पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा

माझा आज वाढदिवस होता.. पन्नासवा वाढदिवस! 
घरच्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली होती,माझ्या ह्या विशेष वाढदिवसाला आणखीन पण जास्त विशेष बनवायची. 
कितीतरी पाहुणे, मैत्रिणी आणि बरीच बच्चेपार्टी सगळेच आले होते. जवळ जवळ तीनशेच्या वरती मंडळी एकत्र झाली होती.
पार्टी एका हॉल मध्ये होणार होती पण मला सांगितले गेले होते की तुला आम्ही घेऊन जाऊ तेव्हाच यायचे...मला खूप हसू आले," आज पर्यंत ह्या मुलींना घ्यायला सोडायला जाणारे मी आज ह्या मला घ्यायला येणार होत्या"..पण खर सांगू खूप छान वाटत होते...
खरंतर काल रात्री बारा पासूनच माझा वाढदिवस सुरू झाला होता..रात्री दोन्ही मुली कृपा आणि कृती केक घेऊन बरोबर बाराच्या ठोक्याला माझ्या खोलीत हजर,अगदी माझ्या सारख्याच..जसे मी त्यांच्या वाढदिवसाला करते तसेच . फार छान वाटले मुलींना आपण आनंद लुटवणे शिकवू शकलो,त्यांना आनंदाचा रंग दाखवू शकलो ह्याचा खूप आनंद वाटला ...पण नवरोबाने त्यांना पाहुण्यांच्या खोलीत जायला सांगितले ..आणि मला पण तिथे हात धरून घेऊन गेला. 
तिथे त्याने सर्व सजवून ठेवले होते, केव्हा केले असेल हे हा विचार मी करत होते,तेवढ्यात तेच म्हणाले," तू पार्लरला गेली होतीस ना तेव्हाच करून ठेवले" अच्छा म्हणजे माझा सरप्राइज द्यायचा रंग नवर्यावर पण चढला होता ..मला आनंद झाला.
फोटो, गप्पा, केक कापणे वगैरे ह्यात रात्रीचे दोन वाजले.. मग विचारांमुळे झोप लागेना...
सकाळी सकाळी म्हणजे आठ वाजता धाकटी मुलगी कृती आली उठवायला," हॅप्पी बर्थडे आई.. चाय हाजिर है."
"अगबाई, मला उठायला उशीरच झाला,थांबा लगेच देते ह नाष्टा तुम्हाला" म्हणून मी उठायला लागले तर तिने मला खांदे धरून बसायला लावले.
"कृपा ताईने बनवला नाश्ता कधीच" म्हणत ती डोळा मारत गेली. 
"आता तू फ्रेश होऊन बाहेर ये, मग एकत्रच घेऊ नाष्टा" धाकटी सांगत गेली.
मी फ्रेश होऊन, गेले तर डायनिंग टेबलवर सगळेच पदार्थ माझ्या आवडीचे...फार छान वाटले. 
दोन्ही मुलींनी आणि नवऱ्याने पण फार मेहनत घेतलेली दिसत होती..
सहज टेबलवर लक्ष गेले आणि तिथे चारच्या जागी पांच प्लेट दिसल्या लागलेल्या,मी विचारले पांचवी कोणाची?
मुलीचे उत्तर ,"बाप्पाची!"...अहो किती बरे वाटले सांगू...वाटलं संस्काराचा संस्कृतीचा रंग आपण आपल्या रक्तात मिसळण्यात यशस्वी ठरलो.
दुपारी अकराला , माझी आई घरी आली. माझे औक्षण केले. हातात एक ड्रेस आणि एक छोटेसे पाउच ठेवले...पाउच उघडताच त्यात दोन सुंदर कुड्या...तिच्या सासूबाईंनी तिला दिल्या होत्या त्या...म्हणजे आईने तिला मिळालेला वारसा पुढे वाढवायचा हक्कच मला दिला होता,ते पण काहीही न बोलता, फक्त त्या मोतीच्या कुड्या तिचे प्रेम,तिचा विश्वास बरेच काही सांगून गेले.
संध्याकाळी एका हॉल मध्ये पार्टी होती. सगळे पोहचल्यावर मला घ्यायला माझे पतीदेव आले. 
मी हॉलवर पोहचले तर दंगच राहिले. मन भरून आले...सगळी सुव्यवस्था पाहून. माझ्या मुली एवढे सगळे नीट करू शकतात ह्याची मी कधी कल्पनाच करू शकत नव्हते. मला दोघी मुलींनी दोन्ही कडून धरून स्टेजवर नेले. तिथे पतीदेवांनी केक कापायला सांगितला. आणि नंतर सगळ्यांनी मला पन्नास वर्ष पूर्ण झाल्या बद्दल काही सांगा असे म्हटल्यावर मी माझे जे मत मत मांडले ते तुम्ही पण वाचावे म्हणून इथे लिहित आहे.
आज वयाची पन्नाशी ओलांडली आणि लक्षात आले की किती वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आपण ह्या आयुष्याच्या रंगमंचावर....
कितीही मुखवटे लावले.....

किती चेहरे रंगवले तरी आपला असा म्हणता येईल तो रंग वेगळाच असतो...कोणालाही नाही ओळखता येणार असा कारण त्या रंगाची विशेषताच ही आहे की तो प्रत्येक व्यक्ती बरोबरच्या संबंधात वेग वेगळ्या आहे...
जसं माझ्या मुलींच्याबरोबर आई म्हणून माझ्या रंग श्वेत दूधासारखा आहे, श्वेत..पण कोमल अगदी दुधावरच्या साईसारखा.
पण हाच श्वेत रंग माझ्या आई वडील, सासू सासऱ्याबरोबर आहे खूप शांत पांढरा एखाद्या पांढऱ्या कमळसारखा !

मैत्रिणींबरोबर आहे हा रंग त्याच्या रंगांची छाया हलका करणारा, त्यांच्या वेदना कमी करणारा आणि त्यांच्या कलाकौशल्यला ओज देणारा पांढरा...

लेखिका म्हणून हाच पांढरा रंग, विविध भावनांच्या विविध रंगांना आणखीन तेज /ओज देणारा बनतो आणि त्यातून रंगवली जातात विशिष्ट गुण असणारी विशिष्ट पात्र..आणि हो कथानक पण
.

एक सामाजिक हस्ती म्हणून माझा पांढरा रंग आपल्या तिरांग्यातल्या पांढरा आहे तसा आहे ..हिरव्या पर्यावरणाला प्रेम करून चिकटून राहणारा...आणि कर्तृत्ववान केशरीचा चाहक.

आपल्यात फिरणाऱ्या आध्यात्मिक प्रगतीच्या निळ्या चक्राला मदत करणारा.

असे अनेक छाया असूनही रंग माझा आहे पांढरा. सगळ्यात मिसळणारा..पण तरीही अलिप्त.

तर मंडळी माझा रंग मला तेव्हा गवसला जेव्हा मी आत्मचिंतन केले आणि मला कळले की मी ह्या भुलोकावर कितीही कामे केली, कितीही नाती जुळवली, तरीही माझ्या या शरीराचे अंतिम स्थान आहे ते त्या अर्थीवरच्या पांढऱ्या कपड्याच्या खाली. आणि नंतर चितेवर!
म्हणूनच एक पांढरा रंग अजून लपलेला आहे माझ्यातच ,तो पांढरा रंग आहे मृत्यूचा,शास्वत सत्यचा!
सौ. अनला बापट
राजकोट

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू