पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

काही भयकथा (अल्क)

*माझ्या लिहिलेल्या काही भयकथा (अलक):*

 

1) "रात्रीचे दार उघडे ठेऊ नये कोणीही घरात येऊ शकते" म्हणत एक पन्नाशितला म्हातारा, आम्ही नवीन शिफ्ट झालो त्या घरात येऊन भरपूर गप्पा मारून गेला.

चांगले शेजार आहे म्हणून आनंद वाटला.

सकाळी भेटायला गेलो तर कळले की ते काका जाऊन दहा वर्ष लोटली आहे.

 

2) ती एक यशस्वी ऑपरेशन करून घरी आली तर आई दारातच औक्षण करायला उभी! ती खूप सुखावली.

एवढ्यात फोन वर मेसेज आला,"तुझ्या आईला दोन वाजता देवाज्ञा झाली.तू ओटी मधे असल्याने मेसेज केला."

 

3) आज ती तिला हवी तशी हिरवीकंच कांजीवरम साडी, हिरव्या बांगड्या,चांदीच्या जोडव्या आणि मणी मंगळसूत्र घेऊन आला.

नेहमी ह्याला फालतू खर्च म्हणणारा आज स्वतःच तिला तयार करत होता.

ती मात्र जवळच्या पिंपळाच्या झाडावरून त्याची लगबग बघत होती.

 

4)आज आपण काहीच लिहू शकलो नाही, ह्या दुःखात त्याला झोप नव्हती.

तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर आपोआप काही टाईप होताना दिसले. मोबाईल खराब झाला समजून तो झोपला.

"मित्रा कालची तुझी भुतकथा खूपच व्हायरल झाली आहे" मित्राच्या फोन ने त्याला जाग आली.

*©® सौ. अनला बापट*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू