पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझे आवडते पुस्तक: श्री गजानन कथासागर

श्री गजानन कथासागर!

शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांची कथा अशीच श्रवणीय, रसाळ नि गोड आहे! कितीही वेळा वाचली, ऐकली तरी पुन्हा पुन्हा वाचावी वाटते. गजानन विजय ग्रंथाचे नित्यनेमाने, भक्तिभावाने पारायणे केली तरी पुन्हा पुन्हा भक्त वारंवार पारायण करतात. काही भक्तांना तर संपूर्ण गजानन महाराज ग्रंथ तोंडपाठ असल्याचे जाणवते परंतु तरीही ते प्रत्येक वेळी मोठ्या उत्साहाने पारायणाला बसतात. अनेक भक्तांनी गजानन महाराज यांच्या कथा, चरित्र आपल्या भाषेत लिहिले आहे. 

     गजानन महाराज यांचे निस्सिम भक्त श्री जयंत कुलकर्णी, पुणे यांनीही श्री गजानन महाराज यांच्या आशीर्वादाने 'श्री गजानन कथासागर' हा ग्रंथ लिहिला आहे. कोणताही धार्मिक ग्रंथ लिहिणे हे सोपे काम नसते. त्यासाठी तशी सेवा पाहिजे, श्रींची कृपा असावी लागते. दुसऱ्या शब्दात एक प्रकारे पुण्य संचय असावा लागतो, थोरामोठ्यांचा आशीर्वाद असावा लागतो, वाडवडिलांची पुण्याई असावी लागते. श्री जयंत कुलकर्णी यांच्याकडे ही श्रीमंती निश्चितच आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून हे अजरामर कार्य श्री गजानन महाराज यांनी करवून घेतले. मनुष्य प्राणी निमित्तमात्र असतो. कर्ता करविता तो ईश्वरच असतो. श्री कुलकर्णी यांनी श्री गजानन विजय ग्रंथाची खूप पारायणे केली असल्याचे त्यांनी लिहिलेल्या कथांमधून जाणवते.प.पू. श्री दासगणू महाराज यांनी लिहिलेल्या गजानन विजय ग्रंथातील बारीकसारीक गोष्टींची नोंद कुलकर्णी यांनी मोठ्या भक्तीने लिहिली आहे. हा ग्रंथ कुलकर्णी यांनी अत्यंत तल्लीनतेने, श्री महाराज चरणी लीन होऊन लिहिला आहे.

   श्री जयंत कुलकर्णी यांचे प्रकाशित होणारे हे पहिलेच पुस्तक आहे. त्यात नवखेपणाच्या खुणा मुळीच नाहीत. अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने कुलकर्णी यांनी हा कथासागर श्री महाराजांच्या भक्तांसाठी शब्दबद्ध केला असून कथा रसाळ आहेत, समजायला साध्यासोप्या आहेत त्यामुळे त्यात नीरसता येत नाही. श्री जयंत कुलकर्णी ह्यांना श्री गजानन महाराज यांचा कृपाशिर्वाद लाभलेला आहे म्हणून असे पवित्र कार्य त्यांच्या हातून घडले आहे. अशीच वेगवेगळी ईश्वरसेवा त्यांच्या हातून घडो ही श्री गजानन महाराज यांच्या चरणी प्रार्थना! 

    हा ग्रंथ शॉपिजेन या संस्थेने अत्यंत दर्जेदार स्वरुपात प्रकाशित केला आहे.

            ००००

       नागेश शेवाळकर पुणे

          ‌(९४२३१३९०७१)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू