पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बोगितल भूत

बोगितले भूत ( ट्रेन कथा )
जिंताना एक खेडेगाव. तस पाहील तर दुर्गम भागातल.  डोंगर दऱ्यातलं एक छोटस आदिवासीच भाग म्हणा ना!.  अजयचं हे मूळ गाव. नोकरीं निमित्त तो दूरच्या शहरात गेला असला तरी त्याला गावची ओढ चांगलीच होती. त्याला आपल्या गावाबद्दल आकर्षण होते.  गावचा अभिमान होता. गावाची अनेक वैशिष्ट्य होती. त्यातील एक वैशिष्ठय म्हणजे गावात फारशा सुविधा नसल्या तरी रेल्वेची सुविधा मात्र होती. रेल्वेच्या धडधडीने गाव सतत जागा असायचा. सारा गाव रेल्वेनेच प्रवास करायचा. गाव तस दुष्काळी. रोजंदारी करणारांची संख्या मोठी. त्यामुळे पोराबाळांनी नोकरीसाठी गाव सोडलेलं. शहराकडे धाव घेतलेली. तिथंच नोकरीत रमलेले. कधी तरी त्यांची गावाकडे ये जा असे. त्याच गावात रूपा रहात होती. गोरी गोमटी होती. नजरेने घायाळ करणारी होती. पाहताक्षणीच कोणीही प्रेमात पडेल असे व्यक्तिमत्व. अजय प्रमाणे खूप शिकलेली होती. अजय आणि रूपा यांची फेसबुकवर मैत्री झाली होती. मैत्रीचे रूपांतर जवळीक होण्यात झाले.
अजय आणि रूपा दोघेही आज अगदी मजेत होते. त्यांच्या मनासारखं आयुष्यात सार काही घडत होत. दोघे एकाच कंपनीत नोकरीला होते. कामाचा फारसा ताण नव्हता. पगाराचा आकडा देखील खूप मोठा होता. त्यातच त्यांनी एकमेकांवर जीवापाड प्रेम केले होते. त्याचीच परिणीती आता त्यांच्या विवाह बंधनात झालेली होती.  शाही थाटात त्यांचे लग्न झाले. दोघेही क्षणभर देखील एकमेका पासून दूर राहू शकत नव्हते. लग्न पूजा गोंधळ सारे काही पार पडले होते. दोघांच्या मनात आता एकच प्रश्न होता तो म्हणजे हनिमून साठी कोठे जायचे?
दोघेही फिरण्यासाठी खूप उतावीळ झाले होते. चांगली आठ दिवसाची दोघांनी सुट्टी घेतली होती.  रेल्वेचे आरक्षण देखील केले होते. निवासाची देखील व्यवस्था झालेली होती. एका चांगल्या पर्यटन स्थळाची त्यांनी निश्चिती केली होती. बघता बघता जाण्याचा दिवस उजाडला. दोघांनी आपल्या स्वतंत्र सुटकेस घेतल्या होत्या. दोघेही मॉडर्न त्यामुळे मेकअप सामानच जास्त होते. खरं तर जिंताना हे त्यांचे गाव होतच जेमतेम 500 लोकवस्तीचे. त्याच गावातून रेल्वे सुटणार होती. मुळातच  गाव गर्द झाडीत होते. लोकांची फारशी वर्दळ नव्हती. नदीने गावाला वेढलेले होते. गावात रस्त्यापेक्षा खड्डेच जास्त होते. कसेबसे ते खड्डा चुकवत रेल्वेस्टेशन वर येऊन पोहचले.
दोघेजण खरं तर मधुचंद्राच्या ट्रीप साठी रेल्वे स्टेशनवर आले होते.   त्यांनी गाडीचा प्लॅटफॉर्म शोधून काढला. तेथे गाडीच्या प्रतीक्षेत असतानाच बिंदिया एक्सप्रेस वेगात येऊन थांबली. वेळ साधारण रात्री आठची होती. त्यांनी त्यांच्या बोगीत प्रवेश केला. दोन तीन माणसांचा अपवाद वेगळला तर सारी बोगी रिकामीच होती. पाच मिनिटातच गाडी मार्गस्थ झाली. बाहेर काळकुट्ट अंधार होता. अमावस्या असल्याने मनातील भीतीचे वातावरण गडद झाले होते. मधूनच रेल्वेच्या वेगाने शांतता भंग पावत असे.
अजय आणि रूपा आपल्या जागी गप्पा मारत बसले होते. आयुष्याची स्वप्ने रंगवत होते. प्रेम प्रकरणाला उजाळा देत होते. त्यांच्या समोरच्या जागा मोकळ्याच होत्या. अगदी आरामात त्यांचा प्रवास चालला होता.अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात गाडी थांबल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अजयने बाहेर डोकावून पाहिले. भूतगाव हा नावाचा फलक पाहून त्याला थोडे आश्चर्य वाटले. रूपाने विचारले, " कोणते गाव आहे? आपण कोठे आलोय? " अजय म्हणाला, " अग, हे भूतगाव आहे.  " गावाचे नाव ऐकून रूपा हसली. मनातून मात्र ती अधिकच घाबरलेली होती. भूत हे नाव ऐकूनच तिने अजयला घट्ट मिठी मारली. दोघांचा तो एकमेकांना पाहिला स्पर्श होता. एकमेकांच्या स्पर्शाने ते अधिकच सुखावले.
गाडी बराच वेळ फलाटावर थांबली होती. अजय बोगीच्या दरवाजा जवळ गेला. बाहेर फारसे लोक नव्हते.  त्याने एका कुलीला हाक मारली.  "गाडी किती वेळ थांबणार"? असे उत्सुकतेपोटी विचारले. त्या कुलीने  सांगितले, " गाडी पाणी भरण्यासाठी येथे नेहमी थांबते. या गावाचे नाव भूतगाव आहे. हा भूतांचा थांबा आहे. आज अमावस्या आहे.  त्यामुळे गाडी जरा जास्तच वेळ थांबेल.  परिसरातील समदी भूत आज या  ट्रेन मधून प्रवास करतात. ती सारी या स्टेशनला बसतात अन पुढच्या स्टेशनला उतरतात. ती समदी जमली की ट्रेन सुरु होईल. "  त्या माणसाचे बोलणे ऐकून अजयला गंमत वाटली.  त्याने पुन्हा बाहेर नजर टाकली. गावाच्या नावाचा फलक होता. त्यावर एक विचित्र चित्र काढलेले होते. अजय बराच वेळ त्या चित्राकडे पहात बसला. धोक्याच्या सूचने साठी जसा लोगो वापरतात तसे ते चित्र होते. माणसाचा चेहरा नव्हताच तो. अजय बराच वेळ त्याचा विचार करू लागला.
तेवढ्यात ट्रेन सुरु होणार असल्याचा इशारा मिळाला. अजय आपल्या जागेवर येऊन बसला. ट्रेन सुरु होताच काहीजण त्या बोगीत चढले. ते बोलत होते मानवी भाषेत. अजय व रूपा बसले होते तेथे त्याच्यासमोर येऊन ते दाटीवाटीने बसले. त्यांच्या हातात वेगवेगळी पुस्तके होती. आपल्या चेहऱ्या समोर पुस्तके धरून त्यांनी वाचनाचे जणू काही सोंगच घेतले होते. अधून मधून पुस्तक बाजूला करून ते त्या दोघांना न्याहळत होते.
अजय व रूपाने पुस्तकाचे नाव वाचण्याचा प्रयत्न केला. त्यावरील अक्षरे अंधुक प्रकाशात त्यांनी वाचली. तुमचा भुतावर विश्वास आहे का?, भूतसृष्टीचे अस्तित्व तुम्ही मानता का? , तुम्ही आमच्या विश्वात आहात, भूत एक प्रश्नचिन्ह? अशी ती वेगवेगळी पुस्तके होती. अजयला त्या माणसाचे ते बोलणे पुन्हा आठवले.  रूपा घाबरेल म्हणून अजयने त्यातील काहीही तिला सांगितले नाही. त्याला मात्र एका वेगळ्या संकटाची चाहूल लागलेली होती.
आता किमान तासभर तरी रेल्वे धावतच राहणार होती. तिला आता लवकर थांबा नव्हता. अजय रूपाचे डोळे आता झाकू लागले होते. त्यांनी बरोबर आणलेल्या थर्मास मधील चहाचा घुटका घेतला. जरा तरतरी आल्यासारखे वाटले. अजयने समोरच बसलेल्या माणसाला विचारले, " कोठे जाणार? " तो म्हणाला, " वेताळनगरला"  अजयने पुन्हा विचारले, "सर्वजण " तो माणूस म्हणाला, " होय आम्ही सगळे वेताळ नगरला जात आहोत. अमावस्या आहे ना. तिथं मोठी यात्रा असते आमची. आमचे सगळे पै पावणे येतात. भेटी गाठी होतात. आमी बी तिकडचं चाललोय." अजय म्हणाला, " तुम्ही सर्वजण भुताखेतांची पुस्तके का वाचता? तुम्हाला भीती वाटत नाही. " अजयचा हा प्रश्न ऐकून त्याने पुस्तक बाजूला केले आणि एकटक अजय रूपाकडे पाहू लागला.
" अरे भूतांची माणसांना भीती, आमाला कसली आलीय भीती " असे त्याने म्हणताच बाकी सारेजण भेसूरपणे हसू लागले. त्यांच्या हास्यात देखील एक प्रकारची क्रूरता होती. अजय रूपा आणखी घाबरले पण प्रसंगावधान दाखवत त्यांनी त्यांच्या हास्यात आपले हसू मिसळले.
भूत कसे अस्तित्वात येते? भुताला वश कसे करायचे? भुताचा प्रभाव अधिक कधी असतो? भुताला काय प्रिय असते? याची चर्चा त्यांनी एकमेकांशी केली. ती अधिकच रंगत गेली. त्यांचे ते  ज्ञान पाहून ते दोघेही थक्क झाले. अखेर ते सारेजण त्यांचा वेताळनगर थांबा आला म्हणून जाण्यासाठी उठले. रात्रीचे बारा वाजले होते. बारा वाजता भूतांची हालचाल होते हे अजयने यापूर्वी वाचले होते. अजय व रूपा त्यांच्या हालचालीकडे बारीक लक्ष ठेवून होते. ते उठून बोगीच्या दरवाजा कडे जात असताना त्यांचे पाय उलटे असल्याचे त्यांना दिसले. ती माणसे असती तर त्यांचे पाय सरळ असते. अशी त्या दोघांना शंका आली. त्यांनी मागे वळून पाहिले. त्यांचे हात माणसाच्या हातापेक्षा दुप्पट लांब होते. चेहरा विद्रुप होता. त्यांचा विद्रुप चेहरा पाहताच रूपा जोरात किंचाळली. तिचा आवाज ट्रेनच्या आवाजामुळे फारसा कोणाला ऐकू गेला नाही. अजयने तिला कसे तरी सावरले. धीर दिला.
गाडीचा वेग कमी झाला. गाडी आता वेताळनगरला थांबली होती.  त्यानी पटापट गाडीतून खाली उडी टाकली. अचानक ते गायब झाले. अजयने त्या सर्वाना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र अंधारात ते कोठे गायब झाले हे त्याला कळलेच नाही. दोघांनी प्रत्यक्ष भूत नव्हे तर भुते पाहिली होती.  त्यांच्याशी
संभाषण केले होते. केवळ त्यांच्याकडे कोणताही पुरावा नसल्याने ते  आपण भूत पाहिले आहे. भूत अस्तित्वात आहे असे ठामपणे कोणालाही सांगू शकत नव्हते. त्यांनी जरी हा प्रसंग कोणाला सांगितला असता तरी त्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता. त्यांना त्या घटनेचा पुरावा मागितला असता. आपला जीव कसा तरी वाचला यातच त्यांनी धन्यता मानली. गाडीने आता पुढच्या प्रवासाला सुरवात केली होती. दोघांनी हा प्रसंग विसरायचे ठरवले मात्र ते विसरू शकले नाहीत. ज्या ज्या वेळी त्यांनी रेल्वेने प्रवास केला त्या त्या वेळी त्यांना या प्रसंगाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. भूत खरोखरीच आहे का? की आपला तो दृष्टीभ्रम आहे? दर अमावस्येला भुताची पालखी निघते का? माणसात जसे स्त्री पुरुष असे दोन प्रकार असतात तसे भूत आणि हडळ असे दोन प्रकार त्यांच्यात देखील असतात का? भुताचे पाय उलटे का असतात? माणसासारखे ते बोलू शकतात का? असे अनेक प्रश्न त्यांना सतावत राहिले.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू