पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दिवाळी

लक्ष दिव्यांनी सजून आली दिव्या दिव्यांची ही दिवाळी 

नवीन कोरे नववर्षाचे वस्त्र द्यायली ही दिवाळी 

मन्मनात नव गीत सजले चमचमती आरास दिवाळी

रेखीवतेने रांगोळी सजली, सुखसुमनांची रास दिवाळी

एक एक पणतीने उजळे घराघरातील आनंद दिवाळी

आठवणींचे कंदील लागती, भारावली प्रत्येक दिवाळी

देशप्रेमाची त्या सैनिकाची युद्धभूमीवर बरसे दिवाळी

अश्रू भरल्या नजरेने त्याच्या, घरात साजरी होई दिवाळी

चांदण्यांनी आकाश लगडले चमचमती ही नभ दिवाळी 

चंद्रकोर ही त्यातच हसता रात्री खुलून जाई दिवाळी

माझे मन हे तुझ्यात रमता तुझ्या सवे ही स्पर्श दिवाळी

दिले सर्व मज त्या परमेशाने, आयुष्य होऊन जाई दिवाळी

सुषमा ठाकूर.

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू