पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रश्नचिन्ह

रिया आणि रुद्र च्या घरी आज मित्रमंडळ जमलं होतं । मटण आणि चिकन चा प्रेमी रुद्र मटण तर बनवायचा पण खूपच छान त्या मुळे मित्रांना त्याच्या हातचे मटण खाण्याची इच्छा होती तसे ही महिन्यात एकदा तरी सर्वांची  नॉनव्हेज पार्टी व्हायचीच आणि गेले 5/6 महिने रियाला बाळ झाल्यामुळे ते ह्या पार्टीत सामील होत नव्हते म्हणून बाळ झाल्याबद्दल ची पार्टी आता रुद्र च्या घरीच करण्यात आली होती । सर्वांच्या गप्पा रंगात आल्या होत्या तेवढ्यात रियाचं बाळ रडू लागलं तिने काही खेळणी त्याच्या समोर आणून ठेवली त्यातून तो जिराफ,हरीण, उड्या मारणारा ससा,आवाज करणारं बदक  अशी खेळणी घेऊन छान हसून हसून खेळायला लागला तसे मित्र म्हणाले " अरे प्राण्यांच्या खेळण्यांनी छान खेळतो हा , बाकी खेळण्यांकडे लक्ष पण दिले नाही त्याने "लगेच रिया म्हणाली " हो तर आहेच माझं बाळ "Animal lover आपल्या पप्पा सारखं "  हो का ???सगळे क्षणभर स्तब्ध झाले आणि मग जोरात हसायला लागले ।
Animal lover ??????????????~~~~


2.
रात्री पासून कामिनी चं डोकं दुखत होतं आणि मध्यरात्री ताप पण चढला त्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला होता । तिने लगबगीने चहा करून नवऱ्याला दिला आणि स्वतः चा कप घेऊन जरा निवांत बसली आणि चहा घेऊन बोलायला सुरुवात केली " अहो,रात्री ताप भरला होता आणि गोळी घेतली होती त्यामुळे जरा जास्तच झोप लागली पण आज गुरुवार आहे म्हणून मी उठले तरी अजून काही बरं वाटत नाही "। पेपर वाचण्यात दंग असलेल्या शेखर ने काही क्षणांनन्तर ओरडायला सुरुवात केली " काय आज गुरुवार आहे ? मला सांगायला नको का आधी ? तुला उठायला उशीर झाला आणि मला भूक लागली होती म्हणून मी बिस्किटे खाऊन घेतली । तुला माहिती आहे मी कित्येक वर्षांपासून उपास करतो गुरुवारी " । खरं उपवास कोण करत होतं ??????????????????





3
लग्नाच्या दोनच वर्षांनी अपघातात कोमलचा नवरा गेला । घरात सगळे नातेवाईक, शेजारी जमले होते आणि कोणालाच काही सुचत नव्हते । मृतदेह अजून आला नव्हता म्हणून सर्व जण वाट पाहात होते । बायकांची कुजबुज सुरू होती, वाईट झाले हो बिचारीला अजून मुलबाळ ही झाले नाही आणि नवरा गेला, हो न कसं छान जोडपं होतं कुणाची दृष्ट लागली देव जाणे, आई वडिलांना किती  मोठं दुःख आहे अश्या सहानुभूतीपर गोष्टी सुरू असताना पांच वर्षात दोन सुना गेल्यावर मुलाचं तिसऱ्यांदा लग्न लावू पाहणाऱ्या सुनीता ने जरा मोठ्या आवाजात च म्हणलं "काय बाई पांढऱ्या पायाची आल्या आल्या नवऱ्याला खाऊन गेली , बिचाऱ्या उमा ताईंनी कोणा कडे पाहावं आता ? हे ऐकलं आणि एवढया दुःखात ही उमा ताईंना हे सहन झालं नाही त्यांनी विचारले "आणि तुमचा मुलगा काय लाल हातांचा ज्याने तुमच्या दोन सुना खाऊन टाकल्या ?
????????????????

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू