पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आंबेडकर नगर: राष्ट्रीय पुरस्कार

नागपुर २७ मार्च रोजी नागपुर या ठिकाणी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ यांच्या वतीने आठवा वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण समारंभ, ग्रंथ प्रकाशन व सत्कार सोहळा अशा एकदिवसीय भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संपुर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरवादी साहित्यिकारांच्या कलाकृतींना गौरविण्यात आले. शंभर राज्यस्तरीय आणि पन्नास राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन यावेळी उपस्थित साहित्यिकांना गौरविण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक डॅा. चंद्रशेखर मेश्राम आंतरराष्ट्रीय मेंदूतज्ञ यांनी साहित्यिकांनी संशोधनपर साहित्य लेखन केले पाहिजे. आजच्या काळात साहित्यिकांची जबाबदारी मोठी आहे. असा मोलाचा संदेश या ठिकाणी दिला. डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य संशोधनात्मक होते. तसेच त्यांनी कधी कविता, कथा, कांदबरी लिहीली नाही. संदर्भ आणि पुरावा यावर आधारित संशोधनात्मक साहित्य आंबेडकरवादी चळवळीला अपेक्षित होते. जे काही आपण लिहीतो. ते सिध्द करता आले पाहिजे. एक वाचक देखील महत्वाचा ठरतो. या प्रसंगी भंते नागार्जुन सुरेई ससाई, डॅा. सुभाष चौधरी, डॅा. संजय ठाकरे, डॅा. सुमा रोडनवर, किशोर गजभिये, सचिन सोनोने, डॅा. सुरेश घरडे, शंकर बरडे, सुजीतकुमार मुरमाडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दिपककुमार खोब्रागडे, डॅा. गोविंदराव कांबळे, डॅा. रविंद्र तिरपुडे, डॅा. विणा राऊत, प्रा‌. कल्पना शिंदे, प्रा. प्रविण कांबळे अनेक मंडळी उपस्थित होते. यावेळी भुसावळ येथील माहेर असलेल्या प्रज्ञा घोडेस्वार बागुल यांच्या साहित्य वैश्विक जाणिवांचा आधार समिक्षा ग्रंथ आणि पिता को समर्पित काव्यधारा या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच याप्रसंगी प्रज्ञा घोडेस्वार बागुल यांच्या आंबेडकरनगर या कथासंग्रहाला डॅा. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. खान्देशचे नाव उंचावणारी प्रज्ञा घोडेस्वार बागुल अशा अनेक शुभेच्छा त्यांना यावेळी मिळाल्या.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू