पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पुस्तक प्रकाशन सोहळा: स्थैर्य

दिनांक 27 मार्च 2022, रविवारी महाराष्ट्र समाज देवास येथे म. प्र. मराठी साहित्य संघ आणि महाराष्ट्र समाज देवासच्या संयुक्त आयोजनात ज्येष्ठ साहित्यिक राधिका इंगळे ह्यांच्या शॉपिज़न प्रकाशनातर्फे प्रकाशित कथासंग्रह "स्थैर्य" ह्याचे विमोचन करण्यात आले. 

पुस्तक विमोचन प्रसंगी नागपूर चे सुप्रसिद्ध व्याख्यानकर्ता आणि प्रबोधनकार श्री आशुतोष अडोणी,म.प्र.साहित्य संघाचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम सप्रे, सचिव श्री मोहन रेडगावकर , सहसचिव श्री अरविंद खोडके, बृहन्महाराष्ट्र मंडळ दिल्ली चे कार्यवाह श्री दीपक कर्पे, महाराष्ट्र समाज देवास चे न्यास मंडळ अध्यक्ष श्री पद्माकर फडणीस, उपाध्यक्ष श्री दिलीप सुपेकर,मराठा समाज अध्यक्ष श्री प्रकाश देशमुख, उपाध्यक्ष श्री दीपक काळे,समर्थ रामदास विचार मंच देवासचे श्री प्रकाश काळे श्री अशोक कुलकर्णी , देवास चे ख्यात इतिहासकार श्री दिलीप सिंह जाधव सुप्रसिद्ध मूर्तिकार आणि चित्रकार श्री प्रकाश पवार महाराष्ट्र समाज देवास चे जवळपास १५० सदस्य उपस्थित होते.

पुस्तक विमोचन प्रसंगी श्री पुरुषोत्तम सप्रे यांनी सौ.राधिका इंगळे यांच्या साहित्यिक प्रवास आणि लेखनाचा आढावा प्रस्तुत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
श्री आशुतोष अडोणी यांनी *.याही वयात सतत लेखन सुरू आहे ही लेखणी अशीच झरत रहावी असे सांगून पुस्तकं वाचून नक्कीच प्रतिक्रिया.देईन .* असं आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत विकास परिषद देवास ची अध्यक्ष सौ.वृषाली आपटे यांनी केले.त्यांनी विमोचन प्रसंगी सौ.इंगळे काकूंच्या कार्यातून सतत प्रेरणा घेत पुढे वाढायला हवे असे उद्गार काढले.

शॉपिज़न मराठी विभाग प्रमुख ऋचा कर्पे ह्यांनी स्थैर्य बद्दल बोलताना सांगितले की राधिका इंगळे ह्यांचे कथासंग्रह "स्थैर्य" म्हणजे त्यांच्या अनुभवांची शिदोरी, असे म्हणायला हरकत नाही. काही कथा हसवतात,काही रडवतात आणि काही खूप विचार करायला भाग पाडतात. कथा लहान पण आशय मोठा, असे मी ह्या संग्रहाबद्दल सांगू इच्छिते. "स्थैर्य" एक वाचनीय व संग्रहणीय असे पुस्तक आहे. राधिका जींना शुभेच्छा!!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू