पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शर्थीने खिंड लढवली: पुस्तक परिचय

'शर्थीने खिंड लढविली' ही रोहन बेनोडेकर या तरुण लेखकाची पहिलीच कादंबरी. छत्रपती शिवरायांच्या कालखंडाबद्दल निर्माण झालेल्या विशेष ओढीमुळे त्याबाबतीत लेखन सुरु झाले. लेखक म्हणतो 'शिवचरित्रातील प्रत्येक कथा, प्रसंग हा कादंबरीचा विषय आहे. या चरित्राइतकं परिपूर्ण चरित्र कलियुगात सापडणे नाही.'

दहा शिवचरित्रकारांनी लिहिलेल्या शिवचरित्राचा आधार घेऊन आपल्या शैलीत ही कादंबरी लेखकाने लिहिली आहे. त्यातील काही शिवचरित्रकारांच्या लेखनशैलीचा प्रभाव या कादंबरीत जाणवतो. ही कादंबरी गजापूरची घोडखिंड थोपवून धरणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर लिहिली आहे.

 ७९ पृष्ठांची ही कादंबरी शॉपिजन प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आली आहे. ती ओघवत्या व प्रवाही भाषेत लिहिल्यामुळे वाचनीय झाली आहे. 

या कादंबरीमध्ये जी पात्रे आहेत, त्यांची संख्या एकूण ४१ आहे. अशा पात्रांची ओळख लेखकाने नावानिशी सुरुवातीच्या दोन पृष्ठांमध्ये करून दिली आहे. त्यामुळे ती पात्रे कोण आहेत याची माहिती मिळते. या कादंबरीत माँसाहेब जिजाऊ - नेतोजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे - छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील संवाद भावपूर्ण आहेत. बाजीप्रभू देशपांडे यांच्याबरोबर रायाजी बांदल यांच्या सेनेने घोडखिंडीत लादलेली ही लढाई त्यांच्या रक्ताने पावन झाली आणि ती नंतर पावनखिंड म्हणून प्रसिद्ध झाली. अशी ही ऐतिहासिक कादंबरी कुमारवयीन मुलांनी अवश्य वाचावी.

 

पुस्तकाचे नाव: शर्थीने खिंड लढवली

लेखक: रोहन बेनोडेकर

पृष्ठसंख्या : ७९

किंमत: १६५/-

उपलब्धता: शॉपिज़न, एमेझॉन, फ्लिपकार्ट

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू