पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रंग निराळे प्रेमाचे

दर्शनाऽऽऽऽ लवकर ये बाहेर तुला काही तरी सांगायचे आहे , रिया ने आवाज दिला .
काय गं एवढ्या जोरात कशाला आवाज़ देते . काय विशेष झालं आहे !!अत्ता तर आपण घरी आलो रिया ..बाहेर येता येता दर्शना ने रियाला विचारले .

अगं आत्ता आपल्या शाळेच्या ग्रुप वर मॅसेज आला आहे
आज आपल्या वर्गाची पार्टी आहे . तू बघितला का मॅसेज दर्शी !

नाही रिया , थांब बघते. ..दर्शना ने मोबाइल वर मॅसेज बघितला आणि म्हणाली .. हो गं रिया चला आज आपण मस्त एन्जॅाय करू म्हणत दोघींनी हाय - फाय केलं .

दर्शना ने लगेचच आईला सांगितले . आई आज आमच्या वर्गाची हॅाटेल ला पार्टी आहे आम्ही पण जाणार .

आईने लगेच कुठे , केव्हां , कधी येणार प्रश्नांची झड़ी लावली .

आई आपल्या घरा ज़वळच्या हॅाटेल मधेच आहे . संध्याकाळी सहा वाजता संपेल आणि लगेच आम्ही घरी येउ
तू काळजी नको करू .

अगं हो दर्शी तुला थांबवणार नाहीं ,बरं मला सांग कुठला
ड्रेस घालणार तुम्ही दोघी ..

‘आई तू सांगना कुठला ड्रेस घालू ‘

अगं छान ‘वन पीस ‘घाला दोघी जणी अपर्णाने सल्ला दिला .

वा आई मस्त सल्ला दिला तू . love you mumma लगेच आईचा मुका घेतला दर्शना ने ..

दर्शना आणि रिया छान तयार झाल्या . रिया ने काळ्या रंगाचा आणि दर्शना ने टमाटरी रंगाचा ड्रेस घातला . लांब कानातले गळ्यात काही नाही अश्या दोघी स्मार्ट एन्ड ब्यूटिफुल दिसत होत्या .

“ अपर्णा काकु कश्या दिसतो आहे आम्ही दोघी “ रिया ने विचारले !!

अरे व्वा कसल्या भारी दिसत आहे दोघी , किती तरी घायाळ होणार आहे आज काही खरं नाही बाबा !!आई हसत म्हणाली .

काही ही हं आई तू पण ना काय बोलते गं !! . दर्शना
लटक्याने म्हणाली . चला आता आम्ही निघतो .

संभाळून जाऽऽ ! वेळात घरी या ! आईच्या नेहमीच्या सूचना झाल्या मग आम्ही निघालो ..

आज दहावी बोर्डाची परीक्षा संपली . मग सगळे वेग वेगळ्या ठिकाणी पुढील शिक्षणाच्या तयारी ला ज़ाणार
होते . दर्शना आणि रिया इंदौरला आय आय टी च्या तयारी
साठी जाणार होत्या . आज छान पैकी मज्जा करू मग कधी भेटू माहित नाही असे सर्वांनी ठरवले होते .

मस्त पार्टी झाली खूप मजा केली . रिया - दर्शना घरी जाण्या साठी बाहेर निघाल्या . रियाला आठवलं तिचा स्कार्फ
आतच राहिला .

दर्शना तू थांब मी पटकन स्कार्फ घेउन येते म्हणून रिया
परत आत गेली . दर्शना तिथेच उभी होती . तेवढ्यात अंगद तिच्या कडे येताना दिसला .

“ काय रे अंगद तू अजून निघाला नाही घरी “

नाही , मला तुला काही सांगायचे आहे दर्शना !!

हां मग बोल ना काय म्हणतो अंगद !!

‘दर्शना माझा काही उद्देश्य आहे तो पूर्ण झाला कि मी तुझ्या कडे येईन माझी वाट पहा नक्की ‘….
आणि तो तरा - तरा निघून गेला . दर्शना अजून त्याच दिशेन् अवाक् अशी पहात राहिली . अंगद चालला गेला तरी दर्शना भान हरपल्या सारखी उभी होती . तेवढ्यात रिया ने तिला खांदे धरून हलविले . काय दर्शी कुठे हरवलिस !
दर्शना लगेच भानावर आली . कुठे काय , नाही तर मी कुठे हरवणार .
चला मग आता घरी चलायचे ना !! रिया , दर्शना ची हनुवटी
धरत म्हणाली ..

हो हो चलायचे ना , चल लवकर घरी जाऊ ..

रिया चे घर दर्शनाच्या घरा पासून अगदी जवळ होते.
दिवसाचा जास्त वेळ दोघी बरोबरच असायच्या . त्यामुळे दोघींची मैत्री प्रगाढ होती .एक-मेकान शिवाय त्यांना चैन नाही पडायचे . दोघी आपल्या मनातल्या गोष्टी एक मेकींना सांगुन मोकळ्या व्हायच्या .पण आज काय झाले कि दर्शना एकदम शांत होती . रिया समोर सहज़ वागण्याचा प्रयत्न करीत होती .

रिया तिच्या घरी गेली .दर्शना आपल्या घरी पोहोचली . आईने विचारले काय गं कशी झाली पार्टी !! मस्त मजा केली असं म्हणून दर्शना आपल्या खोली कडे वळली .

कपडे न बदलताच ती पलंगा वर पडली . अंगद बद्दल
विचार करु लागली . त्यांच्या वर्गातला एक हुश्यार , आत्मविश्वासु , जिज्ञासु आणि विनोदी स्वभावाचा मुलगा हा अंगद . सर्वांचे प्रश्न सोडावणारा आणि अड़चणित हून समाधान करायला नेहमी तयार ! कसा काय मला असं बोलुन गेला काही कळत नव्हतं . !!

रिया दर्शनाने आय आय टी च्या क्लासेस मधे प्रवेश घेतला. पुढे दोघी अभ्यासात गुंतल्या . मग चांगल्या कॅालेज ला दर्शना - रिया दोघींना प्रवेश मिळाला . काही दिवस मधून कधी तरी दर्शनाला अंगद ची आठवण यायची पण हळु - हळु तिला विसर पडला . कॅालेज मधे तीसऱ्या वर्षी रिया . आदित्यच्या प्रेमात पडली . रिया , दर्शना आणि आदित्य आता
जास्त बरोबरच असायचे . समर्थ , आदित्यचा मित्र पण अधुन मधुन बरोबर असायचा . समर्थला दर्शनाचा स्वभाव आणि हुशारी चे नेहमी कौतुक वाटायचे . तो तसं बोलूनही दाखवायचा . दर्शनालाही समर्थचे कौतुक होते . पण फक्त मित्र म्हणुन . समर्थ मात्र दर्शनाच्या प्रेमात पडला . दर्शना होतीच इतकी गोड !!कुणीही तिच्या प्रेमात पडेल.

दर्शना तुला समर्थ कसा वाटतोगं ? रिया ने विचारले !!

‘ छानच मुलगा आहे तो त्यात काय विचारते रिया ‘

अगं म्हणजे तुला आवडतो का ? रिया ने जरा खोदुन
विचारले .

हो मला मित्र म्हणून आवडतो . दर्शना ने स्पष्ट मत दिले .

बघ दर्शी तो खूप छान मुलगा आहे . तुला आवडत असेल तर त्या दृष्टीने त्याच्या कडे बघ . मला वाटतं तो तुला पसंत करतो . रिया ने स्वताःचे मत सांगितले ..

काही तरीच हं रिया तुझं , मला काहीच वाटले नाही तुला कसं वाटलं , तू नं भलते विचार करते ..

मी बरोबर विचार करते बघ तू !! रिया तिला चिडवत म्हणाली .

चल घरी जाउ दर्शना ने रिया चा हाथ धरून तिला ओढले .

काय यार दर्शी तू काही ऐकत कां नाहीं !! रिया पुढे वाढली

पलंगा वर पडून दर्शना विचार करू लागली . अंगद
कधीच जवळचा मित्र नव्हता मग मी त्याचा विचार मनात कां आणावा !! समर्थ तर खूप जवळचा मित्र आहे त्याला मी पूर्णपणे ओळखते . तो ही माझे मन ठेवणारा , माझी नेहमीच मदत करायला तयार , रात्र झाली तर घरी सोडायला येणारा .
काळजी घेणारा , सर्वाना आदर देणारा असा आहे समर्थ .तरी पण प्रत्येक वेळी अंगद ची आठवण कां यावी हेच मला कळत नाहीं . आता अंगदला आपल्या विचारातही आणायचे नाही .
मनात ठरवले कि समर्थ माझा जोडीदार होणार .


कॅालेज चे चार वर्ष भराभर निघून गेले . चौघांनाही मोठ्या पगाराच्या नौकऱ्या लागल्या . फेयर वेल पार्टीच्या अदल्या दिवशी समर्थने दर्शनाला सरळ सरळ विचारले ..

दर्शना मला तू आवडते , संपूर्ण आयुष्य तुझ्या सोबत राहावं असं मला वाटतं , तू तयार आहेस का ?

दर्शनाने गोड हसुन होकार दिला . समर्थ ने बाजू फैलवताच दर्शना ने समर्थ ला मिठी मारली तेवढ्यात टाळी
वाजवण्याचा आवाज आला बघितलं तर रिया आणि आदित्य त्यांच्या बाजूने येताना दिसले . दर्शना लगेच दूर झाली . रिया
हसत म्हणाली ए मी पाहिलं हं तुला समर्थच्या बाहुपाशात ! आता काही उपयोग नाही …

दर्शना गोड़ लाज़ली . गाला वर गुलाब फुलले . रिया ने दर्शनाला मिठी मारली आणि तिच्या बरोबर समर्थचे ही अभिनंदन केले .

आज फेयरवेल पार्टी होती दर्शनाने लाल रंगाचा सूट , वर शिफॅान दुपट्टा घेतला होता काळेभोर केस स्वच्छन्द उडून चेहऱ्या वर फेऱ्या मारत होते , नाजुक लाल ओठ म्हणजे गुलाबाची कळी जणू उमलली होती , अप्सरा अशीच असु शकते असे समर्थ ला वाटले . समर्थ तिच्या जवळ आला .
समर्थ पण काळ्या ड्रेस मधे आकर्षक दिसत होता .

दर्शी आज तू अप्सरा दिसते . समर्थ तिच्या कानाजवळ हळुच
पुटपुटला आणि लगेच गालाचा मुका घेतला .

दर्शना घाबरून दूर झाली कुणी पाहिलं तर नाही म्हणून चारी कडे बघून समर्थ कडे लटक्या रागाने पाहिले . लगेच प्रेमाने फ्लाईंग किस दिली .
‘कुठला स्मार्ट दिसतो आहे तू समर्थ ‘ २-४ मुली तरी तुझ्या प्रेमात पडणार .

‘माझे ठीक आहे तुझ्या मुळे कुणी वेडा होइल बरं दर्शी ‘

दोघे प्रेमा मधे आकंठ बुडाले असतांनाही मधुन कधी तरी दर्शनाला अंगद ची आठवण येत होती . विचारांना झटकन
बाजू ला करून ती स्वताला सावरून घ्यायची .

काही दिवस नौकरी वर जाण्यापूर्वी सर्वे आप आपल्या
घरी गेले . मित्र म्हणून समर्थ दर्शनाच्या घरी येउन दर्शनाच्या आईला भेटून गेला . फोन वर तर दोघे सतत् गोष्टी करत असे . अपर्णाला ही समज़त होतं दर्शीच्या सतत् फोन वर गोष्टी म्हणजे काही तरी गडबड आहे .

तिनी विचारले ,
काय दर्शी कुणी बॅाय फ्रेन्ड झाला का नाहीं कॅालेजला ?
होइल तेव्हां सांगुन देइन काळजी नको करु आई. दर्शना ने जरा राग दाखवला ,

बरं मग बघु का मुलं तुझ्या साठी ? तुला कसा मुलगा आवडेल मला सांग तसाच पाहू आपण .

अजून मी तीन वर्ष तरी लग्न करणार नाही तुला सांगुन ठेवते आई ,आणि मुलं बघण्याच्या भानगड़ित पडू नको मी स्वताः ठरवणार कुणाशी लग्न करायचे ते !!

दर्शी हे तू छान सांगितले माझी काळजी मिटली . नीट सर्व बघून ठरवशील ह्याची मला खात्री आणि विश्वास आहे तुझा .

दर्शी आणि रिया आज बाजार करायला आल्या . काही अॅाफिस मधे घालायचे ड्रेसेस ची खरेदी आणि इतर लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करून चाट ,पाणी पुरी खाऊन घरी निघाल्या . घरच्या साठी दोघींनी सामोसे घेतले . आनंदाने घरी पोचल्या.
रिया पण दर्शी कडे आली . अपर्णाने दार उघडले , बाहेरच्या खोलीत सोफ्या वर अंगद बसला होता . अंगद ला पाहून दर्शना
स्तब्ध होती तेच रिया ने आनंदा ने अंगदला विचारले ..

अंगद तू कधी आलास कुठे होता तुझा काही पत्ता देखिल लागला नाही ..

हो खरं आहे मला IIT पवई ला प्रवेश मिळाला मग अभ्यासात होतो ,आता मला चांगला जॅाब मिळाला ,बंगलोर ला जाणार म्हणूनच सर्व मित्रांना भेटावयास आलो .

अरे वा दर्शी बघ आपल्या मित्राला इतका छान जॅाब मिळाला किती आनंदाची गोष्ट आहे ना ?

दर्शना विचारांच्या तंद्रित हून बाहेर आली अरे हो!
‘खूप अभिनंदन अंगद तुझे ‘
दर्शना ने नजर न मिळवता अंगद चे अभिनंदन केले .

धन्यवाद ! अंगद ने दर्शना ला खोल नजरेने बघितले .

अंगद मी अत्ता घरी जाते आई माझी वाट बघत असेल , आपण नंतर भेटू …बायऽऽऽ ..रिया घरी जायला निघाली .
बाय रिया भेटू आपण पुन्हा ..

कशी आहे दर्शना , मी तुला इतके वर्ष खूप मिस केलं ! तू मला मिस केलेस का ? अंगद ने दर्शना कडे प्रेमळ नजरेने बघून
विचारलं .

अं हो , होना आपण सर्व मित्रांना खूप मिस केलं . दर्शना खाली नजर करत म्हणाली .

पण मी फक्त तुलाच मिस केलं दर्शी ..मी तुझ्या शिवाय
कुणाचाही विचार केला नाहीं .

तेवढ्यात दर्शनाची आई सरबतचे ग्लास घेउन बाहेर आली .
अंगद तुझ्यासाठी सरबत केलं आहे , हे पी छान वाटेल तुला . सरबतचा दूसरा ग्लास दर्शना ला देत अपर्णा म्हणाली .
दर्शना कावरी-बावरी झाली होती , स्वताला सांभाळत दर्शनाने ग्लास घेतला .

आई आली म्हणून बरं झालं एकदम काय उत्तर दिलं असतं मी दर्शना मनात विचार करत होती . अपर्णा अंगद पाशी
गोष्टी करत बसली त्याला शिक्षणा पासून नौकरी पर्यंत सर्व गोष्टी विचारून झाल्या . पुष्कळ उशीर झाला होता अंगद पुन्हा भेटू बाय काकू बाय दर्शना म्हणून बाहेर निघाला .

दर्शनाने दीर्घ श्वास सोडला . अंगदला सरळ सांगून मोकळी होइन असा तिने मनात विचार केला .

दूसऱ्या दिवशी अपर्णाने दर्शीला प्रेमाने अंगद बद्दल विचारले .
दर्शी बाळा तुला अंगद आवडतो का तसं सांग . मला तरी तो आवडला आहे .

आई मला काहीच समज़त नाहीं काय करु . अंगद ज़ाताना
मला वाट पाहिला सांगून गेला मला काहीच विचारलं नाहीं तरीही मी वाट पाहिची ठरवलं होते , इतक्या वर्षात काहीही संपर्क झाला नाही मग मी त्याला विसरुन समर्थच्या प्रेमात पड़ले . आता तो समोर आला तेव्हां त्याला नाही म्हणावसं वाटत नाहीं गं आता काय करु कुणी तरी दुखावले जाणार . खूप ताप झाला डोक्याला .

अपर्णाला दर्शनाची काळजी वाटली . . तिला दर्शनाच्या मनाची घालमेल पण समज़त होती . काही तरी मार्ग नक्की निघेल . तिने देवा पुढ़े दिवा लावला . देवाला प्रार्थना केली हे सिध्दि-विनायका दर्शनाच्या मनातला जोडीदार तिला मिळुदे .

समर्थ आज दर्शनाच्या घरी आई - वडिलांना भेटायला आला . दर्शनाने त्याला बोलावले होते . समर्थ आल्यावर दर्शनाने अंगदला फोन करून बोलाउन घेतले .

समर्थ हा माझा लहानपणीचा मित्र अंगद !

अंगद हा माझा कॅालेजचा मित्र समर्थ ..

दर्शना ने दोघांची ओळख करून दिली . दोघांनी एक मेकांशी हात मिळवला मग त्यांच्या सहज़ गोष्टी सुरु झाल्या. आज अंगद थोडा गंभीर आणि कमजोर वाटत होता . अंगद आज जरा वेगळा वाटत होता . दर्शना पासून नज़र चोरत होता . तेवढ्यात अपर्णा अंजनाला व्हील चेयर वर बाहेर घेऊन आली . दर्शनाची मोठी बहिण जन्मा पासूनच व्हील चेयर वर होती . दर्शनाने लगेच तिची चेयर आपल्या हाती घेतली तसेच समर्थ पण तिला आधार देऊन सोफ्यावर बसवण्यात मदत करत होता . अंगद आश्चर्य मिश्रित भावाने बघत होता तसेच दर्शना ने ओळख करून दिली ही माझी मोठी बहिण अंजना . माझ्या बाबान बरोबर आमच्या घरच्या व्यवसायात काम करते . खरं तर ती इथे आहे म्हणून मी बाहेर नौकरी करु शकते . तिची ज़वाबदारी माझी पण तितकीच आहे त्या मुळे मी आपल्या देशातच काम करू शकणार परदेशी कधीही जाणे मला शक्य नाही .

अंजना ने दोघांना हाय केले . आपल्या व्यवसायात तिच्या कामा बद्दल अंगद , समर्थ ला सांगितले . अंगद तिला
सर्व गोष्टी विचारत बसला . छान गप्पा रंगल्या . अंजनाच्या आत्मविश्वासाने भरलेल्या गोष्टी ऐकून अंगदला तिचे खूप
कौतुक वाटले . समर्थला पहिले पासूनच सर्व काही माहित होते.


दोन दिवसाने अंगद आणि दर्शना बाहेर भेटले . आज अंगद अशक्त वाटत होता . तुला बरे नाही का अंगद दर्शनाने विचारले .
तसं काही नाहीं मी बरा आहे .

अंगद ने दर्शनाला पुढ़े सांगितलं दर्शना माझी स्वप्न खूप मोठी आहे . मला दूसऱ्या देशी
जाऊन खूप पुढ़े वाढायचे आहे खूप पैसे कमवायचे आहे . त्यामुळे मला तुझ्याशी लग्न करणे शक्य नाही I am really very sorry ….

दर्शनाला काही तरी विचित्र वाटले . तरीही आता दर्शनाचा सर्व ताण दूर झाला होता . समर्थ आणि दर्शना मधे या विषयी पहिलेच गोष्टी झालेल्या होत्या . दर्शनाने समर्थला जेव्हां अंजना विषयी सांगितले तेव्हां समर्थ
म्हणाला ‘ दर्शना मी तुझ्यावर प्रेम केलं आहे तेव्हां तुझ्या आणि माझ्या ज़वाबदाऱ्या एक असतील ‘ हा विषय इथेच संपला .

दर्शना समोर मोकळं आकाश होतं तिचं मन स्वच्छंद आकाशात भरारी घेत होतं . तिचा निर्णय आणि निवड़ दोन्हीं
बरोबर होता त्याचा आनंद दर्शनाला झाला . आज ती समर्थच्या घरी आपल्या कुटुंबा बरोबर जाणार आहे . ताई पण बरोबर असणार ह्याचा आनंद तिला पुन्हा पुन्हा समर्थ वर प्रेम जास्त वाढ़वित होतं ..

समर्थ कडे जायला सर्वे तयार झाले . अंजना ची चेयर धरुन बाबा बाहेर आणत होते तेवढ्यात ते दारा पाशी कोसळले . ताबडतोब एम्बुलन्स बोलावून त्यांना दवाखान्यात
नेलं . आकस्मिक चिकित्सा त्यांच्या वर सुरु झाली . अपर्णा आणि दर्शना बाहेर येऊन बसल्या . ह्रदय विकाराचा छोटा झटका होता . दोघी एक -दुसऱ्याला धीर देत होत्या . समर्थ पण रात्री येऊन गेला .

आता तब्येत स्थिरावली आहे आई ,मी घरी जाउन डबा घेऊन येते. समर्थ तुझ्या सोबत इथेच थांबेल . दर्शना घरच्या कामा साठी आणि अंजना साठी जायला निघाली .

समर्थ दर्शनाला बाहेर सोडायला आला . आकस्मिक चिकित्सा कक्ष समोरून निघताना त्याला जाणवलं कि अंगद
स्ट्रेचर वर आत जात आहे तो धाऊन अंगद जवळ आला .अंगद
समर्थला बघून हसला .

काय झालं अंगद तुला ,तू इथे कसा ..समर्थने त्याचा हात हातात घेतला !!

फिकट हसु थकलेल्या चेहेऱ्या वर आणुन अंगदने समर्थला
सांगितले ..

समर्थ माझी किडनी खराब आहे डायलेसिस साठी आलो आहे माझी किडनीचे प्रत्यारोपण अमेरिकेला होणार आहे . तिथे माझी बहिण असते ती डोनर साठी प्रयत्नशील आहे . म्हणून मी तिकडे जाणार आहे .

कुणावर प्रेम करणे आपल्या हातात नसतं ना रे समर्थ !!माझे दर्शना वर अफाट प्रेम आहे . या जन्मी नाही पण पुढ़ल्या जन्मी दर्शना नक्कीच माझी असेल चालेल न तुला ??

समर्थच्या डोळ्यात पाणी होते मागे दर्शनाच्या डोळ्यातून गंगा - जमुना वाहत होत्या तिचचा हुंदक्याच्या आवाज़ आला म्हणून समर्थ व अंगदने तिच्या कडे बघितले .तिला समर्थने ज़वळ घेतले . आता तीघे ही गळ्यात पडून रडत होते .

‘ पुढ़ल्या जन्मी मी तुझीच होणार बरंका अंगद या जन्मी कुणी स्टेला किंवां मॅरी बरोबर लग्न कर ‘ तुझ्या प्रेमाचा रंगच निराळा आहे . दर्शनाने असं म्हण्टल्यावर तिघे खळखळून हसले …



सुनिता डगांवकर
देवास

 

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू