पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वांझ

एका नामवंत सोसायटी च्या मंदिरात सर्व महिला मंडळ  गोळा झालं होतं।येणाऱ्या गणपती उत्सवात भजनाचा कार्यक्रम करायचा म्हणजे सराव करणे गरजेचे होते आणि म्हणूनंच सर्व महिलांची गर्दी सुधा ताईंची आतुरतेने वाट पाहात होती कारण सर्व काही त्यांच्या सूचनांप्रमाणे च होणार होते . एरवी वेळेवर उपस्थित रहाणाऱ्या सुधा ताईंना आज कां बरं उशीर झाला असेल हाच प्रश्न सर्वांच्या मनात होता. तेवढ्यात लगबगीने सुधा ताईंनी मंदिरात प्रवेश केला. त्यांना बघितल्या बरोबर सर्वांनी "काय झालं आज उशीर कां झाला,सर्व ठीक आहे न ?" विचारले.हसत त्या म्हणाल्या" हो सर्व काही ठीक आहे उलट आनंदाची गोष्ट आहे" म्हणजे ? तुम्ही आजी होणार का ? सर्वांनी आनन्दानी विचारले. त्यांनी होकार दिल्या बरोबर सर्व बोलू लागल्या "बरं झालं बाई एक तरी मूल घरात हवंच,सून बरी आहे न?काही त्रास नाही न तिला ?तेव्हां त्यांनी सांगितले की "ती तर खूप आनन्दात आहे , तिच्याच इच्छेने आणि प्रयत्नांने आता गणपती स्थापना झाली की लगेच आम्ही बाळाला घेऊन येऊ"सर्वांनी एकदम आश्चर्यचकित होऊन विचारले "म्हणजे" ?अहो नीला ने दोन तीन जागी नवजात बाळा साठी अर्ज करून ठेवला होता त्यातील एका जागून आज फोन आला आणि आम्ही बाळाला लगेच पाहून पण आलो म्हणूनच मला इथे येण्यास उशीर झाला. इतकं गोंडस बाळ आहे न ."
सुधा ताईंचं बोलणं ऐकून साऱ्या क्षणभर स्तब्ध झाल्या नंतर हळूच एकेकीने बोलायला सुरुवात केली "अहो असाटोकाचा विचार कशाला करता,आजकाल बरेंच नवनवीन उपाय आले आहेत तुम्ही करून बघितले का ?आणि नसेलच काही आशा तर  मुलाला सांगून सुनेला सोडचिठ्ठी द्या आणि मुलाचं दुसरं लग्न करा."हो न त्यात काही चुकीचं नाही, असं होतंच" "अगदी बरोबर आहे, बघा दुसरं लग्न करून,वर्ष भरात घरात बाळ येईल तुमच्या",तुम्ही या अश्या सुनेचे इतके का म्हणून लाड पुरवत आहात ?"सुधा ताईंनी विचारले"अश्या म्हणजे ?" अहो असं काय
करता वांझ नाही का ती . हे ऐकून सुधा ताईंच्या मुखावर एक दुःखाची रेष उमटली पण स्वतःला सावरत मंद स्मित करत त्या म्हणाल्या"मग तर मला माझ्या सुनेचं दुसरं लग्न लावून द्यायला हवं,कारण माझी सून नाही तर माझा मुलगा वांझ आहे. खरंतर आम्ही तिला हे सुचवले ही होते पण तिने स्पष्ट नकार दिला तिचं म्हणणं होतं की"एवढ्याश्या कारणाने मी एवढे प्रेमळ सासू सासरे आणि नवऱ्याला नाही सोडून जाऊ शकत . हे तर माझ्या सोबत पण होऊ शकत होतं त्यावेळी तुम्ही असं केलं असतं का ? मला तरी तसं वाटत नाही मग मी असा स्वार्थी विचार कसा करू शकते ? आपल्या सर्वांना च एका बाळाची हौस आहे त्या साठी आपण सर्वानुमते काही उपाय शोधून काढू आणि आम्हां सर्वांच्या सहमतीनेच तिने हे पाऊल उचलले . आता सांगा अश्या सुनेचे लाड पुरवायला काय हरकत आहे ?"
सुधा ताईंच्या गोष्टी ऐकून सर्व जणी गोंधळात पडल्या
आणि ह्या विषयावर चर्चा सुरू झाली . सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं ते म्हणजे सुधा ताईंनी आपल्या मुलाबद्दल स्पष्टपणे सांगितल्याचे त्यावर त्या म्हणाल्या कां ह्यात काय चुकीचे आहे ? तो माझ्या सुनेला आनन्द देण्यात सक्षम आहे,फक्त काही कारणाने त्याला मूल होऊ शकत नाही एवढंच, म्हणूनंच तर सुनेने हा पर्याय निवडला . आपल्या समाजात ही फार चुकीची समजूत झालेली आहे की एकतर मूल न होणे म्हणजे स्त्री मधेच काही कमी आहे आणि जर पुरूषाला मूल होऊ शकत नसेल तर तो पुरुषंच नाही,त्यामुळे पुरुषात असलेली कमी लपवली जाते आणि स्त्रीलाच जवाबदार ठरवून तिला हिणवले जाते आणि त्यात आम्ही स्त्रियाच पुढारी असतो.काही ठिकाणी मुली ह्या कारणामुळे वेगळ्या होतात ही
पण त्यांच्या सासरची मंडळी तिच्या चारित्र्यावर टिका
करून तिला बदनाम करतात खरंतर तिचं काही च
चुकलेलं नसतं" . तुम्ही म्हणता ते काही अंशी खरं आहे पण आपल्या समाजात अशीच रीत आहे न ? समाज म्हणजे काय हो ? तुम्ही आम्ही मिळूनच समाज आहे न , जर सर्वांनी मोठ्या मनाने मुलगा असो वा सून त्यांना समजून घेऊन विशेष म्हणजे सुनेला सुनेच्या साच्यात न बसवता एक मनुष्य म्हणून जर तिला समजून तिच्या भावना जाणून वागलं तर कोणता समाज आडवा येईल ?स्त्री जर खंबीर पणे लेकी सुनांच्या पाठीशी असेल तर समाजातील 80 टक्के समस्या आणि दुःख कमी होतील.बघा विचार करून, निदान आमच्या सारख्या जाणत्या स्त्रियांनी तरी ह्या बद्दल मनापासून विचार करावा .
आता बराच बदल झाला आहे तरी अजून "वांझ" ह्या
शब्दाने स्त्री ला च हिणवले जाते . किती क्रूर शब्द
आहे हा खरंतर कोणासाठीच वापरू नये , असेलच
तर भेद करू नये ". आज सुधा ताई मनातील साचलेलं भरभरून बोलत होत्या । सगळ्या मनापासून ऐकत होत्या आणि न राहवून एक बोलली "हे सगळं जरी बरोबर असलं तरी अगदी ज्याच्या बद्दल काहीच माहिती नाही असं मूल घेण्यापेक्षा आपल्या नात्यात किंवा ओळखीचे एखादे मूल दत्तक घ्यावे न ?" हो ह्या विषयावर ही आमची बरीच चर्चा झाली आणि शेवटी आम्हाला मुलांचं म्हणणं पटलं . त्यांचं मत होतं आजकाल प्रत्येक जण एक किंवा दोन मुलंच होऊ देतात तेव्हां कुणी कां म्हणून आपलं मूल द्यायला तयार होईल ?समजा आपण विनंती केली आणि कुणी दिलं तरी त्यात मोकळेपणा राहणार नाही घेतलेलं मूल पण बिचारं संभ्रमातच राहील त्या पेक्षा ज्याला कुणी नाही असं बाळ घेतलं तर ते पूर्णपणे आपलंच असेल .  एकीने उत्साहाने सांगितले " हो माझ्या एका मैत्रिणीच्या मुला सुनेने एक मुलगा झाल्यावर दुसरं अपत्य म्हणून एका अनाथ मुलीला दत्तक घेतलं त्यांचं मत होतं अनाथ मुलींचं आयुष्य फार कठीण असतं आपण निदान एका आयुष्या ला तरी सांभाळून घ्यावं ". खरंय अगदी, किती मोठ्या मनाची माणसं असतात बघा ही, मला पण वाटतं ईश्वराने ही एक संधी दिली आहे परोपकाराची ती घालवू नये . हो न . असे सुखद बदल समाजात घडत आहेत पण त्यांचं प्रमाण फारंच कमी आहे अनेक वेळा मनात येऊन सुद्धा फक्त लोकं काय म्हणतील ह्या भीतीने आम्ही पाऊल पुढे घेत नाही आणि अश्या विषयांवर चर्चा पण करत नाही . अश्या बराच वेळ गप्पा रंगल्या शेवटी खूप उशीर झाला म्हणून सर्वांनी निरोप घेतला पण एका महत्वाच्या विषयावर मोकळेपणाने व्यक्त होता आले हे समाधान सर्वांच्या मनात होते . बघा आपणही विचार करून अश्या छोट्या छोट्या पावलांनी च समाज प्रगत होत असतो .





पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू