पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्रावण सरी (बरसात काव्य सरींची) पुस्तक प्रकाशन

सौ.मृदुला राजे आणि त्यांची कन्या प्राची राजे संचालित आणि कै.सौ.मंगला मदन फडणीस ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्थापित "स्मृती-गंध" फेसबुक समूहाचा पाचवा वर्धापन दिन रविवार दिनांक ३ डिसेंबर , २०२३ रोजी ऑनलाईन सभेमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ह्या प्रसंगी कै.सौ. मंगला मदन फडणीस ह्यांच्या तिसाव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांना आदरांजली अर्पण करणारा "श्रावण-सरी.... (बरसात काव्य सरींची)" हा काव्य-संग्रह Shopizen.in संस्थेच्या मराठी विभाग प्रमुख सन्माननीय ऋचा दीपक कर्पे ह्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. समारंभात ज्येष्ठ कवयित्री सौ प्रमोदिनी देशमुख ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या आणि सन्माननीय प्रकाशक ऋचा दीपक कर्पे ह्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.


कै.सौ.मंगला मदन फडणीस ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांची कन्या सौ. मृदुला राजे व नात प्राची राजे ह्यांनी स्थापन केलेला स्मृती-गंध समूह महिलांच्या कलागुणांचा विकास करत, लेखनाची आवड निर्माण करत आहे. ह्या समूहातर्फे विविध साहित्यिक उपक्रम आयोजीत करण्यात येतात आणि सहभागी सख्यांना सन्मानपत्रे किंवा भेटवस्तू अर्पण करण्यात येतात. समूहातर्फे श्रावण महिन्यात श्रावण काव्य लेखन MARATHON आयोजीत करण्यात आली होती आणि "रोज एक शब्द - रोज एक कविता " अशा पद्धतीने "तीस दिवस - तीस शब्द - तीस कविता" हा श्रावण काव्य-उत्सव संपन्न झाला. ह्यामध्ये साधारण ३५ कवयित्रींनी रोज कविता लिहून प्रत्येकी ३० कवितांची निर्मिती केली आहे. ह्यातील काही प्रातिनिधिक कविता निवडून ३५ कवयित्रींच्या ७० कवितांचे संकलन असलेला काव्यसंग्रह स्मृती-गंध समूहातर्फे संचालिका सौ.मृदुला राजे आणि प्राची राजे ह्यांनी Shopizen.in ह्यांच्या माध्यमातून प्रकाशित केला. संग्रहात प्राची राजे ह्यांचे मनोगत, सौ.मृदुला राजे ह्यांची प्रस्तावना, ज्येष्ठ कवयित्री सौ.प्रमोदिनी देशमुख व सौ. स्वाती शृंगारपुरे ह्यांची शुभेच्छापत्रे समाविष्ट आहेत. कै.सौ.मंगला मदन फडणीस ह्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने हा संग्रह प्रकाशित केला असल्याने पुस्तकाच्या मलपृष्ठावर त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.
शाॅपिझन प्रकाशन संस्थेच्या मराठी विभागप्रमुख ऋचा दीपक कर्पे ह्यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे सहकार्य लाभल्याने एक सर्वांगसुंदर काव्यसंग्रह निर्माण करून स्मृती-गंध समूहाने आपले पहिलेच पुस्तक प्रकाशन केले आहे.
ह्या काव्य संग्रहात सहभाग नोंदविलेल्या कवयित्रींचा सन्मान करण्याच्या हेतूने पुस्तक प्रकाशन समारंभानंतर ज्येष्ठ कवयित्री सौ.प्रमोदिनी देशमुख ह्यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवयित्रींचे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनामध्ये "श्रावण " ह्या विषयावरील बहारदार कविता सादर करण्यात आल्या. संमेलनाध्यक्ष प्रमोदिनी देशमुख ह्यांचे उचित मार्गदर्शन व स्वरचित कवितेचे सादरीकरण ह्यामुळे कार्यक्रम रंगला. विशेष अतिथी ऋचा कर्पे ह्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे आपली "श्रावण " ह्या विषयावरील सुंदर कविता सादर करून श्रोत्यांना आनंदाचा धक्काच दिला. प्राची राजे ह्यांचे सूत्रसंचालन आणि मृदुला राजे ह्यांच्या अभिप्रायाने प्रत्येक कवितेला उचित न्याय मिळाला. समूहाच्या एक संचालिका सौ.सोनल साटेलकर ह्यांनी सर्व कवयित्रींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाची सांगता प्राची राजे ह्यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

प्रेषक... सौ. मृदुला राजे
संचालिका, स्मृती-गंध समूह
दिनांक.. ४ डिसेंबर, २०२३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू