नव्याने जगूया
नव्याने जगूया
अलका पुणतांबेकर
वडोदरा, गुजरात
येत्या नवीन वर्षाला नव्याने जगू या l
वाटचालीला जुन्यातून उत्कृष्ट घेऊया ll
आनंदाचे क्षण जपून ठेवू या l
दुःख वजा करून पुढे जाऊया ll
अश्रू धारांची वाट अवरुद्ध करूया l
स्मित हास्याने मधुर आठवणी वर्षवूया ll 1 ll
येत्या नवीन वर्षाला नव्याने जगू या
तणावाला मागे सोडून त्यापासून दूरत्व वाढवू या l
रागाचा ताबा घेऊन त्याला मनातून घालवून देऊ या ll
प्रेमाचे घर बांधून मनात त्याला जागा देऊ या l
हर्षाने परिसर फुलवूनी सुगंध त्याचा दरवळू या ll 2 ll
येत्या नवीन वर्षाला नव्याने जगू या
शत्रुत्वा चा डोंगर पोखरून त्याचा नायनाट करू या l
मैत्रीचा पूल बांधूनी सुंदर सुदृढ नाती जोडूया ll
असत्याचा साथ सोडून सत्याचे दीप जळवूया l
मदतीचे हात वाढवून गरजवंतांची गरज भागवू या ll3 ll
येत्या नवीन वर्षाला नव्याने जगू या
अलका पूणतांबेकर
वडोदरा, गुजरात