पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वेध लागले पुन्हा नभाला

वेध लागले पुन्हा नभाला


व्याकूळ धरणीच्या विरहाने 

ध्यास घेतला पुन्हा नभाने

रिमझिमणाऱ्या थेंबांसोबत 

आला भेटायाला

वेध लागले पुन्हा नभाला


कधी थेंबांची नाजूक गुणगुण

पानांवरती मोती सजवून

स्वरात मिसळून कधी धारांच्या 

सूर सजवायाला

वेध लागले पुन्हा नभाला... 


गडगडणाऱ्या आभाळातून

कडाडणाऱ्या कधी वीजेतून

रोज नवे संकेत प्रीतीचे देतो

नभ अवनीला

वेध लागले पुन्हा नभाला... 


आषाढाचे मेघ बरसती

तृप्त होतसे भिजुनी धरती

सुगंधी कळ्या वेलींवरच्या

आल्या उमलायाला

वेध लागले पुन्हा नभाला... 


©ऋचा दीपक कर्पे












पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू