पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बदला

ट्रेन कथा
बदला
सोनमचा जन्म झाला. तिच्या आई वडिलांना पहिली मुलगी झाली म्हणून खूप आनंद झाला. ती होतीच मुळी जन्मापासून अगदी अल्लड. तिचे बालपणीचे लाघवी हास्य सर्वांच्याच कौतुकाचा विषय होता. गोबरे गाल, चिमुकले ओठ, हातापायांची सतत होणारी वळवळ सर्वांनाच आकर्षित करत असे. ती आई वडिलांपाशी कमी मात्र शेजाऱ्याकडे जास्त असे. हळूहळू ती मोठी होत गेली. तिच्यात बदल जाणवू लागला. बालवाडीत जायला लागली आणि बोबडे बोल तिच्या ओठातून बाहेर येऊ लागले. तिचा सहवास अनेकांना हवाहवासा वाटू लागला. प्राथमिक शाळेत जाऊ लागली आणि तिला बाहेरच्या जगाची थोडीफार ओळख होवू लागली. शेजारीच राहणाऱ्या शाळेच्या बाई तिला आपल्या बरोबर घेऊन जात असत. तिला शाळेत काय हवे काय नको हे पहात असत. बघता बघता ती हायस्कुलला गेली.  इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचवीच्या वर्गात तिने प्रवेश घेतला. तिच्या आई वडिलांची तिने इंग्रजी माध्यमातून शिकावे अशी इच्छा होती. मुळातच ती बुद्धिमान होती. उपजतच काही गुण तिच्याकडे आले होते. दहावीला आली आणि जीवनातील पहिल्या मोठ्या परीक्षेला तिला सामोरे जावे लागले. म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याप्रमाणे तिने यशाची सारी शिखरे पादाक्रांत करायला सुरवात केली.
पुढील शिक्षणासाठी तिला तालुक्याच्या गावी जावे लागले. ती ज्या गावात रहात होती तेथे दहावी पर्यंत शाळा होती. आई वडिलांचे तिच्यावर जीवापाड प्रेम होते. तिची कोणतीही मागणी विनासायास मान्य केली जात होती. एक दिवस ती वडिलांना म्हणाली, " बाबा यापुढच्या शिक्षणासाठी मी तालुक्याच्या गावी जावे म्हणते " इंग्रजी माध्यमातून जरी शिकलेली असली तरी तिच्यावर तिच्या संस्कृतीचे संस्कार झालेले होते. तिच्या बाबांनी क्षणाचाही विलंब न लावता तिला होकार दिला. आई मात्र मुलगी दूर जाणार म्हणून सतत काळजीत होती. पाखरे मोठी झाली की घरटे सोडून दूर निघून जातात. तसेच मुले मुली मोठी झाली की त्यांच्या भवि्तव्याच्या शोधार्थ दूर जाणारच. असे सांगून वडिलांनी तिच्या आईची समजूत काढली.
तालुक्याला जाण्याचा दिवस उजाडला. तिने वसतिगृहात नाव नोंदवले होते. त्यामुळे राहण्याचा जेवणाचा प्रश्न सुटला होता. मुलामुलींचे वसतिगृह समोरासमोर होते. नीरज हा मुलांच्या वसतिगृहात होता. जेवणासाठी दोघेही एकाच ठिकाणी येत होते. त्यांच्या रोजच्या भेटीचे रूपांतर ओळखीत झाले. ओळख इतकी दृढ होत गेली की दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले तेच कळले नाही.
दोघे एकाच कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीत होते. सोनम आणि नीरजच्या प्रेमाची चर्चा परिसरात सुरु होती. एक दिवस सोनमच्या वडिलांना त्यांच्या एका मित्राने हा सारा प्रकार सांगितला. आई वडिलांनी एक दिवस सोनम जवळ हा विषय काढला. सोनमने देखील न घाबरता " आम्ही दोघे लग्न करणार आहोत " असे सांगितले. त्यांनी नीरजला त्यांच्या घरी बोलावले. त्याचे मत जाणून घेतले. दोघांचा होकार दिसताच त्यांच्या लग्नाला परवानगी दिली.
दोघांचे थाटात लग्न झाले. सोनम गोऱ्या रंगाची होती. तिला साडीत पाहिल्यावर कोणीही तिच्यावर फिदा होईल असे तिचे व्यक्तिमत्व होते. नीरज देखील दिसायला सुंदर होता. दोघांचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा होता. लग्नानंतर आठ दिवस फिरायला कोठेतरी जाण्याचा ते दोघे विचार करू लागले. निमगाव हे त्यांचे दोघांचे राहण्याचे ठिकाण होते. ते रेल्वेचे प्रमुख स्थानक होते. त्यांनी आंबाला या 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचे ठरवले. गर्द वनराईचा हा परिसर. दोघांनी प्रवासाचे आरक्षण केले. अमितला ही गोष्ट समजली. अमित तसा दोघांचा जवळचा मित्र. तो देखील त्यांच्याच ठिकाणी नोकरीस होता. श्रीमंत कुटुंबातील असल्याने त्याला गर्व होता. तो देखील सोनमवर प्रेम करत होता. त्यांचे एकतर्फी प्रेम होते. सोनम त्याच्या प्रेमाला अजिबात प्रतिसाद देत नव्हती. अमित मात्र तिच्याशी लंग्न करण्यासाठी उतावीळ झाला होता.
सोनम नीरज यांचे लग्न झाल्यापासून अमित काहीसा नाराज होता. जीवनातील निराशेने त्याला ग्रासले होते. सोनम आपल्याला मिळाली नाही तर कोणालाही मिळता कामा नये असा दुष्ट विचार त्याच्या मनात आला. त्याने त्यांच्याबरोबर त्याच ट्रेन मधून जाण्याचे ठरवले. सोनमला अमितच्या एकतर्फी प्रेमाची कल्पना होती. नीरज मात्र त्यांच्या अफेयर बद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होता. बोलता बोलता अमितने त्यांच्या प्रवासाची सारी माहिती नीरजकाढून काढून घेतली.
सोनम नीरज पहाडी एक्सप्रेसने प्रवास करणार होते. त्यांचा आरक्षण क्रमांक  SR-1 व SR-4 असा होता. दोन्ही खिडकी जवळच्या समोरासमोरील जागा होत्या. दोन दिवस आधी अमित रेल्वे स्टेशनवर गेला. त्याने चौकशी केली असता संपूर्ण गाडी पॅक असल्याचे त्याला जाणवले. त्याने तात्काळ मध्ये SR-2,3,5,6 मधील रिझर्वेशन भेटते का याची चौकशी केली. त्याने त्यासाठी एक दिवस घालवला. अखेर सायंकाळी चार वाजता त्यातील दोन रिझर्वेशन रद्द झाल्याचे त्याला त्याच्या टीसी मित्राकडून समजले. त्याचा आनंद गगनात मावेना. त्याने त्यातील एक तिकीट घेतले. तोही जाण्याच्या तयारीला लागला.
अमितने त्याबाबत नीरज सोनमला काहीही कल्पना दिली नव्हती. दोन दिवसावर जाण्याची वेळ आली होती. दुपारी तिघेजण कँटीन मध्ये कॉफी पिण्यासाठी आले होते. नीरज सोनम खुश तर होतीच पण अमित देखील खुश होता. नीरजने अमितला खुशीचे कारण विचारले असता " ते एक सरप्राईज आहे " असे उत्तर त्याने दिले.
सकाळी नऊ वाजताची ट्रेन होती. नीरज सोनम आपल्या सामाना निशी रेल्वे स्टेशनवर आले. पहाडी एक्सप्रेसचे आंबाला येथे जाण्यासाठी आगमन झाले. दोघांनी आपली बोगी व सीट शोधून काढल्या. आपापल्या जागावर ते जाऊन बसले. एकमेकांशी गप्पा मारण्यात मग्न झाले. तेवढ्यात ट्रेन सुटण्याची शिट्टी वाजली. धीम्या गतीने ट्रेनने प्रस्थान केले. तेवढ्यात धावत पळत अमित ट्रेनच्या त्याच बोगी मध्ये शिरला जेथे नीरज सोनम बसले होते. नीरजने हळूच सोनमला आपल्या कवेत घेतले. तिचे दीर्घ चुंबन घेतले. सोनम लाजने चक्काचूर झाली. तिने हाताने आपले तोंड दडवून घेतले. तेवढ्यात अमितचे आगमन झाले. त्याला पाहताच नीरज म्हणाला, " अरे अमित तू कसा काय इकडे? " अमित म्हणाला, " सरप्राईझ ". त्याचे ते शब्द ऐकले आणि सोनमने आपल्या चेहऱ्यावरील दोन्ही हात बाजूला केले. त्याला पाहताच तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काही तरी अघटित घडणार याचे संकेत तिला जाणवू लागले. अमित आपल्या सीटवर जाऊन बसला. सोनम अमित जवळ जवळ बसले होते. अमित सोनमला सारखा स्पर्श करत होता. सोनमला ते नको होते. अमित पाय मोकळे करण्यासाठी उठला. तो बोगीच्या दरवाज्यापाशी जाऊन थांबला. कोणत्या तरी विचारात तो मग्न होता. त्याचवेळी सोनमने अमितच्या वागण्याबद्दल नीरजकडे तक्रार केली. तिने नीरजला आपल्या जवळ बसावयास सांगितले. आता नीरज तिच्याजवळ येऊन बसला. पाच दहा मिनिटात अमित आला. तो सोनमच्या समोरील सीटवर बसला. आता तिघांच्या गप्पा सुरु झाल्या. अंधुक प्रकाशात अमित सोनमला न्याहाळत असल्याचे सोनमला जाणवले.
रात्रीचे साडे अकरा वाजले. नीरज आणि सोनम आता बोगीच्या दरवाज्यापाशी आले होते. नीरज म्हणाला, " किती काळोख पसरलाय " सोनम म्हणाली, " हो ना, मला खूप भीती वाटते. " नीरज म्हणाला, " अग भितेस कशाला? मी आहे ना. शिवाय अमित आहे. " सोनम म्हणाली, " त्याचीच तर भीती वाटतेय ना "
त्यांचे हे संभाषण संपते ना संपते तोच पाठीमागून कोणीतरी दोघांना बोगीच्या बाहेर ढकलून दिले. दोघांनी एक दीर्घ किंकाळी फोडली. रेल्वेच्या आवाजात त्यांची किंकाळी हवेतच विरून गेली. रात्रीचा एक वाजला होता. अमितच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य जाणवत होते. तो झोपी गेला मात्र त्याला झोप येत नव्हती. तो सारखी कूस बदलत होता. रात्रभर तळमळत होता. त्या दोघांचे चेहरे त्याच्या समोर सारखे येत होते. त्याच डब्यात आणखी दोघेजण होते. ते एकसारखे अमितला न्याहाळत होते. कदाचित त्यांना संशय आला असावा असे अमितला वाटले. त्याने चेहऱ्यावर तसा भाव दाखवला नाही.
गाडीने आता गती घेतली होती. पहाटेची भयाण शांतता होती. तेवढ्यात गाडी थांबल्याचे जाणवले. काय झाले म्हणून सारेजण विचारणा करीत होते. कोणीतरी सांगितले की गाडी पाणी भरण्यासाठी थांबली आहे. तेवढ्यात एकाने अमितला विचारले, " ते दोघेजण कोठे गेले?  " अमित म्हणाला, "बहुतेक मागच्या स्टेशनवर उतरले असावेत " गाडी आता सुरु झाली. अमित मनोमन खुश होता. त्याने सोनमवर एकतर्फी प्रेम केले होते. तिने त्याच्या प्रेमाला कोणताही प्रतिसाद दिलेला नव्हता. त्यामुळे सोनम माझी नाही तर कोणाचीच नाही असाच विचार तो करत होता. अंधाराचा फायदा घेऊन त्यानेच दोघांचा बरोबर काटा काढला होता. त्याने तसे कोणालाही जाणवू दिले नाही. सकाळ झाली होती. आंबाला आता पाचच मिनिटात येणार होते. रेल्वेचे ते शेवटचे ठिकाण होते. गाडीचा वेग कमी झाला. अमितने आपली बॅग घेतली. तो गाडीतून उतरणार तोच पोलिसांनी त्याला पकडले.पोलीस म्हणाले, " तुला दोघांच्या सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात येत आहे. " अमितने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, " मी नाही कोणाला मारले. तोल जाऊन ते स्वतःच पडले "
पोलिसांनी त्या दोन इसमाना खाली बोलावले. त्यांनी अमितनेच सोनम नीरजला चालत्या ट्रेन मधून ढकलून दिल्याचे सांगितले. अमितने ते दोघे खोटे बोलत असल्याचे सांगितले. पोलिसांनी ते दोघे गुप्तचर विभागाचे असल्याचे सांगितले. त्यांना असे काहीतरी घडणार आहे याची कुणकुण लागली होती. दोघेही त्यांच्या मागावर होते. अमितला आता पच्छाताप करण्याची वेळ आली. त्याला सर्व पुराव्या निशी पकडण्यात आले होते.
प्रदीप गजानन जोशी
गुरुकृपा, विवेकानंद नगर
जुना भालवणी रोड,
मुपो विटा, ता. खानापूर जि  सांगली
पिन 415311
मोबाईल 9881157709

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू