पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भगवान शंकराची प्रार्थना

*शंकराची प्रार्थना*

सुगम्य कवणे तुला अर्पितो
प्रणाम तुज शंकरा,
भाव मनीचा जाणुन घे तु
तमरिपु रे भास्करा!

मंगल तर ते सदा घडवी तू
डमरु-धरा शंकरा,
लीनत्व ममह्रदी सदा असु दे
नागेश्वरा गंगाधरा।

मध्यान्हकाली मंगलदिनी या
करूनी प्रार्थना तुजला
अर्पिन मी ही बिल्वदले
बघ अभिषेकही हा सजला।

आत्मा मी अन् परमात्मा तु
जमुदे जोडी जीवाशिवाची
तुझ्या कारणी कुडी झडुदे
लागली आस ही कैवल्याची।

©️ डाॅ.श्रीकांत औटी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू