पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सण दिवाळीचा

आनंदाची उधळण झाली

दीप उजळले आली दिवाळी

सण आलाहा मौजमजेचा

खाऊ चिवडा नि कडबोळी

 

लुटू आनंद वाजवू फटाके

खेळू सुटीत नवनवे खेळ

मजा करू रे मजा करूया

नका घालवू फुकाचा वेळ

 

केरसूणी अन् पुस्तकसंच

पुजूया लक्ष्मीमातेला सारे 

लावूया लक्ष दीप अंगणी

उघडू प्रेमाने हृदयाची दारे

 

नको रागद्वेष रूसवा करु

देऊया हो आनंदाने नारे

भेटू नातलग सोयऱ्यांना

मित्र मैत्रिणी मिळूनी सारे

 

नाही अभ्यास नसे परीक्षा

सण वर्षाचा हा दिवाळीचा

टेन्शन न् दप्तर दूर ठेवूया

सण असे हा खेळीमेळीचा

 

सौ. भारती दिलीप सावंत

 

खारघर, नवी मुंबई

 

9653445835

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू