पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दीप उजळले आली दिवाळी

देव्हारा आज पुन्हा चमकलादेव्हाऱ्यातील जळमटे काढली
एकादशीला चकाकले देव,
देवांची आज उजळण झाली

 


वासरा सहित गौ मातेस
द्वादशीला आम्ही पूजा केली
वसुबारस अशी आमची
पुरणपोळी प्रसादाने साजरी झाली


आरोग्याच्या देवतेला 
आम्ही विनंती आज केली
धन्वंतरी देवा मुळे त्रयोदशी
धनत्रयोदशी म्हणून प्रसिद्ध झाली


भल्या पहाटे अभ्यंग स्नान
नरकासुर मारून स्वारी खुश झाली
अनारसे चकली ह्या फराळाने
सकाळ आमची स्वादिष्ट झाली
 
चारीबाजुला लावले दिवे
रांगोळीच्या रंगांनी आंगणे रंगीत झाली
छान छान कपडे खूप फटाके
लक्ष्मीच्या आगमनाची तयारी झाली


दीपोत्सव झाला साजरा 
पाडव्याची पहाट आली
औक्षण नवऱ्याचे करून
आनंदी सौभाग्यवती झाली


भाऊ बहिणीच्या प्रेमाने
भाऊबीज साजरी केली
येता भाऊ घरी बहिणीच्या
बहीण मनी आनंदली


अशा हा सण सप्त दिनाचा
घरोघरी आनंदाची उधळण झाली
दीप उजळले आली दिवाळी
नात्यांच्या गुंत्यात दिवाळी अविस्मरणीय ठरली


सौ. अनला बापट

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू