे डिझाईन तयार केलीत. आणि गम्मत सांगू तुम्हाला माझ्या मुलीने त्याचे फोटो  एका सखी ग्रुपला  पाठवले आणि त्यांनी आमच्या कडून तसे पंचवीस पीस विकत घेतले. एक एक पिसचे आम्हाला पांचशे रुपये पण दिलेत. ताई त्यात तुम्ही दिलेले कपडे मी वापरले म्हणून तुम्हाला पैसे दिले, अजूनही ऑर्डर देत आहेत ते लोक आणि आम्ही आता त्या फाटक्या कपड्यातून चिमण्यांचे तोरण, वगैरे पण बनवायला शिकलो मोबाइलवर पाहून ते पण विकू लागलो आहोत."

"अग पण तू भांडी दिली होतीस ना मला?" मंजुळाने म्हटले.

"दिले होते पण त्यापेक्षा जास्त पैसे मिळाले ना ताई ,म्हणून मी सगळ्यांनाच थोडे थोडे देत आहे पैसे, ज्यांनी मला कपडे दिले होते त्या सगळ्यांनाच" मीराचे उत्तर.

" ताई खार सांगू का आधी आपण बोहारिण  आहोत ह्याची लाज वाटत होती पण आता अभिमान वाटतो कारण आम्ही फाटक्या तुटक्या कपड्यांना पण सुरेख आकार देऊ शकतो, जे लोक आपापल्या दिवाणखंडात ठेवत आहेत आनंदानी."

"मीरा ,तुझी गोष्ट ऐकून तर मी पण विचार करायला लागले आहे की संधीचे सोन करता आले पाहिजे बघ, अरे हो मी दोन गाठोडी काढून ठेवली आहेत ती घेऊन जा जाताना"

"द्या मग ताई निघतेच मी आता , घरी जाऊन ऑर्डर पूर्ण करायची आहे, पैसे पुढच्या  आठवड्यात, मला आले की देऊन जाईन ताई." म्हणत मीराने मंजुळाने दिलेली गाठोडी उचलली आणि ती गेली.मंजुळा विचार करत होती की  ,"ज्यांना लाखोंचा फायदा होतो तरी तो इमानदारीने पैसे द्यायला येणार आहे का हिच्या सारखा? हिला काही रुपियांचा फायदा झाला तरी ही मला माझा भाग देऊन गेली

मंजुळाच्या  मनात एक बोहारणीचे चित्रच बदलून गेले.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू