पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तू मी आणि गुलाब

तू,मी आणि गुलाब


बघता कुंडीतील गुलाब,

आठवला दिवस तो मला

जेव्हा आला होता तू

द्यायला गुलाब मजला


थरथरते हात आणि

कापत होते तुझे पाय

सांगायचे होते वेगळे नि

मुखातून निघत होते काय


होते अवघड आवरणे

हसू माझे तेव्हा झाले

' खुळसट'  हळूच मनात

मी तुला पाहून म्हणले


"हे काय आहे?" असे 

जेव्हा मी ओरडुन विचारले

तुझ्या हातातले गुलाब

निसटून खाली पडले


माझ्या आवाजावरून

तुला माझे उत्तर कळले 

खाली पडलेले गुलाब

उचलून तू पाय वळवले


गेल्यावर तू आम्ही

सख्या खूप हसलो सर्व

मनातल्या मनात पण

वाटला मला माझाच गर्व


कोणीतरी होते जे

मला प्रेम करत होते

नाही सांगितले तुला

काय माझ्या मनात होते


सांगते आज आता

मलाही तू आवडायचास

पण आता भेटण्याचा

बहाणा कोणता काढायचा?


केला विचार आज तर

गुलाब घेऊनच येते तिथे

कडकडून भेटेन तुला

असशील कुठे जिथे

सौ. अनला बापट

राजकोट

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू