पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मातृप्रेम

आज प्रियाला कॉलेज मधे "बेस्ट स्टूडेंट ऑफ द इअर" चे बक्षीस मिळणार होते..पण ती ते बक्षीस घ्यायला नाही जाणार असे म्हणत होती..आणि तिच्या मैत्रिणी तिला जायला सांगत होत्या..पण तिच्या लहानपणाच्या जवळच्या एका मैत्रिणीला ती का जात नाही ते माहीत होते...

ती प्रिया जवळ आली...तिच्या जवळ बसली...आणि दोघी भूतकाळात गेल्या....

प्रिया उदास होती..आज तिला बक्षीस मिळणार होते..पूर्ण जिल्ल्यात ती दहावीत दुसरी होती..आणि विज्ञान आणि गणितात तर शंभरा पैकी शंभर...आईला खूप आनंद झाला होता पण तिला बक्षीस समारंभाला नाही येता आले..कारण चार दिवसापूर्वी तिला जरा ताप आला आणि दोन दिवसाने तिची तब्येत जास्त खराब झाली तर कोरोना टेस्ट करवला आणि दुर्भग्याने तिचा रिपोर्ट कोरोना पोझेटिव आला...म्हणून तिला दवाखान्यात एडमिट करावे लागले.

खरंतर प्रियाच्या आयुष्यात आईचे स्थान कोणीच घेऊ शकेल असे नव्हते..कारण प्रियाला लहानपणी काही अडचण नको व्हायला म्हणून तिच्या आईने म्हणजे राखीने नोकरी सोडली आणि पूर्णपणे ती प्रियाच्या तैनातीत लागली...त्यामुळे अगदी लहानपणापासून प्रियाला काहीही असले की आई हजर असायची... एवढेच नव्हे तर प्रत्येक वर्गाचा अभ्यास करवून घ्यायची जवाबदारी पण तिच्या आईने स्वतःवर ओढून घेतले होते..मग तो शाळेचा वर्ग असो किंवा गाण्याच्या...

हे सगळे छान चालले होते पण काही वर्षापूर्वी ह्या कोरोना नावाच्या महाव्याधीने विश्वाला ग्रासले आणि सुरू झाले स्वतःच्या अस्तित्वाकरता झगडणे..अश्यात सगळ्या वर्गांचे रूपांतरण ऑनलाईन ह्या पद्धतीत झाले आणि राखीने ते पण शिकून प्रियाच्या अभ्यासात काही व्यत्य नाही येणार ह्याची खूप काळजी घेतली...म्हणूनच आज ती जिल्ल्यात दुसरी आली, त्याची  ट्रॉफी घ्यायला इथे होती..पण आई नव्हती.

"बेटा तू इथे बस म्हणजे नाव बोलवल्या बरोबर लगेच तुला स्टेजवर जाता येईल" , तिच्या शाळेतल्या एक बाई तिला सांगत होत्या."आई नाही आली?"त्यांनी पाठोपाठ तिला विचारले..

"नाही तिला बरे नाहीये.. एडमिट आहे ती दवाखान्यात" ,सांगताना तिच्या डोळ्यात आलेले पाणी बाई आणि प्रियाच्या वडिलांच्या लक्षात आले. प्रियाच्या वडीलांनी लगेच तिला जवळ घेतले..डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाले," अग आज नाही ती इथे पण होईल लवकरच बरी आणि बघ तिला किती आनंद होईल तुला बक्षीस मिळाले आहे हे पाहून..मी आज पूर्ण व्हिडिओ करणार आहे म्हणजे तिला दाखवू मग..म्हणजे तिला पण समारंभाला आल्या सारखे वाटेल."

"हुं" ,प्रियाच्या तोंडून एवढेच निघाले.

हळू हळू सगळे यायला लागले..बघता बघता ..स्टेजवरची मंडळी पण आली आणि आता फक्त  प्रमुख पाहुणे यायचे बाकी होते..ते आले की समारंभाला सुरुवात होणार होती..

प्रियाला आता कधी एकदा समारंभ संपतो आणि आपण जाऊन आईला आपले बक्षीस आणि व्हिडिओ दाखवतो असे वाटत होते...

तेवढ्यात प्रमुख पाहुणे आल्याची घोषणा झाली.

एवढ्यात तिच्या बाबांच्या फोनवर कुणाचा तरी फोन आला..बाबांनी फोनवर "मी मुलीच्या बक्षीस समारंभाला आलोय" एवढे सांगून लगेच फोन कट केला..त्यांना व्हिडिओ करायचा होता ना..

म्हणून त्यांनी लगेच फोन बाजूला असलेल्या काकांना दिला.

ती खुश झाली की आज आई नाहीतरी बाबा अगदी आईसारखीच तिची काळजी घेत होते.

तेवढ्यात पहिल्या क्रमांक मिळवलेल्या मुलाचे नाव घेण्यात आले आणि त्याला मंचावर बक्षीस घ्यायला बोलावले गेले..त्याला जाताना पाहून तिने  बाजूच्या काकांना "रेडी रहा" असे सांगितले. काका पण अंगठा दाखवून रेडी आहे म्हणाले.

"आणि ह्यावर्षी जिल्यात दुसऱ्या नंबरवर आल्या आहेत प्रिया देशमुख..मी कुमारी प्रिया देशमुख ला विनंती करेन की त्यांनी आपल्या पालकांच्या सोबत मंचावर यावे बक्षीस घ्यायला" तिच्या कानावर हा आवाज पडला आणि बरोबरच कोणीतरी खांद्यावर हात ठेवत आहे असे वाटले..मागे वळून पाहिले तर आई! तिला खूप आनंद झाला.."आई!" मला माहीतच होते ती आल्याशिवाय राहूच नाही शकणार...तिला अजून खूप काही बोलायचे होते,पण बाबांनी तिला जवळ जवळ ओढलेच मंचावर जायला..त्यांनी तिला त्या व्हिडिओ काढणाऱ्या काकांकडे पाहा म्हणून इशारा केला..प्रियाने आईला पण हाक मारली...आई पण बरोबर आली मागेमागे..अशक्त झाली होती ती म्हणून हळू हळू येत होती..मंचवर गेल्यावर तिला बक्षीस,सन्मानपत्र देण्यात आले..ती खूप आनंदली..आई कडे बघितले..आई खूप सुखावली होती ते आईच्या डोळ्यातले पाणी सांगत होते ..तेवढ्यात प्रमुख पाहुण्यांनी तिला विचारले,"बेटा ह्या यशाचे क्रेडिट कोणाला देणार?"..

तिला विचार करावाच नाही लागला, लगेच उत्तर दिली,"आईला" आणि आईकडे पाहिले..आईला खूप आनंद झाला..मग त्या प्रमुख पाहुण्यांनी तिला एक विशेष सन्मानपत्र दिले गणितात आणि विज्ञानात पूर्ण मार्क मिळवले होते त्याबद्दल...ती ते घ्यायला त्यांच्याकडे वळली,त्यांना नमस्कार करून तिने ते प्रमाण पत्र घेतले आणि आईला द्यायला वळली...पण आई दिसलीच नाही..!

"कुठे गेली आई?" तिने बाबांना विचारले.

"आई कुठे आली आहे बेटा ती तर दवाखान्यात.."

"नाही ती आली होती..माझ्या जवळ उभी होती.." तिने ओरडुन म्हटले आणि पळत त्या काकांच्या जवळ गेली जे व्हिडिओ बनवत होते..तिने त्यांच्या हातातून फोन जवळ जवळ खेचालाच आणि तो व्हिडिओ बघू म्हणून चालू करणार..तेवढ्यात फोन वर दवाखान्यातून फोन आला...तिने बाबांना लगेच दिला फोन..

"काय..अहो मी इथे..नाही हो असे कसे होऊ शकते...हो आलोच मी.. पांच मिनिटात पोहचतो.." असे तुरळक बोलून त्यांनी तिचा हात धरून ओढत कारीजवळ घेऊन गेले..घाई घाईत कार चालवून ते दवाखान्यात पोहचले..तिथे पोहचल्यावर त्यांना डॉक्टर म्हणाले "अहो किती फोन करत होतो तुम्हाला..त्या सिंक होत होत्या सारखे त्यांच्या तोंडातून प्रियाचे नाव होते..."

बाबाला आता कळले होते की आई खरंच आली होती प्रियाच्या जवळ..तिला पाहायला..तिचा बक्षीस समारंभ पाहायला...

बाबा प्रियाला जवळ घेऊन सतत रडत.. एकच बोलत होते.."बेटा तुझी आई येऊन गेली तुझ्या जवळ...मी नाही पाहू शकलो पण तिला"

प्रियाला तो क्षण आजही आठवला की वाटते.."आपण आईला धरून का नाही घेतले त्यावेळेस..आपण बक्षीस घ्यायला गेलो आणि आईला हरवले",हे तिच्या बालमनात घर करून गेले होते, आणि म्हणूनच आता ती कुठलाही पुरस्कार घ्यायला मंचावर जाण्याचे टाळायची...

सौ. अनला बापट

राजकोट.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू