पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रारब्ध

बाहेरच्या दारावर अपरात्री थाप पडलेली ऐकून दादा म्हणाला, "बघ तर सुमन कोण आलं आहे इतक्या अपरात्री? "

आज सर्व जागेच होते अजून, दादाला मुंबईला जायच्या आनंदात सर्व तयारी करत होते. त्याची बॅग भरून देण्यात मदत करत होते. लहान बहिण दार उघडायला गेली दार उघडून बघते तर बाहेर अनोळखी चार माणसे उभी होती त्यांना बघून घाबरूनच ती घरात परतली, "दादा तूच बघ कोण आले आहे ते आपल्या ओळखीचे वाटत नाहीये"

हातातले काम सोडून दादा अवचितच आलेल्या त्यावेळी आलेल्या लोकांना भेटायला गेला. त्यांच्यापैकी एकाने विचारले, "तुम्ही ह्या घरातले मोठे आहात का?"

दादांनी हो म्हणताच, "हो हो बोला ना काय काम काढले आहे इतक्या रात्री"

"ते सांगतो मी तुम्हाला, आधी तुम्ही आमच्याबरोबर थोडे बाहेर चला, बाहेर टेम्पो उभी आहे त्यात बसून मी सर्व सांगेन"

"अहो मला रात्रीच्या गाडीने मुंबईला निघायचे आहे, मला नवीन पोस्टिंग मिळाले प्रवासाच्या तयारी करण्यात व्यस्त आहे"

"हो हो हो ते ठीक आहे,आपण थोड्या वेळात परत येऊ पण आता जरा माझ्याबरोबर चलावे लागेल, काही आवश्यक काम आहे"

"सुमन दार लावून घे बरं, मी येतो थोड्या वेळात", म्हणून दादा त्या अनोळखी लोकांबरोबर एका टेम्पोमध्ये बसून निघून गेला. टेम्पोत काही सामान ठेवले होते ते दाखवून ते गृहस्थ म्हणाले, "हे सामान बघा. तुमच्या ओळखीचा आहे का ही पिशवी बघा? "

"हो हो हे अशीच पिशवी माझ्या बाबांजवळ नेहमीच असायची तीच ही वाटते आहे त्यांचे जरुरी सामान आणि कागदपत्र वगैरे ते अशाच पिशवीत ठेवायचे..कलेक्टर आहेत शाजापूरला."

"या पिशवीत आम्हाला तुमच्या या घराचा पत्ता सापडला म्हणून आम्ही इथे आलो आहे आता तुम्हाला माझ्याबरोबर स्टेशन पर्यंत चलावे लागेल", टेम्पोमध्ये बसल्यावर ते सांगू लागले की ही पिशवी आम्हाला रेल्वे स्टेशन वर मिळाली आहे याच्याबरोबर आणखीही काही सामान आहे तुम्ही ताबडतोब आमच्याबरोबर चला आणि त्या सामानाचे ओळख पटवून सांगा.

त्यांच्याबरोबर दादा स्टेशनवर गेला. तिथे स्टेशन मास्तरच्या ऑफिसमध्ये जाऊन बघितले तर काही सामान आणि चादर पांघरून एक इसम झोपलेले दादांनी पाहिले. पेटीची ओळख दादाला झाली चादर दूर सारून चेहरा पाहायला बरोबर दादा ने हंबरडाच पडला,"हे तर माझे बाबा बाबा आहे..काय झालं तुम्हाला असं काय झालं हे कुठे मिळाले तुम्हाला? "

स्टेशन मास्टर ने दादाला शांतपणे बसून ऐकायला सांगितले, "आहो आम्हाला यांचे भाडे आणि ते बरोबरच सामान रेल्वे लाईन वर मिळालं कसं काय काय झालं ते आम्ही सांगू शकत नाही पण तुमची ओळख पटली आहे तर आम्ही तुम्हाला सामान्य सकट घरी व्यवस्थित पोहोचवून देतो तुमच्यावर आलेला हा प्रसंग तुम्ही समर्थपणे जय लावा आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत", असे म्हणून त्यांनी एका जीभ मध्ये बॉडी आणि सामान ठेवून दादाला घरी पोहोचवले.

अर्ध्या तासानंतर दादा घरी आला आणि तो पण खूप त्रस्त घाबरलेला होता आणि आपल्या आईच्या गळा पडून खूप जोरजोरात रडत होता, "सर्व संपले माझे बाबा तर आमच्या मोठ्या बहिणीला तिच्या सासरी सोडायला गेले होते, बाळंतपणाला आली होती बहीण बहिणीला सासरी पोचवून परत जाणार होते आई, आता माझी नवीन नोकरी वर मला जाता येणार नाही, काय झाले किती कठीण प्रसंग ओढवलाय आपल्यावरती हे सर्व कसं झालं काय झालं? काय हे भगवंताची करणी! "

अचानक झालेल्या या आघाताने दादा फार दुःखी झाला होता,हादरला होता. त्याने आपले मुंबईला जाणे कॅन्सल केले आणि वडिलांच्या साऱ्या क्रिया करणार तो व्यस्त झाला समोर आलेली खूप छान नोकरी त्याने गमावली होती. आता समोर विधवा आई चार बहिणी लहान भाऊ सर्वांचे शिक्षण आणि जोपासण्याचे कर्तव्य त्याला पार पाडायचे होते. दुःखाचा पूर उतरल्यानंतर त्याने जी समोर आली ती साधारण कारखान्याचे नोकरी पत्करली आणि पूर्ण परिवाराचा भार अल्पवयातच आपल्या खांद्यावर पेरला. प्रारब्ध म्हणून त्याला सामोरा गेला आपण मागतो एक पण देव देतो दुसरच याची प्रचिती आम्हा सर्वांना आली होती आणि आलिया भोगासी असावे सादर हे ब्रीद लक्षात ठेवून पुढचे जीवन जगायला नाईलाजाने सज्ज झाला दादा.

ईश्वर इच्छा बळवती

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू